Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एच.आय.व्ही एच. आय. व्ही. म्हणजे काय? एच.आय.व्ही. ची जागतिक सध्यस्थिती

एच.आय.व्ही. ची जागतिक सध्यस्थिती

E-mail Print PDF
HIV /AIDS ची जागतिक सध्यस्थिती काय आहे?

दर ६.५ सेकंदांना एका व्यक्ती कडून दुसर्‍या व्यक्तीला HIV ची लागण होते. एक पालक, एक लहान मूल, मित्र, सहकारी, प्रियकर अशा कुणाहीकडून ही लागण होऊ शकते. म्हणजे तसे पहाता ४.८५ मिलियन माणसांना दर वर्षी HIV ची लागण होते.

UNAIDS ह्या जागतिक संस्थेने २००६ च्या शेवटी असा निष्कर्ष काढला की जगातील ३९.५ मिलियन माणसे एच.आय.व्ही. सहीत जगत आहेत. HIV च्या विषाणूनी आजपर्यन्तच्या सर्व जागतिक नोंदी पार करून १५ ते ४९ ह्या वयोगटात सर्वात जास्त लागण होणारा, मृत्यूच्या दिशेने घेऊन जाणारा विषाणू म्हणून आपली (कु)ख्याती करून घेतली आहे.

आजपर्यन्त जगात २५ मिलियन पेक्षा जास्त माणसे एड्स मुळे झालेल्या आजारांनी मृत्यू पावली आहेत. २००६ मधे जगभरातील २.९ मिलियन माणसांनी (त्यामधे स्त्रीया मुलेही आलीच) अशा व्याधींमुळे प्राण गमावले. हे आजार खरं तर व्यवस्थित उपचार घेतले असते तर आटोक्यात राहिले असते.

HIV / AIDS ह्या विषयाची कितीही जनजागृती होत असली तरीही HIV ची लागण होणे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
मला खात्री आहे, की तुमचे हे एक पान वाचून व्हायच्या आत एखाद्या तरी माणसाला नवीन HIV ची लागण झाली असेल! ह्या साठी आपण प्रत्येकाने काहीतरी करणे जरूरीचे आहे. या, आमच्या ह्या लढ्यामधे सामील व्हा!

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya