Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्हीग्रस्त मुलीने फसवले 'स्पंदन'ने वाचवले

एचआयव्हीग्रस्त मुलीने फसवले 'स्पंदन'ने वाचवले

Print
सकाळ वृत्तसेवा
१३ जुलै २०१०
भीमगोंडा देसाई
बेळगाव, भारत

अन्य तरुणींसारखेच तिनेही लग्नाचं स्वप्न पाहिलं. त्यानुसार तिचं लग्न ठरलं आणि ते यादी पे शादी स्वरूपात पारही पडलं. परंतु त्या मुलीच्या नातेवाइकांनी आणि तिने आपल्याला मुलीला एचआयव्हीची लागण झालेली आहे, हे मुलाला व त्याच्या कुटुंबाला समजून दिले नाही. ही माहिती जेव्हा एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणाऱ्या स्पंदन या संस्थेला कळाली, तेव्हा पदाधिकाऱ्यांनी हस्तेक्षप करून लग्न मोडले.

लग्न मोडल्यामुळे त्या तरुणांचे उद्‌ध्वस्त होणारे जीवन वाचले. गोकाकनजीक काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आहे. रितसर लग्न मोडण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे स्पदंनचे अध्यक्ष महांतेश माळी यांनी "सकाळ'ला सांगितले.

गोकाकपासून पाच किलोमीटर अंतरावर मुलीचे, तर सुमारे बारा किलोमीटर अंतरावर मुलाचे गाव आहे. मुलीच्या आई-वडिलांचा दोन वर्षांपूर्वी एडस्‌ने मृत्यू झाला. त्यामुळे ती मुलगी मामाकडे राहते. तिचे शिक्षण दहावी झाले असून मुलीलाही एचआयव्हीची लागण झाली आहे. हे घरातील सर्व मंडळींना व त्या मुलीच्या नातेवाइकांनाही माहिती आहे. हे माहिती असूनही तिच्या नातेवाइकांनी त्या मुलीचे लग्न करण्याचा घाट घातला. आठवड्यापूर्वी मुलीला पाहण्यासाठी मुलगा आला. घराणे श्रीमंत व सुखी असल्याचे पाहून त्याने मुलीला पसंत केली. रात्री साडेदहा वाजता "यादी पे शादी लग्न'ही लागले. गावातील मोजक्‍या मंडळींनी व जवळच्या नातेवाइकांनी लग्नाला हजेरी लावली होती; मात्र माहिती असूनही एकानेही लग्न ठरवताना किंवा झाल्यानंतरही त्या मुलीला एचआयव्हीची लागण झाली आहे, असे सांगितले नाही. लग्न पार पडल्यानंतर मुलगीला काही दिवसांनंतर नांदायला सासरी पाठविण्याचे नियोजन होते.

दरम्यान, या लग्नाची माहिती स्पंदन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळाली. श्री. माळी व अन्य पदाधिकाऱ्यांनी या नवरदेवाचा पत्ता शोधून काढला. त्याच्याशी संपर्क साधून मुलीला एचआयव्ही झाल्याची माहिती दिली. हे वृत्त ऐकून मुलगा मात्र धीरगंभीर झाला. मुलीकडच्या लोकांनी अशा पद्धतीने फसविल्यामुळे तो निराश बनला. त्याने संबंधित मुलीला नांदवण्यास नकार दिला आहे. अद्याप रितसर लग्न मोडलेले नाही. लग्न मोडण्यासाठी लवकरच मुलीकडील मंडळी व मुलाकडील नातेवाइकांना बोलवून रितसर प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे, असे श्री. माळी यांनी सांगितले.

मुलीच्या घरातील उच्चशिक्षित
मुलीच्या घरातीत सर्वजण उच्चशिक्षित आहेत. सुशिक्षित घराणे म्हणून गावात परिचित आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत अध्यक्षपदावर या घरातील मंडळी आहेत. इतक्‍या सुशिक्षित मंडळींना मुलगीला एचआयव्हीची लागण झालेली माहीत असताना लग्न करून तरुणाचे जीवन उद्‌ध्वस्त करण्याचे धाडस केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मुलगा गरीब व अल्पशिक्षित असल्यामुळे तोही अधिक काही विचार न करता चांगल्या व श्रीमंत कुटुंबातील मुलगी मिळाल्याच्या आनंदात लग्न उरकून टाकले.

मुलीही फसवू शकतात
आजपर्यंत मुलगा आपल्याला एचआयव्ही झाल्याचे लपवून लग्न करून घेत असल्याच्या काही घटना उघडकीस आलेल्या आहेत. परंतु मुलगीने स्वतःला एचआयव्हीची लागण झालेली असताना ही बाब लपवून लग्न करून घेण्याची ही घटना तशी दुर्मिळच म्हणावी लागेल.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya