Thursday, Dec 18th

Last update:10:06:09 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एड्स मदत गट

एड्स स्व-मदत गट

E-mail Print PDF
AIDS support group
एड्स ही व्याधी फारच झपाट्याने पसरत आहे. एड्स म्हंटल्यावर एक चित्र डोळ्यापुढे येते, ते म्हणजे एक व्यक्ती चेहे-यावर शरमेच्या आणि अपराधीपणाच्या भावनेने पछाडलेली आहे. असे काही लोक आहेत की जे एच.आय.व्ही संसर्गाची नुसती कल्पना सुद्धा सहन करू शकत नाहित. ते या बाबत बोलायला सुद्धा घाबरतात, आणि कुटुंबाची चिंता करत बसतात.

एड्स: म्हणजे - अक्वायर्ड ईम्यून डेफिशियन्सी सिन्ड्रोम - एवढेच आपल्याला माहित असून चालत नाही. त्यासहीत जगणा-या माणसांचे आयुष्य किती खडतर असते ते त्यातून कसे बाहेर येतात, आणि सहवेदनेतून जाणार्यांना मदतीचा हात कसा देतात हेही माहित असणे गरजेचे आहे.

सहवेदनेतून जाणा-यांनी एकत्र येणे म्हणजे स्व-मदत गट. एच.आय.व्ही. ग्रस्त किंवा एड्स असणारी माणसे जेव्हा एकटी असतात, तेव्हा असहायतेनी दुर्बळ बनतात. ’हे माझ्याच नशिबी का?’ ’मलाच का?’ ’आता मी काय करू?’ असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उभे रहातात.

दहा वर्षांपूर्वी एक काळ असा होता की अनेक तज्ञ व्यक्तींनाही ह्या बद्दल माहिती नसे. अशा माणसांवर कुणी डॉक्टर उपचार करण्यास तयार होत नसत. पण आज आपण अभिमानाने सांगू शकतो की ह्या विषयाला वाहून घेतलेल्या अनेक संस्था आहेत, अनेक स्व-मदत गट आहेत. ह्या स्व-मदत गटांत एच आय व्ही ग्रस्त माणसे किंवा एडस असलेली माणसे जेव्हा यायला लागतात, तेव्हा हळूहळू त्यांची मनाची उभारी वाढायला लागते. स्व-मदत गटाची ह्या सर्वांना त्यांचे दु:ख, निराशा, यातना, व्यथा, ह्यातून बाहेर येण्यासाठी मदत होते.
Comments (0)Add Comment
Write comment
All fields marked with * are required

येथे फक्त वरील लेख / माहितीशी संबंधित 'प्रतिक्रिया' व्यक्त करावी.कृपया आपल्या आरोग्य विषयक शंका येथे लिहू नयेत. येथे लिहिलेल्या आपल्या शंका योग्य डॉक्टरच्या वैद्यकीय सल्ल्यासाठी पाठविणे आम्हास कठीण जाते.येथे व्यक्त केलेल्या 'प्रतिक्रिया' या सदर लेखाचा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात येतात.त्यामुळे आपण येथे लिहिलेल्या आपल्या वयक्तिक आरोग्य विषयक शंका सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात.आपल्या वयक्तिक आरोग्य विषयक शंका हेल्थ डिरेक्टरी वरील 'आस्क द डॉक्टर' सुविधेद्वारे संबंधित डॉक्टरना लिहा अथवा contact@aarogya.com.या ई-मेलवर पाठवा.

 
 
smaller | bigger
 

busy

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya