एड्स म्हणजे काय?
“एड्स” ही “एच्.आय्.व्ही.” जंतुंचा संसर्ग झाल्यानंतर येणारी अवस्था आहे. जंतुंचा संसर्ग झाल्यापासून “एड्स” व्हायला ७ ते ८ वर्षसुध्दा लागू शकतात.
वीर्य व योनीस्त्राव, संसर्गजन्य रक्त व रक्ताचे घटक, जंतुंची लागण झालेल्या आईपासून जन्माला येण्यापूर्वी मुलाला झालेला संसर्ग, मुलाचा जन्म होताना व अंगावरील दूध इत्यादी घटकामधून “एच्.आय्.व्ही.” जंतुंचा संसर्ग होऊ शकतो.
“एड्स” होण्यासाठी कारणीभूत असलेल्या “एच्.आय्.व्ही.” रोगजंतुंच्या अस्तित्वासंबंधात केलेली परीक्षा होकारार्थी असेल तर, त्याचा अर्थ अशी व्यक्ती “एच्.आय्.व्ही.” रोगजंतूंचा संसर्ग झालेली आहे. कोणत्याही रोगजंतूंचा शरीरावर हल्ला झाल्यास त्याला प्रतिबंध करण्याची किंवा त्याचा प्रतिकार करण्याची जी शक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते तिच्यावर “एच्.आय्.व्ही.” रोगजंतू थेट हल्ला करतात व व्यक्तीची रोगप्रतिबंधक शक्ती कमी होते. कालांतराने व्यक्तीची प्रतिकार शक्ती हळूहळू करत अत्यंत कमी होते व ह्या अवस्थेला “एड्स” असं म्हणातात.
“एच्.आय्.व्ही.” संसर्ग झालेल्या व्यक्तीला “एड्स” केव्हा होईल हे कोणीही खात्रीशीररित्या सांगू शकत नाही. “एच्.आय्.व्ही.” चा संसर्ग निरनिराळ्या व्यक्तीमध्ये निरनिराळ्या प्रमाणात असू शकतो. एखादी व्यक्ती खूप काळानंतर अशक्त होऊ शकते. उलट, काही “एच्.आय्.व्ही.” संसर्ग झालेल्या व्यक्ती खूप वर्षापर्यंत धट्याकट्या असू शकतात. “एच्.आय्.व्ही.” जंतुंच्या अस्तित्वासंदर्भात केलेली परीक्षा होकारार्थी असणे म्हणजे काय, ह्याचा अर्थ समजून घेणे हे प्रत्येकासाठी हितकारक आहे.
“एच्.आय्.व्ही.” संसर्ग झालेला असेल तर, आवश्यक ती काळजी घेणे प्रत्येकाला सोपे जाते, तसेच, अशापैकी गरजू व्यक्तींना आवश्यक व योग्य मदत करणे इतरांना शक्य होते.
“एड्स” म्हणजे
अक्वायर्ड - एखादे विशिष्ठ कृत्य करणे आवश्यक असलेला.
इम्युन - संसर्गजन्य जंतुंचा प्रतिकार करण्याची क्षमता.
डेफिशिएन्सी - कमी होणे - कमी असणे.
सिंड्रोम - रोगांच्या लक्षणांचा समूह
थोडक्यात: एखादे विशिष्ठ कृत्य करून निर्माण झालेला, संसर्गजन्य जंतूंचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी करणारा, रोगांच्या लक्षणांचा समूह म्हणजे “एड्स”.