Tuesday, Aug 21st

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

बातम्या आणि घडामोडी

अनिता जाधवने करायचं काय ?

Print PDF
महाराष्ट्र टाइम्स
०३ ऑगस्ट २०१०
प्रगती बाणखेले

एचआयव्हीबद्दलच्या जागरुकतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही एचआयव्हीबाधित व्यक्तींना समाजात सामावून घेणं तर सोडाच पण साधी माणुसकीची वागणूक देण्याइतकीही मानसिकता अद्याप तयार झालेली नाही, याचे भयावह उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आले आहे. पतीच्या निधनानंतर स्वत:च्या पायावर उभी राहून मुलांना जिद्दीने मोठे करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ३०वषीर्य अनिता जाधवचं(नाव बदलले आहे) जगणं गावकऱ्यांनी इतकं असह्य केलं की तीन वर्षांनंतर तिला अखेर गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

अनिता लोंघे गावची रहिवाशी. गगनबावडा तालुक्यातील हे पाचशे लोकवस्तीचे गाव. तीन वर्षांपूवीर् तिचे पती चंदकांत एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. दोनच महिन्यांत त्यांचे निधन झाले. पदरी १२ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी. माहेरी कुणीही नाही. पतीच्या निधनानंतर केलेल्या तपासणीत अनिता आणि तिची मुलगी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आणि तिची परवड सुरू झाली. अनिता अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती. अंगणवाडीत गावातील ४०-४५ मुलं. मुलांना तिच्यापासून संसर्ग होऊ शकतो असे सांगत गावकऱ्यांनी तिला अंगणवाडीत येण्यास मनाई केली. तू घरी बसून पगार घे असे त्यांचे म्हणणे. मुलांना काहीही धोका नाही, हे परोपरीने विनवूनही गावकऱ्यांचा हेका कायम होता. अनिता राजीनामा देत नाही हे बघून गावकऱ्यांनी मुले पाठवणे बंद केले. गावात वेगळी अंगणवाडी सुरू झाली. गाववर्गणीतून पगार देत नवी सेविका नेमली गेली. मुलेच नसलेल्या अंगणवाडीत रोज जाऊन करायचं काय हा प्रश्ान् अनितासमोर उभा होता.

सर्व प्रयत्न थकले

Read more...

१० एचआयव्हीबाधित जोडपी 'रेशीमगाठी'त गुंफणार

Print PDF
लोकमत
०२ ऑगस्ट २०१०
पुणे, भारत

पुणे, दि. १ (प्रतिनिधी) : 'एचआयव्ही बाधित' या नुसत्या कल्पनेनेही हादरून जाणाऱ्या समाजव्यवस्थेत अशा लोकांशी रक्ताचे नाते असणारेही जिथे दूर पळतात. तेथे अशा लोकांचे लग्न होणे किवा ते करण्यासाठी प्रयत्न करणे ही बाबच अविश्वसनीय आहे. मात्र, काही सामाजिक संस्था आणि समाजसेवी विचारांच्या लोकांच्या प्रयत्नातून या 'कम्युनिटी'चे लोक एकत्र आले आणि त्यांच्याही आयुष्याच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार असून, बदलत्या समाज रचनेचे द्योतक म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.

आरोग्य डॉट कॉम, वेक अप पुणे, दीपगृह, पॉझिटिव्ह साथी डॉट कॉम यांनी संयुक्तपणे एचआयव्हीबाधितांसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यासाठी इंदूर, हैदराबाद, रांची, गोवा, गुजरातसह महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, धुळे, कोल्हापूर येथून सुमारे १२३ पुरुष आणि ४२ स्त्तियांची उपस्थित होती. मेळाव्यातून १० जोडप्यांनी लग्न करण्याचे जाहीर केले आहे. लग्न ठरलेली ४ जोडपी पुण्यातील असून, उर्वरित ६ जण गुजरात व गोवा येथील आहेत. यावेळी वधू-वरांसोबत आलेल्या पालकांचेही समुपदेशन करण्यात आले. तर एआरटीचे दुष्परिणाम, हेपॅटायटीस ए आणि बीसाठीचे लसीकरण, फॅमिली प्लॅनिग, एचआयव्ही पॉझिटिव्ह गर्भवती महिलेने आहार कोणत्या प्रकारचा घ्यावा, काय काळजी घ्यावी, अशा अनेक एचआयव्ही पॉझिटिव्ह जोडप्यांच्या प्रश्नांना डॉक्टरांनी उत्तरे दिली.

Read more...

एचआयव्हीग्रस्त मुलीने फसवले 'स्पंदन'ने वाचवले

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
१३ जुलै २०१०
भीमगोंडा देसाई
बेळगाव, भारत

अन्य तरुणींसारखेच तिनेही लग्नाचं स्वप्न पाहिलं. त्यानुसार तिचं लग्न ठरलं आणि ते यादी पे शादी स्वरूपात पारही पडलं. परंतु त्या मुलीच्या नातेवाइकांनी आणि तिने आपल्याला मुलीला एचआयव्हीची लागण झालेली आहे, हे मुलाला व त्याच्या कुटुंबाला समजून दिले नाही. ही माहिती जेव्हा एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणाऱ्या स्पंदन या संस्थेला कळाली, तेव्हा पदाधिकाऱ्यांनी हस्तेक्षप करून लग्न मोडले.

लग्न मोडल्यामुळे त्या तरुणांचे उद्‌ध्वस्त होणारे जीवन वाचले. गोकाकनजीक काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आहे. रितसर लग्न मोडण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे स्पदंनचे अध्यक्ष महांतेश माळी यांनी "सकाळ'ला सांगितले.

