एच.आय.व्ही चा प्रतिबंध कसा करावा ?
- कंडोमचा वापर करावा.
- डिसपोजेबल सुई आणि सिरींजचा वापर करावा.
- एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत संबध टाळा.
- सेक्शुयल ट्रान्स्ममिटेड आजारांवर योग्य प्रकारचे उपचार घ्या.
- प्रतिबंध हाच योग्य उपचार आहे.
“एच्.आय्.व्ही.”चा प्रसार खालील गोष्टींमुळे होत नाही
- हस्तांदोलन करणे.
- एकत्र खाणे.
- डास चावणे.
- “एच्.आय्.व्ही.” संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या बरोबर काम करणे.
- संडास बाथरूमचा वापर करणे.
- संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेली भांडी वापरणे.
- “एच्.आय्.व्ही.” संसर्ग किंवा “एड्स” झालेल्या व्यक्ती वापरत असलेल्या पोहोण्याच्या तलावात पोहोणे.
- “एच्.आय्.व्ही.” व “एड्स” झालेल्या व्यक्तींच्या बरोबर राहणे.
- चुंबन घेणे, मिठी मारणे.
- रक्तदान करणे.
- एकमेकांच्या शरीराला मालीश करणे.