Friday, Jul 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

Fear of HIV

Print PDF
मॅक्स मार्टीन
केरळमधील कोडियूर ह्या खेड्यात रहाणार्‍या अक्षरा (वय वर्षे ८) आणि अनुथा (वय वर्षे ९) ह्या दोघींना शाळेतून काढून टाकले आहे कारण त्या दोघींची एच.आय.व्ही. टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. परंतु गावातल्या राजकारण्यांमुळे आणि गावकर्‍यांमुळे शाळा आता ह्या दोघींना एका वेगळ्या वर्गात बसवून शिकवण्याची सोय करत आहे.

केरळमधे ९०% साक्षरता आहे, तरीही अजून सर्वांना एच.आय.व्ही. बद्दल तितकीशी माहिती दिसत नाही. मागच्या महिन्यात शाळेत शिकणार्‍या ५ ते १० ह्या वयोगटातील मुले आणि मुली अक्षरा आणि अनुथाने शाळेत येऊ नये म्हणून " NO " असे लिहिलेले बोर्ड हातात घेऊन रस्त्यात उभे होते.

रीमा टी. के. (वय ३१), ही ह्या दोन मुलींची आई म्हणाली, "राज्याच्या नियमानुसार आमच्या एच.आय.व्ही. सहीत जगणार्‍या मुलींना शाळेत प्रवेश देणे पूर्णपणे नियमात बसणारे होते, परंतु शाळेतील अन्य विद्यार्थ्यांच्या पालकांनी आम्हाला आधीच अडवले, आणि पुढे जाऊच दिले नाही."

त्यानंतर मुख्यमंत्रांशी, ग्रामपंचायतीशी अनेकदा बातचीत झाल्यावर, गावतल्या काही नागरिकांनी पाठिंबा दिल्याने, आणि रीमा टी. के. ह्या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याने आता शाळेला त्या मुलींना घेण्याशिवाय गत्यंतरच उरलेले नाही. पण तरीसुद्धा त्यांना सर्व विद्यार्थ्यांमधे एकत्र बसू देण्यास परवानगी नाही. अक्षरा आणि अनुथाला वेगळ्या वर्गात बसवून वेगळे शिक्षक शिकवतात. हे ही एका तर्‍हेने वाळीत टकल्यासरखेच आहे. पण निदान मुलींना शिकायला तरी मिळत आहे, ही ही खरेच आहे.

त्यांना असे वेगळे शिकवले जात आहे, कारण त्यांना एच.आय.व्ही. पॉझिटीव्ह आहे. गावातील जास्तीत जास्त पालकांना भीती वाटत आहे. "त्या मुलींच्या बरोबर राहून आमच्या मुलींना हा आजार होऊ नये असे वाटते" असे एक पालक जयराजन पी.के. म्हणतात. "आमच्या मुलांनी त्यांना स्पर्शही करू नये असे आम्हाला वाटते. आणि आमच्या मुलांनी त्यांच्याबरोबर डबा सुद्धा खाऊ नये असे वाटते", असे ते पुढे म्हणतात.

हे सर्व सुरू असताना तिथे गेलेल्या एका पत्रकाराला मुलाखत देताना गावकरी खूप काही बोलले. पत्रकाराने विचारले, "एच.आय.व्ही. ची लागण कशामुळे होते हे तुम्हाला माहित आहे का?" त्यावर पालकांनी "जेवणातून, स्पर्शातून, शेजारी बसण्यातून" अशी अनेक निरर्थक उत्तरे दिली परंतु "लैंगिक" हे उत्तर किंवा खरे असे उत्तर कोणालाच माहित नव्हते. काही गावकरी तर म्हणाले, "अशी माणसे जर गावात राहिली तर आमचे पीक सुद्धा चांगले येणार नाही."

अशा तर्‍हेने भारतात सर्वात जास्त साक्षरता असलेल्या केरळ राज्यात सुद्धा एच.आय.व्ही. बद्दल माहिती नसणे, गैरसमज अशा अनेक गोष्टी दिसून आल्या. ह्या छोट्या कुटुंबाची मात्र त्यात खूपच फरपट झाली.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya