Tuesday, Jun 15th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ जागरुकता लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणार्‍या व्यक्ती आणि एच.आय.व्ही. - page2

लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणार्‍या व्यक्ती आणि एच.आय.व्ही. - page2

Print PDF
Article Index
लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणार्‍या व्यक्ती आणि एच.आय.व्ही.
page2
page3
All Pages
उत्तर भारत
उत्तर भारतात तृतीय पंथीय लोकांना हिजडा असे संभोधले जाते. ह्या जमातीतील लोक स्वतःला तिसर्‍या आणि स्वतंत्र लिंगाचे मानतात.
हिजड्यांना भारतात स्वतंत्र स्थान असून लग्न किंवा जन्म अशा आनंदाच्या क्षणी त्यांना मानाचे स्थान मिळते.

हिजडा आणि हिंदु धर्म
Hijras and Hinduism
हिजडा पंथातील लोक बहुचरा मातेला देवस्थानी मानतात. तिची नित्यनेमाने पुजाअर्चा करतात. असे मानले जाते की त्यांच्या उपासनेच्या बदल्यात देव त्यांना लोकांना वरदान देण्याची शक्ती बहाल करतो. म्हणूनच त्यांना मोक्याच्या क्षणी बोलावले जाते.

हिजडा आणि इस्लाम धर्म
हिजडा हा पंथ प्रामुख्याने फक्त हिंदू धर्मियांमधे मानला जातो पण इस्लाम धर्मामधे ही त्यांना स्थान आहे. मुघल साम्राज्यात स्त्रीयांचे संरक्षण करण्यासाठी हिजडे कार्य करत असत. झिया जेफरी आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असताना एक आश्चर्याची गोष्ट त्यांना दिसून आली, जेव्हा हैदराबाद हे संस्थान होते तेव्हा कित्येक मान्यवरांच्या घरात सेवक म्हणून हिजडे कार्यरत होते.

Hijras and Islam
भारतातील तृतीय पंथीयांचे आजच्या जगातील स्थान
खालील तीन मार्गाने तृतीय पंथील लोक आपली उपजीवीका चालवतात.

शुभप्रसंगी आशिर्वाद देऊन मिळणारे मानधन कमवून

भीक मागून
लैंगिक व्यवसाय करुन

तृतीय पंथीय/लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणारे व्यक्ती यांसाठी भारतातील कायदा.
Transgender community
  • हिजड्यांना काही हक्क आहेत पण ते भारतीय कायद्यातील नाहीत.
  • हिजड्यांना मतदानाचा, लग्नाचा आणि त्यांच्या नावे संपत्ती बनवण्याचा अधिकार आहे.
  • आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजागार मिळवणे अशक्य असते.
  • भारतीय दंड विधान कलम ३७७ नुसार असा कोणताही संभोग जो स्त्री आणि पुरुष या दोघांव्यतीरिक्त असेल तर तो दंडनीय गुन्हा ठरतो. हा कायदा १८६० साली ब्रिटिशांनी आमलात आणला होता.
एका हिजड्याचे मनोगत
विद्या
Vidya
Vidya
मी ३९ वर्षांची आहे आणि हॉटेल मॅनेजमेंट या विषयाचे उच्च महाविद्यालाचे शिक्षण घेतले आहे. मला माझ्या हृदयाच्या मूळापासून स्त्री होण्याची इच्छा होती. म्हणूनच मी १६ वर्षांची असताना एका पहाटे लिंग परिवर्तनासाठी गेले. आता मी अजून सहा ते सात हिजड्यांबरोबर राहते. ते माझे चेले किंवा अनुयायी आहेत व मी त्यांची गुरु आहे. मी सुशिक्षित आहे पण माझ्याबरोबरचे अधिक हिजडे अशिक्षित आहेत. समाजात ९८% हिजडे अशिक्षितच असतात व त्यांना काय करावे हेच कळत नाही.

काजोल
Kajol
Kajol
मी २१ वर्षांची आहे आणि तीन वर्षापूर्वी मी हिजडा बनले. आम्हाला भारतात कोठेही सोईस्कर अशी लिंग बदलाची चिकित्सा करता येत नाही. किंबहूना तशी उपलब्धताच नाही. म्हणूनच मी खतना करुन घेतला आहे. आम्हा हिजड्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतात एकतर भीक मागणे अथवा लैंगिक व्यवसाय करणे. मी लैंगिक व्यवसाय करते आणि मी काही वाईट करते आहे असे मला वाटत नाही. मला नेहमी स्त्रीवेशात राहणे आवडते. मी एका निमसरकारी संस्थेतही काम करते जी हिजड्यांसाठी कार्य करते.

फामिला
Famila
Famila
मी एका संस्थेची स्वयंसेविका आहे. हा समूह हिजड्यांसाठी उत्सव आयोजित करतो. मागिल वर्षी आमच्या उत्सवात पोलिसांनी आमचा खूपच छळ केला. आम्हाला असे वाटते की आम्ही हा उत्सव साजरा करावा.

जरी हिजड्यांची व्युत्पत्ती खूप पूर्वी झालेली असली तरी कायदा मात्र पुरुष आणि स्त्रीयांसाठीच राखीव आहे. आम्हाला शिधावाटपाचे कार्ड, पासपोर्ट किंवा मतदानाचे कार्डही मिळत नाही.

अधिक माहितीसाठी स्त्रोत: www.thewe.cc

तृतीय पंथीय: भेदभाव
सरला
या जगात कोणत्याही प्रकारच्या कमतरतेने जन्माला येणे म्हणजे भेदभाव, विचित्र दृष्टिकोनाला सामोरे जाणे आहे. मी अशांमधेच अशिक्षितरित्या वाढले. शाळेत दाखला दिला गेला नाही कारण मी इतरांपेक्षा वेगळी आहे असे सर्वांचे म्हणणे होते. मला लिहण्याची वाचण्याची आवड होती तरीही मला यापासून वंचित रहावे लागले. मला उपजीवीकेचे कोणतेही साधन नव्हते म्हणून मी निर्जन जागेत, रस्त्याच्या कडेला असलेल्या अज्ञात स्थळी पुरुषांना बोलावून त्यांना लैंगिक समाधान मिळवून देत असे. समाधान झाल्यावर ते जे देतील त्यावरच मी उपजीवीका चालवत होते. आता माझे वय झाले आहे. माझे जीवन अधिक खडतर झाले आहे. आता मी अनधिकृत कामे करुन किंवा भिक मागून जीवन व्यतीत करण्याखेरीज काय करु शकते.
मी मनुष्य नाही का? स्त्री आणि पुरुषांनाच फक्त मनुष्य म्हणून जगण्याचा हक्क आहे का? आपण माणुसकी का विसरत आहोत?



वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya