Tuesday, Aug 21st

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

बातम्या आणि घडामोडी

'एचआयव्ही'सह जगणाऱ्या गरोदर मातांच्या संख्येत घट

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
२९ नोव्हेंबर २०१०
मुंबई, भारत

देशात "एचआयव्ही'सह जगणाऱ्या गरोदर मातांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाली आहे. देशात 2001 मध्ये "एचआयव्ही'ची लागण झालेल्या सुमारे 25 लाख व्यक्ती होत्या, त्यात राज्यातील सात लाख जणांचा समावेश असल्याचे "एमडीएसीएस'च्या आकडेवारीतून दिसून आले होते; मात्र आता हे प्रमाण कमी झाले असून "एचआयव्ही'सह जगणाऱ्यांची संख्या आज या शहरामध्ये 89 हजार 95 इतकी आहे.

मुंबईतील सात "एआरटी' केंद्रांमध्ये "एमडीएसीएस'च्या वतीने 2009-2010 या वर्षी 56 हजार 929 व्यक्तींनी "पीएलए'ची लागण झाल्याची नोंद केली होती, त्यापैकी 17 हजार दोन रुग्ण एचआयव्ही एआरटी लाईनवर होते. 2005 मध्ये हेच प्रमाण 1.24 टक्के इतके होते, पण आता ते घसरून 0.53 इतके झाले आहे. तसेच ऐच्छिक रक्तदात्यांमधील लागण होण्याचे हे प्रमाण 2005 च्या तुलनेत 0.70 टक्‍क्‍यांनी घसरून 2010 मध्ये 0.40 टक्के इतके झाले आहे. मुंबईतील समुपदेशन व चाचणी केंद्रांमध्ये गरोदर मातांसाठी सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक कार्यक्रमामुळे हा सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले आहे. पालिका उपायुक्त आणि मुंबई जिल्हा एड्‌स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. एस. एस. कुडाळकर यांनी केलेल्या पाहणीमध्ये हे आढळून आले आहे. वैद्यक शास्त्रामध्ये झालेली क्रांती, एआरटी सेंटर्सची वाढती उपलब्धता, तसेच विविध वस्त्यांमधून केलेले जनजागृती कार्यक्रम यांच्या एकत्रित परिणामामुळे "एचआयव्ही'चे प्रमाण घटत असल्याचे दिसून आले आहे.

"एचआयव्ही'ची लागण रोखण्यासाठी "एमडीएसीएस'तर्फे प्रतिबंधात्मक लक्ष्य ठरवले असून ज्यांच्यामध्ये एचआयव्हीची लागण अधिक होते, त्या वस्त्यांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

'मिस्टर इंडिया'मुळे 'एचआयव्ही'बाधितांना प्रेरणा'

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
२४ नोव्हेंबर २०१०
पणजी, भारत

'एचआयव्ही'बाधित रुग्ण सर्वसामान्यांप्रमाणे सर्व गोष्टी कार्यक्षमपणे करू शकतो, हे दर्शविणारा 'मिस्टर इंडिया' हा मणिपुरी चित्रपट 'इंडियन पॅनोरॅमा'मध्ये प्रदर्शित करण्यात आला. 'एचआयव्ही'बाधित रुग्णांना प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने हा चित्रपट बनविण्यात आल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक हावबम पबनकुमार याने आज केले. यावेळी चित्रपटातील नायक प्रदीप कुमार सुद्धा उपस्थित होता. 'एचआयव्ही'बाधित रुग्ण सुद्धा जीवनात काही ना काही करू शकतो, हे दर्शविणारा हा 47 मिनिटांचा चित्रपट आहे.

चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक हावबम पबन कुमार म्हणाले, 'जीवनाचा आनंद कसा घ्यावा, हे शिकविणारा हा चित्रपट आहे. 'सत्यजित रे फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट', कोलकताच्या विद्यार्थ्यांनी या चित्रपटासाठी कष्ट उपसले आहेत. एकही पैसा न घेता सुमारे दोन वर्षे या विद्यार्थ्यांनी चित्रपटासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत. या मुलांमुळेच हा चित्रपट तयार झालेला आहे.

या चित्रपटातील कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. बालपणी ड्रग्ज बरोबर सीरिंजचा गैरवापर केल्याने खुंद्रकपम प्रदीपकुमार सिंग याला एचआयव्हीचा संसर्ग होतो. 2000 साली एचआयव्हीची बाधा झाल्याचे निदान त्याला होते. एचआयव्हीमुळे व्यायाम तथा शरीरसौष्ठवचा सराव न करण्याचा सल्ला डॉक्‍टर त्याला देतात. परंतु डॉक्‍टरांचा सल्ला जुगारुन प्रदीपकुमार व्यायामशाळेत जाऊ लागतो व कैक किताब पटकावतो. 2007 साली मिस्टर मणिपूर हा किताब त्याला मिळतो. याच किताबावर मी इंडिया हे नाव चित्रपटाला देण्यात आलेले आहे'. प्रदीपकुमार हा मणिपूरमधील एचआयव्हीबाधितांसाठी एक प्रेरणास्थान आहे.

मणिपूरमधील चित्रपटांबाबत बोलताना हावबम प्रदीप कुमार म्हणाले, "मणिपूरमध्ये वर्षाला साठ ते सत्तर सिनेमे तयार होतात. इतर प्रदेशांच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. आसाममध्ये तर मणिपुरपेक्षाही कमी चित्रपटांची निर्मिती होते. आसामात वर्षाला सुमारे वीस चित्रपट तयार होतात.

Read more...

एचआयव्ही'बाधित कुटुंबाचा मुक्काम रुग्णालयात

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
०१ नोव्हेंबर २०१०
पुणे, भारत

आई गंभीर आजारी. वडिलांनाही तोच आजार जडलेला. त्यामुळे दोघेही रुग्णालयात. त्यांच्या आजाराची वाच्यता झाल्याने त्यांच्या दोन मुलांना नातेवाइकांनी दूर लोटले. त्यामुळे दोन्ही मुलांचा मुक्कामही रुग्णालयातच. या स्थितीत "एचआयव्ही'बाधित कुटुंबाची जगण्याची धडपड गेल्या महिनाभरापासून सुरू आहे.

"एचआयव्ही'बाधित असल्याने लोकांच्या त्रासामुळे भाड्याने घेतलेले घरदेखील सोडावे लागले. परिणामी मुलांसह रुग्णालयात राहण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने या कुटुंबाला आर्थिक मदत केल्याने त्यांचे जगणे काहीसे सुकर झाले होते. मात्र, "एचआयव्ही'बाधित असल्याचे लक्षात आल्याने त्या भागातील नागरिकांनी त्रास द्यायला सुरवात केली. त्यामुळे नाइलाजाने घर सोडणे भाग पडले.

दरम्यानच्या काळात "एचआयव्ही'बाधित असलेली पत्नी आजारी पडल्याने दहा दिवस ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. काहीसे बरे वाटू लागल्याने अकोला येथे माहेरी गेलेल्या या माहेरवाशिणीला पाच-सात दिवसांतच माहेरचा निरोप घ्यावा लागला. दोन दिवसांपूर्वी त्यांना पुण्यात परत आणले. प्रवासात प्रचंड त्रास झाला. सध्या पिंपरीतील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असले तरी तब्येत आणखी खालावली आहे. पती-पत्नी आणि दोन मुलांमधील एक मुलगा वगळता उर्वरित तिघे "एचआयव्ही'बाधित आहेत. या कुटुंबाला सध्या गरज आहे ती मानसिक आधाराची आणि आर्थिक मदतीची. मात्र, जवळच्या असणाऱ्या आई-वडील, सासू-सासऱ्यांपासून कुणीही आप्त चौकशी करायलाही तयार नाहीत.

या कुटुंबाला गेल्या तीन वर्षात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने सुमारे पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे. व्यवसाय करण्यासाठीदेखील मदत केली आहे. या कुटुंबाला तसेच अशा प्रकारच्या कुटुंबांना आर्थिक मदत करणाऱ्या इच्छुकांनी 020-24489999 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read more...

एड्‌सग्रस्त मुलांना ओरिसात मोफत घरे

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
२८ ऑक्टोबर २०१०
भुवनेश्‍वर, भारत

ओरिसात एड्‌सग्रस्त मुलांना मोफत घरांचे वाटप केले जाणार आहे. राज्यात 818 मुले "एचआयव्ही' बाधित असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात शंभर मुलांना "मो कुदिया योजने'अंतर्गत मोफत घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने निश्‍चित केलेली ही मुले 13 जिल्ह्यांतील असून, त्यांच्यावर राज्यभरातील विविध सरकारी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या मुलांना मोफत घरे देण्यासंबंधीचा अध्यादेश राज्य सरकारने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जारी केला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात सुमारे साडेदहा हजार एड्‌सबाधित रुग्ण असून, त्यात पाच हजार 778 पुरुष, तीन हजार 762 स्त्रिया आणि 818 मुलांचा समावेश आहे. गरीब कुटुंबातील एड्‌सबाधित रुग्णांचा समावेश दारिद्य्ररेषेखालील कुटुंबात करण्यात यावा, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.

Read more...

नवरात्रीत रंगणार आता "पॉझिटिव्ह' जागर!

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
१४ ऑक्टोबर २०१०
मुंबई, भारत

एचआयव्हीसह जगणाऱ्यांचे प्रमाण खूप वेगाने वाढत असले; तरीही या "पॉझिटिव्ह' लोकांविषयी सर्वसामान्यांच्या मनात अद्यापही अढी आहे. पॉझिटिव्ह लोकांविषयी असलेले अनेक उलटसुलट गैरसमज व एचआयव्हीचा नेमका प्रादुर्भाव कसा होतो, याची माहिती देण्यासाठी यंदा नवरात्रोत्सव मंडळांनी "पॉझिटिव्ह जागर' सुरू केला आहे. शहरांतील अनेक नामवंत नवरात्रोत्सव मंडळांनी या सोहळ्यानिमित्त एकत्र येणाऱ्या गरबाप्रेमींना एचआयव्हीबाबत नेमकी माहिती देण्यासाठी यावर्षीपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. आदेश बांदेकरच्या मराठमोळ्या दांडियामध्येही यंदा "पालवी'सारख्या संस्था राबवीत असलेल्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

नवरात्रीनंतर गर्भपातासाठी येणाऱ्या कुमारवयीन मुलींचे प्रमाणही वेगाने वाढते आहे, याबाबत काही ठोस आकडेवारी उपलब्ध नसली, तरीही हे प्रमाण वाढते असल्याचे बॉम्बे रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुषा रेड्डी सांगतात. म्हणूनच या वेळी आरोग्यावर काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांनी या विषयावर; तसेच असुरक्षित संबंधातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक प्रश्‍नांबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी नवरात्र मंडळांशी संपर्क साधून जनजागृतीचा उपक्रम यंदा राबविण्यात आला आहे.

महाराष्ट्र एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या माध्यमातूनही गणेशोत्सव, नवरात्रोत्सवामध्ये हे उपक्रम राबविण्यात येतात. एचआयव्हीसह जगणाऱ्या माणसांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा, नव्या उपचारपद्धती, दृष्टिकोन बदलण्याची निकड, यासारख्या विविध गोष्टींवर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये मंडळे जनजागृती करीत आहेत. दांडिया खेळण्यासाठी आलेली ही सारी युवा मंडळी "फेस्टिव्हल' मूड मध्ये असली, तरीही तीनेक मिनिटांसाठी या विषयांवर असलेल्या लघुनाट्याचा खूप मोठा प्रभाव होतो. एचआयव्ही नेमका काय आहे, याची माहिती अनेकांना असतेच; पण तो रोखण्यासाठी व टाळण्यासाठी काय करायला हवे, याचीही विचारणा त्या वेळी "ऍव्हर्ट'सारख्या संस्थेचे आरोग्यदूत करतात.

Read more...

Page 5 of 11

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya