Friday, Jul 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

एच.आय.व्ही संक्रमण

E-mail Print PDF
एच.आय.व्ही चे संक्रमण प्रामुख्याने ४ टप्प्यात विभागले जाते.
 • प्राथमिक इन्फेकशन
 • क्लिनिकली आसिमप्टोमॅटीक इन्फेक्शन
 • सिमप्टोमॅटीक एच.आय.व्ही इन्फेक्शन
 • एच.आय.व्ही चे एड्स मध्ये रुपांतर
प्राथमिक इन्फेक्शन
हे संक्रमण फार कमी कालावधीत आढळून येते, या मध्ये साधी फ्लू सारखी लक्षणे आढळून येतात. आणि फक्त २०% लोकांमध्ये ही लक्षणे दिसू शकतात व फार कमी केसेस मध्ये एच.आय.व्ही चे निदान होते.

क्लिनिकली आसिमप्टोमॅटीक इन्फेक्शन
हा कालावधी जवळपास १० वर्षे इतका असतो. यात मुख्य अशी कुठलीही लक्षणे आढळून येत नाहीत पण कधी कधी ग्रंथींना सूज येते. रक्तामध्ये एच.आय.व्ही चे प्रमाण फार कमी प्रमाणात असते. परंतु ऍन्टीबॉडीजच्या टेस्ट मधून एच.आय.व्ही चे निदान होऊ शकते.

संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की ह्या टप्प्यात एच.आय.व्ही चा विषाणू निष्क्रिय नसतात, परंतु तो लिंफनोड मध्ये जास्त प्रमाणात सक्रीय असतो. अशा काही टेस्ट उपलब्ध आहेत ज्यानुसार एच.आय.व्ही च्या विषाणूंचे लिंफनोड मधील प्रमाण कळू शकते. ह्या टेस्टला व्हायरल लोड असे नाव आहे आणि ही टेस्ट एच.आय.व्ही च्या उपचारांमध्ये महत्त्वाची आहे.

सिमप्टोमॅटीक एच.आय.व्ही इन्फेक्शन
 • कालांतराने माणसाची प्रतिकार क्षमता नष्ट होते. यामागे मुख्य ३ कारणे आहेत.
 • लिंफनोड आणि टिशू नष्ट होतात
 • एच.आय.व्ही च्या विषाणु अधिक वाढतात आणि टि-सेल्स ला इजा पोहचवतात.
 • शरीर परत टि-सेल निर्माण करण्यास असमर्थ ठरते.
अशा प्रकारे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

एच.आय.व्ही चे एड्स मध्ये रुपांतर
प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत जाते आणि शेवटी एड्सचे निदान होते. निरोगी माणसामध्ये सि.डी.४ सेल चा काउंट हा ६०० त १२०० इतका असतो. आणि जेंव्हा हे प्रमाण २०० पर्यंत जाते तेंव्हा प्रतिकारशक्ती खुप कमी होते आणि एच.आय.व्ही चे रुपांतर एड्समध्ये होते.

डब्ल्यु.एच.ओ क्लिनिकल स्टेजींग-एच.आय.व्ही बाधित वयस्कर आणि किशोरवयीन लोकांसाठी

गरीब समाज वर्गांमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध नसतात. आणि त्यांना उपचार केंव्हा सुरु करावे हे कळत नाही त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने क्लिनिकल स्टेजींग सुरु केले.

क्लिनिकल स्टेज १
 • असिमटोमॅटिक
 • Persistent generalized lymphadenopathy.
क्लिनिकल स्टेज २
 • अचानक वजनात घट होणे
 • श्वासनलिकेस इन्फेकशन होणे.
 • नागिण
 • वारंवार तोंड येणे.
क्लिनिकल स्टेज ३
 • अचानक वजन कमी होणे.
 • अधिक काळ डायरीया होणे.
 • वारंवार ताप येणे.
 • फुफुसांचा क्षयरोग
 • बॅक्टेरीयल इन्फेक्शन
 • ऍनेमिया
क्लिनिकल स्टेज ४
 • न्युमोनिया
 • वारंवार बॅक्टेरीयल न्युमोनिया होणे.
 • नागिण
 • कॅन्डीऍसिस इन्फेक्शन
 • एक्स्त्रापलम्युनरी टि.बी.
 • कपोसी सॅक्रोमा
 • अनेक प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya