Sunday, Apr 11th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी 'मिस्टर इंडिया'मुळे 'एचआयव्ही'बाधितांना प्रेरणा'

'मिस्टर इंडिया'मुळे 'एचआयव्ही'बाधितांना प्रेरणा'

Print
सकाळ वृत्तसेवा
२४ नोव्हेंबर २०१०
पणजी, भारत

'एचआयव्ही'बाधित रुग्ण सर्वसामान्यांप्रमाणे सर्व गोष्टी कार्यक्षमपणे करू शकतो, हे दर्शविणारा 'मिस्टर इंडिया' हा मणिपुरी चित्रपट 'इंडियन पॅनोरॅमा'मध्ये प्रदर्शित करण्यात आला. 'एचआयव्ही'बाधित रुग्णांना प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने हा चित्रपट बनविण्यात आल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक हावबम पबनकुमार याने आज केले. यावेळी चित्रपटातील नायक प्रदीप कुमार सुद्धा उपस्थित होता. 'एचआयव्ही'बाधित रुग्ण सुद्धा जीवनात काही ना काही करू शकतो, हे दर्शविणारा हा 47 मिनिटांचा चित्रपट आहे.

चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक हावबम पबन कुमार म्हणाले, 'जीवनाचा आनंद कसा घ्यावा, हे शिकविणारा हा चित्रपट आहे. 'सत्यजित रे फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट', कोलकताच्या विद्यार्थ्यांनी या चित्रपटासाठी कष्ट उपसले आहेत. एकही पैसा न घेता सुमारे दोन वर्षे या विद्यार्थ्यांनी चित्रपटासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत. या मुलांमुळेच हा चित्रपट तयार झालेला आहे.

या चित्रपटातील कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. बालपणी ड्रग्ज बरोबर सीरिंजचा गैरवापर केल्याने खुंद्रकपम प्रदीपकुमार सिंग याला एचआयव्हीचा संसर्ग होतो. 2000 साली एचआयव्हीची बाधा झाल्याचे निदान त्याला होते. एचआयव्हीमुळे व्यायाम तथा शरीरसौष्ठवचा सराव न करण्याचा सल्ला डॉक्‍टर त्याला देतात. परंतु डॉक्‍टरांचा सल्ला जुगारुन प्रदीपकुमार व्यायामशाळेत जाऊ लागतो व कैक किताब पटकावतो. 2007 साली मिस्टर मणिपूर हा किताब त्याला मिळतो. याच किताबावर मी इंडिया हे नाव चित्रपटाला देण्यात आलेले आहे'. प्रदीपकुमार हा मणिपूरमधील एचआयव्हीबाधितांसाठी एक प्रेरणास्थान आहे.

मणिपूरमधील चित्रपटांबाबत बोलताना हावबम प्रदीप कुमार म्हणाले, "मणिपूरमध्ये वर्षाला साठ ते सत्तर सिनेमे तयार होतात. इतर प्रदेशांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. आसाममध्ये तर मणिपुरपेक्षाही कमी चित्रपटांची निर्मिती होते. आसामात वर्षाला सुमारे वीस चित्रपट तयार होतात.

इशान्येकडील राज्यांत एडसची समस्या जटील बनलेली आहे. ब्रह्मदेशांमधून येणाऱ्या ड्रग्समुळे "एचआयव्ही'बाधितांची संख्या वाढत आहे. या रुग्णांना आत्मविशास देण्याच्या दृष्टीने हा चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

या चित्रपटावर 40 हजार रुपये खर्च झालेले आहे. परंतु शासनाकडून कोणतीही मदत न घेता हावबम पबनकुमार यांनी हा चित्रपट बनविलेला आहे. राज्य शासनाचे रौप्यपदक या चित्रपटाला मिळालेले आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya