
दुसर्यावेळी गरोदर असताना सविताला एच.आय.व्ही.ची लागण झाली. तो पर्यन्त तिने कधीच एच.आय.व्ही. बद्दल ऐकले सुद्धा नव्हते. त्यामुळे तिला भीती वाटली की पोटातल्या बाळाला खूप काही भयंकर होणार आहे. पण आश्चर्य म्हणजे सविताच्या बाळाला काहीही झाले नाही. उलट तिची मुलगी खूपच सुदृढ अशी जन्माला आली. ह्याचे मुख्य कारण म्हणजे सविताने गरोदरपणातच PPTCT (prevention of parent to child transmission) चे व्यवस्थित उपचार सांगली येथील हॉस्पिटल मध्ये घेतले होते.

योग्य वेळी योग्य आधार मिळाला तर सविताच्या मुलींप्रमाणे इतर अनेक एच.आय.व्ही सहीत जगणार्या मुलांना समूपदेशनाने एक चांगला आधार मिळेल अशी खात्री वाटते. सांगली जिल्ह्यातील अनेक संस्था एकत्र येऊन लहानमुलांसाठीचे एच.आय.व्ही. विषयक काम Pediatric HIV care करू लागल्या आहेत. "दिशा" (District Integrated Strategic HIV/AIDS Action) ह्या संस्थेने आखणी केलेल्या कामानुसार तेथे एच.आय.व्ही. चे काम केले जाते. त्या कामाला लन्ग=एन