Monday, Apr 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एड्स निदान भावनात्मक आणि मानसिक कार्ये सुरळीत पाड पाडण्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची ठरते

भावनात्मक आणि मानसिक कार्ये सुरळीत पाड पाडण्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची ठरते

Print PDF
झोपेच्या आभावामुळे एकाग्रता साधली जात नाही. त्याचप्रमाणे जी कामे स्मरणशक्तीवर अवलंबून असतात किंवा आकडेवारीची कामे यांवर परिणाम होत असतो.

निद्रानाशाची खूप वर्षांपासूनची समस्या असल्यास वृद्धत्वही लवकर येते. HIV च्या रुग्णाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर त्याच्या जीवनशैलीवर परिणाम होतो उदाहरणार्थ दिवसभर थकवा जाणवतो व कामाचा दर्जाही खालावत जातो.

HIV पिडीत व्यक्तींना दिवसाच्या थकव्याशिवाय रात्री झोपेसाठी औषधोपचार करुनही झोप येत नाही. यासाठी योग्य ते निदान आणि योग्य ते औषधोपचार केल्यास रुग्णांमधे प्रगती दिसून येते व जीवनाचा दर्जा सुधारतो. नैराश्य किंवा दुःख यामुळेसुद्धा निद्रानाश संभवतो किंवा अगदी सकाळी जागे होणे, झोप तुटक राहणे अश्या समस्या उद्भवतात. HIV पिडीत रुग्णांमधे निद्रानाशाचा प्रादुर्भाव अधिक संभवतो.

अँटी रेट्रोव्हायरल थेरेपी
वैद्यकीय संशोधनातून HIV साठी असलेल्या औषधांमुळे निद्रानाशाचा विकार दिसून येतो. सस्टिव्हा नावाच्या औषधामधे निद्रानाशाचे दुष्परिणाम होत असतात. सुरवातीला हा प्रकार दिसून येतो. पण औषधांच्या मात्रेमधील फरक, सकस आहार व व्यायाम यांमुळे हे दुष्परिणाम कमी होत जातात. तज्ञांकडून आरोग्याची तपासणी औषधोपचार व सकस आहार याची फारच जरुरी भासते.

HIV नसलेल्या मुलांपेक्षा HIV चा संसर्ग असलेल्या मुलांमधे निद्रानाशाचे प्रमाण अधिक असते (निरिक्षणावरुन). HIV संसर्ग नसलेली मुल अभ्यास करताना झोपेतून लवकर जागे होतात व जास्त वेळ जागे राहू शकतात व त्यांना थकवाही जास्त येतो. अचूक निदान व योग्य झोप यांमुळे जीवनाचा दर्जा उंचावतो त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती HIV चा संसर्ग असलेल्या मुलांपेक्षा जास्त असते.

HIV चा संसर्ग असलेल्या व्यक्तींमधे काही सर्वसाधारण शाररिक लक्षणे दिसून येतात. जसे ताप येणे किंवा वजनात घट. याकडे दुर्लक्ष झाल्यास व्यक्तीगत बदल घडतात व ते अशक्त होत जातात.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya