Tuesday, Jun 15th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ जागरुकता

जागरुकता

एच.आय.व्ही. / एड्सबद्दल माहिती
बर्‍याच लोकांना आपल्या शरिराबद्दल, लैंगीक आणि प्रजनन स्वास्थ्य, एच.आय.व्ही एड्स बद्दल फार कमी माहीती असते. बर्‍याचश्या समाजामध्ये या विषयांवर उघडपणे बोलले जात नाही त्यामुळे महिला आणि मुलींमध्ये एच.आय.व्ही एड्स बद्दल अज्ञानच आहे.

जरी एच.आय.व्ही एड्स जनजागृती साठी अनेक कार्यक्रम राबवले जात असतील तरी देखील बर्‍याच गोष्टी करणे आवश्यक आहे. बर्‍अयाचश्या देशांमध्ये एड्स जनजागृती साठी निरनिराळे कार्यक्रम राबवले जातात. यामागचे त्यांचे लक्ष हे एच.आय.व्ही एड्स, मलेरीया या सारख्या आजारांचा मुकाबला करण्यास समर्थ असणे हे आहे.

स्त्रियांमध्ये याबद्दल जनजागृती करणे हा एक मुख्य मुद्दा आहे कारण स्त्रियांना या बद्दल फार कमी माहीती असते. जागतिक सर्वक्षणानुसार असे आढळुण आले आहे कि जवळपास ८०% स्त्रियांना एच.आय.व्ही म्हणजे काय, त्याचा प्रसार कसा होतो, त्याच्या पासुन बचाव कसा करावा या बद्दल काहीच माहीती नाही.

फार कमी देशांमध्ये कंडोमचा वापर अशा विषयांवर सर्वेक्षण केले जाते. पण अशा विषयांवर विविध कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे, विशेषता स्त्रियांपर्यंत याबद्दल माहिती पोचवणे आवश्यक आहे कारण स्त्रियांना याबद्दल फार कमी माहिती असते. आणि एच.आय.व्ही ची लागण असणार्‍अया लोकांनी जर असे उपक्रम राबवले तर ते जास्त चांगल्या रितीने हे करु शकतील.

एच.आय.व्ही एड्स बद्दल जनजागृती ही फार आवश्यक आहे.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya