Tuesday, Aug 21st

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी

बातम्या आणि घडामोडी

जिल्ह्यात आवळला जातोय एड्‌सचा "पाश'

Print
सकाळ वृत्तसेवा
११ ऑगस्ट २०१०
रत्नागिरी, भारत

जिल्ह्यात "एड्‌स'चा पाश आवळत असून गेल्या आठ वर्षांत दोन हजार पुरुष, तर एक हजार 361 महिलांना एचआयव्ही झाल्याचे स्पष्ट झाले असून हे प्रमाण 6.19 टक्के एवढे आहे. गेल्या वर्षभरात 429 जणांना बाधा झाली असून, त्यापैकी 21 जणांचा एड्‌सने मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंगद चाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्टला साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य एचआयव्ही बाधित युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र करून युवकांना सक्षम करणे अपेक्षित आहे. एड्‌सविरुद्धचा लढा यशस्वीपणे लढून समाजातील कलंक व भेदभावाची भावना कायमस्वरूपी मिटवून टाकण्यास युवाशक्तीचा उपयोग होईल. ही जाणीव ठेवूनच महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेने या दिनानिमित्त जिल्हा स्तरावर खास युवकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आले आहे. त्यामध्ये प्रभात फेरी, युवकांमध्ये एचआयव्ही चाचणी करण्यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रमांचा समावेश आहे, असे जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एड्‌ससंदर्भात माहिती देताना डॉ. चाटे म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयात ऐच्छिक सल्ला व चाचणी केंद्र मे 2002 पासून सुरू झाले. या केंद्रात स्वेच्छेने आलेल्यांची मोफत चाचणी केली जाते. जिल्ह्यात 2 जिल्हा रुग्णालये, 3 उपजिल्हा रुग्णालये व 8 ग्रामीण रुग्णालये असून 1 नगर परिषद दवाखाना आहे. अशा 14 ठिकाणी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांत मे 2002 ते जुलै 2010 अखेर 54 हजार 292 जणांच्या रक्ताची तपासणी केली. यात 31 हजार 602 पुरुष, तर 22 हजार 690 महिलांचा समावेश आहे. यापैकी 2000 पुरुष आणि 1361 महिला असे एकूण 3 हजार 361 एचआयव्ही बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रमाणे 6.19 टक्के एवढे आहे. जुलै 2009 ते जुलै 2010 अखेर जिल्ह्यातील 7 हजार 66 पुरुषांची तर 6 हजार 616 स्त्रियांची तपासणी झाली. त्यामध्ये 252 पुरुष आणि 173 स्त्रिया अशा 429 जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून गेल्या वर्षात 21 जणांचा एड्‌सने मृत्यू झाला आहे. एचआयव्ही बाधितांमध्ये 25 ते 55 या वयोगटातील महिला, पुरुषांचा समावेश आहे. या रोगाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी तरुण आणि इतरांमध्ये जनजागृती आवश्‍यक आहे. यासाठी युवा दिनी "सुसंवाद आणि परस्पर सामंजस्य' हे घोषवाक्‍य ठेवून याचा प्रसार केला जात आहे.''

Read more...

Page 32 of 53

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya