Tuesday, Aug 21st

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

बातम्या आणि घडामोडी

एड्‌स जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखणार

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
२६ मे २०११
मुंबई, भारत

राज्यात एड्‌स रोगाविषयी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांचे नियोजन करणे, तसेच आमदारांनी आपल्या मतदारसंघात याबाबत कशाप्रकारे काम करावे यासाठी त्यांच्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे राज्य एड्‌स फोरमच्या बैठकीत आज ठरविण्यात आले.

विधानभवनात विधिमंडळ सदस्यांचा समावेश असलेल्या राज्यस्तरीय चर्चापीठाच्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीत फोरमचे मुख्य आश्रयदाते विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, फोरमचे अध्यक्ष मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, निमंत्रक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे तसेच फोरमचे सदस्य उपस्थित होते.
लग्नापूर्वी वधू-वराची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत जनजागृती करणे आवश्‍यक असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय फोरमचा कार्यक्रम तयार करावा, अशी सूचना वळसे-पाटील यांनी केली.

राज्यस्तरीय एड्‌स फोरमचे काम प्रभावीपणे होण्यासाठी फोरमचे कार्यालय विधिमंडळ परिसरात असावे, तसेच प्रत्येक लहान बालकापासून रक्ततपासणी करून घेण्याबाबत जागृती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत शेट्टी यांनी या वेळी व्यक्त केले.

Read more...

एड्‌सग्रस्तांना बरे करण्याचा दावा करणाऱ्याविरुद्ध वॉरंट

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
०२ डिसेंबर २०१०
पुणे, भारत

एड्‌स झालेल्या रुग्णांना बरे करतो, असे दावा करणाऱ्या डॉक्‍टरविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्याच्याविरुद्ध सहयोग ट्रस्टने न्यायालयात 2007 मध्ये तक्रार दिली होती.

डॉ. सिद्धार्थ जोंधळे (रा. नांदेड) असे त्याचे नाव आहे. त्याचे नांदेड येथे सिद्धार्थ रिसर्च सेंटर आहे. त्याने काही वृत्तपत्रात जाहिरात देऊन एचआयव्ही आणि एड्‌सच्या रुग्णांना आजारातून मुक्त करण्याचा दावा केला. 164 देशांचे पेंटट मिळाल्याचे, चार हजार रुग्णांना बरे केल्याचे, आफ्रिका येथे रुग्णांवर उपचार करीत असल्याचे त्याने नमूद केले होते. त्यास सहयोग ट्रस्टचे ऍड. असीम सरोदे यांनी आक्षेप घेत ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्‍टनुसार न्यायालयाकडे तक्रार दिली होती.

यासंदर्भात न्यायालयाने वेळोवेळी समन्स बजावूनही डॉ. जोंधळे हे हजर झाले नाहीत. त्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. बोस यांनी डॉ. जोंधळे यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला. अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे, असे ऍड. सरोदे यांनी सांगितले.

Read more...

एचआयव्हीग्रस्त मुलांना पाच पंचायतींचा आधार !

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
२२ नोव्हेंबर २०१०
बेळगाव, भारत

गरीब कुटुंबात एचआयव्ही पॉझिटिव्ह मुले असल्यास त्यांना आधार देणारे कोणीच नसते. मात्र, जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायती अशा मुलांना मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. या ग्रामपंचायतींनी एचआयव्हीग्रस्त मुलांना मासिक आर्थिक मदत देऊ केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायती राज्यात इतर ग्रामपंचायतींना आदर्श ठरल्या आहेत. 100 ते 500 रुपये प्रमाणे या ग्रामपंचायतींनी ही मदत देऊ केली आहे.

एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांना आवश्‍यक पौष्टिक आहार आणि प्रत्येक महिन्याला एआरटी औषध घेणे आवश्‍यक असते. पण, अशा गरीब मुलांना एआरटी औषध मिळविण्यासाठी महिन्याला 150 ते 200 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकदा एआरटी औषध घेण्यास सुरवात केल्यास ते कायम घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पण गरीब मुलांना अथवा त्यांच्या पालकांना असे उपचार परवडणारे नाहीत. ग्रामीण भागातील जनतेमध्ये ही समस्या अधिक आहे. अशा कुटुंबांना ओळखून ग्रामपंचायतींनी मासिक आर्थिक साहाय्य देण्यास सुरवात केली आहे.

अभिनव उपक्रम
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्‍यातील सोलापूर ग्रामपंचायतीने एचआयव्हीबाधित मुलांना मासिक आर्थिक मदत देण्यास सुरवात केली आहे. यासह अथणी तालुक्‍यातील कोकटनूर ग्रामपंचायत, संकोनट्टी ग्रामपंचायत, शिरगुप्पी ग्रामपंचायत, सौंदत्ती तालुक्‍यातील चचडी (पारसगड) ग्रामपंचायतींनी देखील मासिक आर्थिक मदत देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या एचआयव्हीग्रस्त मुलांना उपचारासाठी आधार मिळाला आहे.

हुक्केरी तालुक्‍यातील सोलापूर ग्रापंचायतीने ऑगस्ट 2010 मध्ये याबाबतच ठराव संमत करून 7 वर्षांच्या एचआयव्हीग्रस्त मुलाला मासिक 300 रुपये आर्थिक मदत देऊ केली आहे. चचडी ग्रामपंचायतीने 9 वर्षीय मुलाला 300 रुपयांची मासिक मदत, तर अथणी तालुक्‍यातील शिरगुप्पी ग्रामपंचायतीने दोघा मुलांना 200 रुपयांची मदत देऊ केली असून ही दोन्ही मुले एकाच मातेची आहेत. कोकटनूर ग्रामपंचायतीने 300 तर संकोनट्टी ग्रामपंचायतीने 500 रुपयांची मदत एचआयव्हीग्रस्त मुलांना देऊ केली आहे.

Read more...

'मिस्टर इंडिया'मुळे 'एचआयव्ही'बाधितांना प्रेरणा'

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
२४ नोव्हेंबर २०१०
पणजी, भारत

'एचआयव्ही'बाधित रुग्ण सर्वसामान्यांप्रमाणे सर्व गोष्टी कार्यक्षमपणे करू शकतो, हे दर्शविणारा 'मिस्टर इंडिया' हा मणिपुरी चित्रपट 'इंडियन पॅनोरॅमा'मध्ये प्रदर्शित करण्यात आला. 'एचआयव्ही'बाधित रुग्णांना प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने हा चित्रपट बनविण्यात आल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक हावबम पबनकुमार याने आज केले. यावेळी चित्रपटातील नायक प्रदीप कुमार सुद्धा उपस्थित होता. 'एचआयव्ही'बाधित रुग्ण सुद्धा जीवनात काही ना काही करू शकतो, हे दर्शविणारा हा 47 मिनिटांचा चित्रपट आहे.

चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक हावबम पबन कुमार म्हणाले, 'जीवनाचा आनंद कसा घ्यावा, हे शिकविणारा हा चित्रपट आहे. 'सत्यजित रे फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट', कोलकताच्या विद्यार्थ्यांनी या चित्रपटासाठी कष्ट उपसले आहेत. एकही पैसा न घेता सुमारे दोन वर्षे या विद्यार्थ्यांनी चित्रपटासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत. या मुलांमुळेच हा चित्रपट तयार झालेला आहे.

