Article Index |
---|
लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणार्या व्यक्ती आणि एच.आय.व्ही. |
page2 |
page3 |
All Pages |
Page 3 of 3
संध्या वय : ५० वर्षे जन्मस्थळ : कोलकाता
कोलकाता:
मी कोलकाता येथे माझ्या कुटुंबियांसमावेत राहते. माझ्या कुटुंबात माझे दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. मी लहान असताना मला मुलींचे कपडे घालणे, नाच आणि सौंदर्य प्रसाधने वापरायला आवडायचे. जेव्हा मी नाटकातून काम केले तेव्हा मुलीची भूमिका मलाच दिली जात असे.
मी दिल्लीला आल्यानंतर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा मी हिजड्यांच्या टोळीत सामिल झालो. मी माझा नवरा (गिरिया) माझी आई आणि बहिण मिळून एकाच घरात रहायचो. गेली १५ वर्षे मी गिरियासोबतच राहत आहे. मी हिजड्यांच्या समूहातच काम करते. माझा नवरा निर्मिती केंद्रात काम करायचा आणि माझ्या नवर्याच्या पगारातील काही रक्कम पोटगी म्हणून त्याच्या बायकोला व मुलांना देत असे.
माझे नवर्याला भेटण्याआगोदर माझे दोनवेळा लग्न झालेले आहे. माझी शारिक स्थिती अशी असल्यामुळे माझ्या बायकोची गर्भधारणा झालीच नाही. हिजडा असल्यामुळे लोकांनी माझ्यावर मारलेल्या शेर्यांकडे मी दुर्लक्ष करते. मी म्हणते, "त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे मला काही फरक पडत नाही."
माझ्या छोट्या मोठ्या दुखण्यासाठी मी ’सहारा ट्रांसजेंडर प्रोजेक्ट’ येथे जात असे. अंमली पदार्थ व दारु यांचे व्यसन असलेल्या लोकांसाठी सहारा काम करत असल्यामुळे मी दारुड्या आहे हे मी तिथे कबुल केले. माझ्यासाठी एक आरोग्य दक्षता कार्यकर्ता नेमून देण्यात आला आणि सुरक्षित संभोग कसा करावा हे मला समजले. माझ्या वागणूकीमुळे मला संशय आहे की मी एच.आय.व्ही. ग्रस्त आहे पण अद्याप मी तशी तपासणी केलेली नाही. मी तयार असे पर्यंत सहाराचे कार्यकर्ते तपासणीसाठी थांबण्यास तयार होते.
www.saharahouse.org
चेन्नई मधील तृतीत पंथी
चेन्नई मधे देहविक्री चा धंदा खूप चालतो. चेन्नई शहरातच जवळपास ३०० अली(हिजडे) देहविक्रीचा धंदा करतात व ते यावरच अवलंबून आहेत. स्त्रीयांशी संबंध ठेवणारेच लोक ग्राहक म्हणून यांच्याकडे येतात. गुदामैथून आणि मुखमैथून करुन घेण्यासाठी ते नेहमीच येत असतात. हे सर्व अली त्यांच्या जमातीचे सदस्य आहेत. सगळे अली हे तामिळनाडूमधे आपल्या जागा बदलत असत्तात. ते चेन्नई, बेंगळुर, पुणे आणि मुंबईलाही भेटी देतात.
मुंबईचे तृतीय पंथी
तृतीयपंथीयांमधे HIV चे प्रमाण
मुंबईचा नकाशा
हमसफर ट्रस्ट पुरुष वेश्यांवर अभ्यास करत आहेत.
हमसफरने आयोजित केलेल्या शिबिरात ७६ लोक उपस्थित होते त्यात २४ पुरुष आणि ५२ हिजडे होते.
५२ हिजड्यांपैकी ४० लोक HIV ग्रस्त होते.
३०% हिजड्यांना लैंगिक रोग होते.
तृतीयपंथी आणि HIV
आरोग्य दक्षतेसाठी प्रवेश नसणे, प्रगती आणि शिक्षण नसणे, वैयक्तिक हक्कांची माहिती नसणे आणि धोकादायक जीवन पद्धती या कारणांमुळे हिजडे समाजाकडून दुर्लक्षित झाले आहेत. यांना HIV चा खूपच धोका आहे.
भारतामधील तृतीयपंथी आणि HIV

HIV Status of the trans gender sex workers
असुरक्षित संभोग केल्यामुळे यांच्यात HIV चा फारच धोका आहे.
कंडोमचा वापर न केल्यास HIV चा संसर्ग होऊ शकतो.
असुरक्षित संभोगामुळे ३३% हिजड्यांना HIV विषाणूंची लागण झाली आहे.
मानवी हक्क
- सर्व मानवांना समतेचा आणि स्वतंत्र्याचा हक्क आहे. (अग्रलेख १UNUDHR)
- न्यायालयापुढे प्रत्येक जण ही व्यक्ती म्हणूनच ओळखली जातो.
- प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा हक्क आहे.
- हा हक्क न्यायानी सुरक्षित असा आहे.
- सर्व व्यक्ती न्यायापुढे समान आहेत भेदभाव न करता सर्वांना सुरक्षितता मिळू शकते.
- इतर व्यक्तींप्रमाणे जगण्याचा हक्क मिळावा.
- अज्ञान, क्रूरपणा, भेदभाव, गैरफायदा यांपासून सुटका आणि सरकारी खाजगी कार्यालयातून समान वागणूक आणि दयेचा हक्क.
- सरकारी आणि खाजगी कार्यालयात अल्पसंख्यांकांचा हक्क मिळणे.

- सर्व राजकीय सांस्कृतीक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमधे सहभागी होण्याचा हक्क
- पूर्वग्रह आणि भेदभाव न ठेवता स्वतःचे कुटुंब आणि घर बांधण्याचा हक्क
- तुरुंगवास किंवा मृत्यूच्या भयापासून दूर स्वतंत्र जीवन जगण्याचा हक्क.
- आरोग्यासाठी योग्य ती सुविधा मिळणे
तृतीय पंथीयांसाठी कार्यरत असणार्या संस्था
- सहार: www.saharahouse.org अंमली पदार्थांच्या वापरामुळे HIV ला बळी पडलेल्या लोकांसाठी सहार कार्य करत आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि मणिपुर येथे ही संस्था कार्यरत आहे.
- आशिया पॅसेफिक नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स: ही संस्था सुरक्षित संभोग व हिजड्यांच्या वैयक्तिक हक्कांसाठी कार्य करते.
- हमसफर ट्रस्ट हा MSM साठी कार्य करतो.
- www.sangama.org
- www.saharahouse.org
- news.bbc.co.uk
- www.apnsw.org
- www.sexworkerspresent.blip.tv
- www.wakeuppune.org