गोकाकपासून पाच किलोमीटर अंतरावर मुलीचे, तर सुमारे बारा किलोमीटर अंतरावर मुलाचे गाव आहे. मुलीच्या आई-वडिलांचा दोन वर्षांपूर्वी एडस्‌ने मृत्यू झाला. त्यामुळे ती मुलगी मामाकडे राहते. तिचे शिक्षण दहावी झाले असून मुलीलाही एचआयव्हीची लागण झाली आहे. हे घरातील सर्व मंडळींना व त्या मुलीच्या नातेवाइकांनाही माहिती आहे. हे माहिती असूनही तिच्या नातेवाइकांनी त्या मुलीचे लग्न करण्याचा घाट घातला. आठवड्यापूर्वी मुलीला पाहण्यासाठी मुलगा आला. घराणे श्रीमंत व सुखी असल्याचे पाहून त्याने मुलीला पसंत केली. रात्री साडेदहा वाजता "यादी पे शादी लग्न'ही लागले. गावातील मोजक्‍या मंडळींनी व जवळच्या नातेवाइकांनी लग्नाला हजेरी लावली होती; मात्र माहिती असूनही एकानेही लग्न ठरवताना किंवा झाल्यानंतरही त्या मुलीला एचआयव्हीची लागण झाली आहे, असे सांगितले नाही. लग्न पार पडल्यानंतर मुलगीला काही दिवसांनंतर नांदायला सासरी पाठविण्याचे नियोजन होते.

Read more...

एड्‌स झाल्याचे लपविणाऱ्या वराचे फोडले बिंग

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
२९ जुन २०१०
हैदराबाद, भारत

नियोजित वधूसह तिच्या कुटुंबीयांना विश्‍वासात न घेता बोहल्यावर चढण्याचा "एचआयव्ही'बाधित तरुणाचा विवाहाचा प्रयत्न आंध्र प्रदेश पोलिसांनी हाणून पाडला आहे. गुंटूर शहरात ही घटना घडली. बिंग फुटल्यानंतर या नवरदेवाने लग्नस्थळावरून पोबारा केला.

एन. प्रसन्नकुमार असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या नात्यातील तरुणीशी तो विवाह करणार होता; परंतु विवाहाअगोदर एका अज्ञात व्यक्तीने प्रसन्नकुमारला एड्‌स असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी चर्चमध्ये जाऊन प्रसन्नकुमारला ताब्यात घेतले; सरकारी रुग्णालयात त्याची लगेचच तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला तर विवाहात अडथळा आणणार नाही, असे आश्‍वासन पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना दिले.

काही वेळाने डॉ. कृष्णा कुमारी यांनी प्रसन्नकुमारकडे वैद्यकीय चाचणीचा अहवाल सोपविला. या विवाहाविषयी पुनर्विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. अहवालात नेमके काय आहे, याची माहिती डॉ. कुमारी यांनी इतरांना दिली नाही. दरम्यानच्या काळात आपली फसवणूक झाल्याचा आरोप करीत कॅथरिन आणि तिच्या कुटुंबीयांनी या विवाहास नकार दिला. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच प्रसन्नकुमारने वैद्यकीय अहवालासह पोबारा केला.

Read more...

एचआयव्ही'बाधित मुलाचा विक्री'नंतर मृत्यू

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
०३ जुन २०१०
पुणे, भारत

"एचआयव्ह'बाधित मुलाची बेकायदेशीररीत्या एक लाख रुपयांना विक्री करून, फसवणूक केल्याच्या आरोपावरून येरवडा पोलिसांनी गुरुकुल गोदावरी बालक आश्रम या संस्थेच्या अध्यक्षाला अटक केली आहे. या आरोपीला चार जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या मुलाचे आता निधन झाले आहे.

या प्रकरणी अनिता अरुण यादव (रा. गोरेगाव, मुंबई) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आश्रमाचा संचालक मॅथ्यू रायप्पा यानमल (वय 39, रा. जे. जे. चेंबर्स, चित्रा चौक, येरवडा) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानमल हा गुरुकुल गोदावरी बालक आश्रम या संस्थेचा अध्यक्ष आहे. त्याने यादव यांना, गेल्या वर्षी आश्रमातून एक मूल दत्तक दिले होते. त्या बदल्यात त्याने एक लाख रुपये घेतले होते. मुलगा दत्तक देण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी आवश्‍यक होती. ती न घेताच यानमलने मुलाचा ताबा यादव यांना दिला. हा मुलगा "एचआयव्ही'बाधित असल्याची माहिती यानमलला होती. ती माहिती त्याने यादव यांच्यापासून लपविली. हा मुलगा काही महिन्यांनंतर मरण पावला. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार यादव यांनी केली होती.

पोलिसांनी यानमलला अटक करून, बुधवारी न्यायालयात हजर केले. यादव यांना दत्तक दिलेले मूल कोठून आणले होते, ते कोणाकडून घेतले याची माहिती आरोपीकडून घ्यायची आहे, अशी माहिती सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयास दिली. गुरुकुल गोदावरी बालक आश्रमास मुले दत्तक देण्याची आणि सांभाळण्याचा परवाना नाही. त्या संदर्भात तपास करून संस्थेची कागदपत्रे हस्तगत करायची आहेत, आरोपीने बेकायदेशीरपणे किती आणि कोणाला मुले दत्तक दिली याची माहिती गोळा करायची आहे, या संस्थेच्या इतर संचालक मंडळाचा शोध घेऊन त्यांना अटक करायची आहे; तसेच आश्रमात असणाऱ्या बालकांविषयी माहिती गोळा करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी बेंडभर यांनी न्यायालयाकडे केली.

Read more...

Page 8 of 11

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya