Tuesday, Aug 21st

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

बातम्या आणि घडामोडी

सिंधुदुर्गात वर्षभरात "एड्‌स'चे 1221 रुग्ण

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
११ ऑगस्ट २०१०
सिंधुदुर्गनगरी, भारत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षभरात 1221 एड्‌सचे रुग्ण आढळले. राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त गुरुवारी (ता. 12) जिल्हास्तरावर युवकांसाठी एचआयव्ही एड्‌सबाबत मार्गदर्शन उपक्रमांचे आयोजन केले आहे. 12 ते 19 या सप्ताहामध्ये आयोजित कार्यक्रमात जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी होऊन एड्‌सविषयी माहिती करून घ्यावी. चाचणीही करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विक्रमकुमार अरोरा यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत याचे आयोजन केले आहे. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयसिंग दाभाडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. आर. कुलकर्णी, माहिती अधिकारी सदाशिव कांबळे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. एन. डी. खोत, डॉ. ननावरे आदी उपस्थित होते.

या वेळी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. खोत म्हणाले, ""या सप्ताहानिमित्त 12 ला रॅली होईल. जिल्ह्यात एक युवक मेळावा होईल. या उपक्रमात महाविद्यालयीन युवक-युवती तसेच इतर युवक-युवतींचा सहभाग राहील. एचआयव्ही चाचणी करण्याची आवश्‍यकता या विषयावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची व्याख्यानमाला होईल. युवक-युवतींना एड्‌सविषयी मार्गदर्शन आणि पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व कार्यप्रणालीविषयी युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येकाने एचआयव्ही चाचणी करावी की नाही, या विषयावर वादविवाद स्पर्धा, परिसंवाद आदी उपक्रम घेतले जातील.''

Read more...

जिल्ह्यात आवळला जातोय एड्‌सचा "पाश'

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
११ ऑगस्ट २०१०
रत्नागिरी, भारत

जिल्ह्यात "एड्‌स'चा पाश आवळत असून गेल्या आठ वर्षांत दोन हजार पुरुष, तर एक हजार 361 महिलांना एचआयव्ही झाल्याचे स्पष्ट झाले असून हे प्रमाण 6.19 टक्के एवढे आहे. गेल्या वर्षभरात 429 जणांना बाधा झाली असून, त्यापैकी 21 जणांचा एड्‌सने मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंगद चाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्टला साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य एचआयव्ही बाधित युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र करून युवकांना सक्षम करणे अपेक्षित आहे. एड्‌सविरुद्धचा लढा यशस्वीपणे लढून समाजातील कलंक व भेदभावाची भावना कायमस्वरूपी मिटवून टाकण्यास युवाशक्तीचा उपयोग होईल. ही जाणीव ठेवूनच महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेने या दिनानिमित्त जिल्हा स्तरावर खास युवकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आले आहे. त्यामध्ये प्रभात फेरी, युवकांमध्ये एचआयव्ही चाचणी करण्यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रमांचा समावेश आहे, असे जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एड्‌ससंदर्भात माहिती देताना डॉ. चाटे म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयात ऐच्छिक सल्ला व चाचणी केंद्र मे 2002 पासून सुरू झाले. या केंद्रात स्वेच्छेने आलेल्यांची मोफत चाचणी केली जाते. जिल्ह्यात 2 जिल्हा रुग्णालये, 3 उपजिल्हा रुग्णालये व 8 ग्रामीण रुग्णालये असून 1 नगर परिषद दवाखाना आहे. अशा 14 ठिकाणी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांत मे 2002 ते जुलै 2010 अखेर 54 हजार 292 जणांच्या रक्ताची तपासणी केली. यात 31 हजार 602 पुरुष, तर 22 हजार 690 महिलांचा समावेश आहे. यापैकी 2000 पुरुष आणि 1361 महिला असे एकूण 3 हजार 361 एचआयव्ही बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रमाणे 6.19 टक्के एवढे आहे. जुलै 2009 ते जुलै 2010 अखेर जिल्ह्यातील 7 हजार 66 पुरुषांची तर 6 हजार 616 स्त्रियांची तपासणी झाली. त्यामध्ये 252 पुरुष आणि 173 स्त्रिया अशा 429 जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून गेल्या वर्षात 21 जणांचा एड्‌सने मृत्यू झाला आहे. एचआयव्ही बाधितांमध्ये 25 ते 55 या वयोगटातील महिला, पुरुषांचा समावेश आहे. या रोगाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी तरुण आणि इतरांमध्ये जनजागृती आवश्‍यक आहे. यासाठी युवा दिनी "सुसंवाद आणि परस्पर सामंजस्य' हे घोषवाक्‍य ठेवून याचा प्रसार केला जात आहे.''

Read more...

'त्यांना' जोडीदार हवाय फक्त 'समजून घेणारा'

Print PDF
पुढारी
०९ ऑगस्ट २०१०
सोमनाथ गर्जे
पुणे,भारत

’वेक-पुणे’ने दिला ३२ जणांना हक्काचा आधार
'त्यांना' जोडीदार हवाय फक्त 'समजून घेणारा'
समाजात ’लिव्ह-इनरिलेशन’वर उलट-सुलट चर्चा झडत असताना, समाजशील प्राणी असलेल्या मानवाला एकमेकांच्या आधाराची किती गरज असते याचा प्रत्यय पदोपदी येत असतो. त्यात एड्सग्रस्तही कसे मागे राहणार? जीवनात नकळत झालेल्या चुकीमुळे आपला जोडीदारच गमावून बसलेले 'एचआयव्ही'ग्रस्तही आपले उर्वरित आयुष्य आपल्या जोडीदारासोबत घालवण्यासाठी धडपडत असतात पण त्यांना पैसेवाला, गाडी-माडीवाला नाही तर जोडीदार हवा असतो तो केवळ 'समजून घेऊन आयुष्याची वाट चालणारा...'

आयुष्यात नकळत, आज्ञानामुळे झालेल्या चुकांमुळे जीवनाचा जोडीदारच गमावण्याची वेळ अनेकांवर आली आहे. जोडीदाराप्रमाणेच आपल्या आयुष्याचीही रेषा फार लांब नाही, याची जाणीव त्यांनाही आहे, परंतु तरीही आपल्या हक्काच्या जीवनसाथीसोबत जगण्याची त्यांना अतिव इच्छा आहे. त्यांना केवळ स्वतःला समजून घेऊन बरोबरीने जीवनाची वाट चालणार्‍या जोडीदाराची गरज आहे. मग त्यापुढे जात-धर्म, प्रांत, भाषा आणि पैसा या सर्व गोष्टी गळून पडल्या आहेत...

एचआयव्हीग्रस्तांना हक्काचा जोडीदार मिळण्यासाठी ’वेक-अप पुणे’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. वेक-अप ही विविध सहा स्वयंसेवी संस्थांनी मिळून स्थापन केलेल्या स्वयंसेवी संघटनांची एकत्रित (शिखर) संस्था आहे. त्यांच्या वतीने एचआयव्हीग्रस्तांसाठी नुकतेच पुण्यात वधुवर-सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याची माहिती वेक-अप, पुणे या शिखर संस्थेतील एक असणार्‍या ’आरोग्य डॉट कॉम’ या संकेत स्थळाचे संचालक आनंद शिंदे यांनी ’पुढारी’स माहिती दिली.

Read more...

एचआयव्ही'बाबत संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
०४ ऑगस्ट २०१०
योगीराज प्रभुणे
पुणे, भारत

पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सिद्धार्थ शहा या विद्यार्थ्याने केलेल्या "एचआयव्ही'च्या रुग्णांना झालेला अतिसार' यावरील संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय परिषदेला हजेरी लावणारा हा देशातील पहिलाच विद्यार्थी ठरला. विशेषत: "एचआयव्ही'मध्ये संशोधन करून संबंधित रुग्णांसाठी काम करण्याचे त्याचे उद्दिष्ट असल्याचे त्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले.

इतर देशांच्या तुलनेत भारतात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचे प्रमाण फारच कमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याची सुरवात विद्यार्थिदशेपासून केली पाहिजे. त्यासाठी "भारतीय वैद्यक संशोधन परिषदे'ने (आयसीएमआर) वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या देशातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून विशेष योजना सुरू केली. त्याअंतर्गत देशभरातून 700 संशोधन प्रकल्प "आयसीएमआर'ला सादर करण्यात आले होते. त्यात सिद्धार्थने "एचआयव्ही'वरील संशोधन प्रकल्प सादर केला होता. गुणवत्ता आणि दर्जानुसार "आयसीएमआर'ने प्रकल्प व्हिएन्ना येथील परिषदेसाठी पाठविला होता. त्यात हा प्रकल्प स्वीकारण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतातील पहिला विद्यार्थी म्हणून संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करण्याची संधी सिद्धार्थला मिळाली, अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण जामकर यांनी दिली.

सध्या "एमबीबीएस'च्या तिसऱ्या वर्षाला असलेला सिद्धार्थ म्हणाला, 'या प्रकल्पासाठी माझे शिक्षक आणि वरिष्ठ यांचे मोठे सहकार्य मिळाले. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याची इच्छा आहे. त्यातही विशेषतः "एचआयव्ही'मध्ये पुढे संशोधन करून रुग्णांसाठी त्याचा उपयोग करायचा आहे.''

मे महिन्यात हा संशोधन प्रकल्प "आयसीएमआर'ला सादर केला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय परिषदेकडे पाठविण्यात आला. त्यात निवड झाल्यानंतर 19 ते 23 जुलैदरम्यान या परिषदेला उपस्थित होतो, असे त्याने सांगितले.

Read more...

एचआयव्हीत बागलकोट जिल्हा देशात तिसरा

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
०४ ऑगस्ट २०१०
भीमगोंडा देसाई
बेळगाव, भारत

कर्नाटकातील बागलकोट जिल्हा एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत देशात तिसरा आहे. नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (नॅको) अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. यामुळे या जिल्ह्यातील प्रत्येकाच्या घरात जाऊन एचआयव्ही व एड्‌ससंबंधी जनजागृती करण्याचे काम सध्या सुरू आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक एचआयव्हीग्रस्त असलेल्या जमखंडी, मुधोळ या दोन तालुक्‍यांत अशा प्रकारचे जनजागृतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तालुक्‍यांत लवकरच जनजागृतीचे काम सुरू होणार आहे. या जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्तांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे येथे अधिक जागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्तांची संख्या कमी करण्यासाठी राज्यातील आरोग्य विभाग स्वयंसेवी संस्थेच्या मदतीतून धडपडत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्‍यात 1986 मध्ये कर्नाटकात पहिला एचआयव्हीचा रुग्ण मिळाला. शासनाच्या आरोग्य विभाग स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून जनजागृतीचा जोरदार धडाका लावला. जनजागृतीवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करू लागले. एचआयव्हीग्रस्तांची मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी एआरटी केंद्र सुरू करण्यात आले. यामुळे या आजाराबद्दल सुशिक्षितांबरोबरचे अशिक्षितांमध्येही चांगली जनजागृती झाल्याचे दिसते.

एचआयव्हीबाधित व्यक्ती उपचारासाठी एआरटी केंद्रात खुलेपणाने येत आहेत. गर्भश्रीमंत एचआयव्हीग्रस्त काही लोक समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी खासगी दवाखान्यात महागडे उपचार घेत आहेत. उपचारांसाठी रुग्ण बाहेर येत असल्यामुळे कोणत्या गावात, तालुक्‍यात, जिल्ह्यात, राज्यात किती एचआयव्ही व एड्‌सग्रस्त लोक आहेत, याचा नेमका आकडा स्पष्ट होत आहे.

Read more...

Page 7 of 11

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya