१० मार्च २०१३
राज्यस्तरीय मेळाव्यात 125 वधू-वरांनी लावली हजेरी
एचआयव्ही बाधितांनी न्यूनगंड बाळगू नय़े आत्मविश्वासाने जगायला हव़े रस्त्यावरील अपघाताप्रमाणेच आरोग्याचा अपघात असतो़ घरच्यांना मानसिक त्रास होणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यावी़ घरातले आनंदी वातावरण कायम ठेवावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा पॉङिाटिव्ह साथी डॉट कॉमचे संस्थापक अनिलकुमार वळीव यांनी केल़े
रविवारी सकाळी विजापूर रोडवरील आरटीओ कार्यालयाच्या आवारात पॉङिाटिव्ह साथी डॉट कॉम आणि आरोग्य साथी डॉट कॉमतर्फे आयोजित एचआयव्ही बाधितांचा वधू-वर मेळावा थाटात पार पडला, याप्रसंगी ते बोलत होत़ेकार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, आरोग्य अधिकारी दिगंबर कानगुले उपस्थित होत़े कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनिलकुमार वळीव यांनी भूषविल़े प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाल़े खमितकर यांनी उद्घाटनपर भाषणातून पॉङिाटिव्ह साथी डॉट कॉमच्या कार्याचे कौतुक केल़े याप्रसंगी आरोग्य डॉट कॉमचे डॉ़ श्यामसुंदर जगताप यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केल़े

याप्रसंगी कर्मयोगी बहुउद्देशीय संस्थेचे महेश हणमे, आरोग्य डॉट कॉमचे आनंद शिंदे, राहुल फरांदे, संग्राम देवेकर, मयुरी वाघमारे, अमृता नळे आणि स्नेहा गड्डम आदी उपस्थित होत़े
11 वा मेळावा
पॉङिाटिव्ह साथी डॉट कॉम ही एचआयव्ही बाधितांसाठी काम करणारी जगातील पहिली वेबसाईट आह़े या वेबसाईटच्या माध्यमातून आजर्पयत बाधित वधू-वरांसाठी दहा मेळावे घेण्यात आल़े यंदा सोलापुरातला 11 वा मेळावा होता़ या मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांचे विवाह जुळवून देण्यात यश आले आह़े या मेळाव्याला औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, हैदराबाद, बेळगाव, मुंबई, पुणे, सांगलीसह सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोप:यांतून इच्छुक दाखल झाले होत़े