या चित्रपटातील कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. बालपणी ड्रग्ज बरोबर सीरिंजचा गैरवापर केल्याने खुंद्रकपम प्रदीपकुमार सिंग याला एचआयव्हीचा संसर्ग होतो. 2000 साली एचआयव्हीची बाधा झाल्याचे निदान त्याला होते. एचआयव्हीमुळे व्यायाम तथा शरीरसौष्ठवचा सराव न करण्याचा सल्ला डॉक्‍टर त्याला देतात. परंतु डॉक्‍टरांचा सल्ला जुगारुन प्रदीपकुमार व्यायामशाळेत जाऊ लागतो व कैक किताब पटकावतो. 2007 साली मिस्टर मणिपूर हा किताब त्याला मिळतो. याच किताबावर मी इंडिया हे नाव चित्रपटाला देण्यात आलेले आहे'. प्रदीपकुमार हा मणिपूरमधील एचआयव्हीबाधितांसाठी एक प्रेरणास्थान आहे.

मणिपूरमधील चित्रपटांबाबत बोलताना हावबम प्रदीप कुमार म्हणाले, "मणिपूरमध्ये वर्षाला साठ ते सत्तर सिनेमे तयार होतात. इतर प्रदेशांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. आसाममध्ये तर मणिपुरपेक्षाही कमी चित्रपटांची निर्मिती होते. आसामात वर्षाला सुमारे वीस चित्रपट तयार होतात.

Read more...

दुदैर्वी मागणी!

Print PDF
महाराष्ट्र टाइम्स
१९ नोव्हेंबर २०१०
ठाणे, भारत

एड्सवरील उपचारांसाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलातील डॉक्टरांनी पैसे मागितल्याचा आरोप केला जावा, यासारखी दुदैर्वाची गोष्ट नाही. एड्सच्या या रुग्णाला ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलामध्ये जाण्यास मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलातूनच सांगण्यात आले होते. त्यानुसार सदर रुग्ण ठाण्यातील हॉस्पिटलात गेल्यावर त्याला औषधे देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी संबंधित डॉक्टरांनी केली, असा आरोप आहे.

सरकारी हॉस्पिटलांत एड्सच्या रुग्णांना देण्यात येणारी एआरटी औषधे विनामूल्य दिली जातात, याचे स्मरण या रुग्णाने संबंधित डॉक्टरांना करून दिले; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एड्सच्या रुग्णाकडे खरोखरच असे पैसे मागितले गेले असले, तर त्याची संपूर्ण चौकशी व्हायला हवी आणि त्यामध्ये संबंधित डॉक्टर दोषी आढळले, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाईसुद्धा व्हायला हवी. याचे कारण असे की एआरटी ही औषधे एड्सवरील उपचारामध्ये अतिशय महत्त्वाची असतात. त्या औषधांच्या आधारानेच एचआयव्हीचा संसर्ग झालेली व्यक्ती आपले आयुष्य जगत असते. एका अर्थाने त्याच्या आयुष्याची दोरी ही त्या रुग्णाला योग्य त्या मात्रेमध्ये आणि योग्य त्या वेळी मिळणाऱ्या एआरटी औषधांवरच अवलंबून असते. ही औैषधे सरसकट सर्वच रुग्णांना परवडणारी नाहीत.

परंतु त्यामुळे औषधोपचाराविना राहण्याची वेळ कोणावर येऊ नये, यासाठी सरकारने पुढाकार घेऊन ही औषधे सरकारी हॉस्पिटलांमधून विनामूल्य वितरित करण्याची सोय केली. त्यामुळेच एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना मोठाच दिलासा मिळाला. याचे कारण असे की एखाद्याला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे कळले की आसपासच्या स्त्री-पुरुषांची 'त्या' व्यक्तीकडे पाहण्याची नजरही बदलून जाते. त्यामुळे आता आपल्याला कोणी तारणहार नाही, अशी भावना संबंधित व्यक्तीच्या मनात निर्माण होऊन ती मनाने अधिकच खचून जाते. एचआयव्हीमुळे त्या व्यक्तीचे शरीर दुबळे होऊ लागलेले असतेच; त्यातच मनसुद्धा कमकुवत झाल्यावर तर त्या व्यक्तीची अवस्था अधिकच कठीण होते.

Read more...

Page 3 of 11

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya