Tuesday, May 21st

Last update:09:36:12 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी

बातम्या आणि घडामोडी

धुळे जिल्हा रुग्णालयात आता एसटीडी क्‍लिनिक

E-mail Print
धुळे - गुप्तरोग व एचआयव्हीबाधित तरुणांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हा रुग्णालयात एसटीडी क्‍लिनिक सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत दोनशेपेक्षा अधिक रुग्ण गुप्तरोगाने बाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय व एड्‌स नियंत्रण सोसायटीतर्फे रुग्णालयामध्ये (ओपीडी क्रमांक 14) असुरक्षित शारीरिक संबंधातून पसरणाऱ्या आजारावर (गुप्तरोग) उपचारासाठी एसटीडी क्‍लिनिक सुरू केले आहे. लैंगिक आजार व एचआयव्हीचा जवळचा संबंध आहे. लैंगिक आजार असणाऱ्या व्यक्तींने एचआयव्हीबाधित व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास एचआयव्हीची बाधा होण्याची शक्‍यता पाच ते दहा पटींनी वाढते. या आजाराची लक्षणे स्त्रिया व पुरुषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात, त्यामुळे पेच वाढतो, यासाठी नैतिकता राखून आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे चांगले असते; परंतु ज्यांना गुप्तरोग झालेला आहे. त्यांनी तपासणी करून उपचार करून घेणे केव्हाही चांगलेच असते. परंतु, अनेकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. आजार लपविल्यास तो वाढण्याची आणि पसरण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे आजार बळावत असल्याचेही दिसून आले आहे. काही आजार वेदनादायक, तर काही वेदनारहित असतात. त्यामुळे त्यांचे गांभीर्य अनेकांना समजत नाही. यापार्श्‍वभूमीवर रुग्णांना स्वतंत्रपणे व चांगले उपचार मिळावेत, आजाराविषयी माहिती मिळावी, यासाठी ही वैद्यकीय उपचार व्यवस्था देण्यात येत आहे. क्‍लिनिकमध्ये त्वचा व गुप्तरोग विभागप्रमुख डॉ. आर. टी. बागले, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. वैशाली गावंडे, डॉ. सुजाता सोनवणे यांच्यासह समुपदेशक प्रवीण सूर्यवंशी काम पाहतात.

Page 43 of 52

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aaraogya

 

Follow us