Tuesday, Aug 21st

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

बातम्या आणि घडामोडी

एड्‌सबाधिताच्या पाठीशी ड्रॉप इन- सेंटर

Print PDF
सकाळ वृत्तसेवा
१० मे २०१०
धुळे, भारत

येथे एचआयव्ही, एड्‌सनिर्मूलन- प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धुळे शहरात ड्रॉप इन सेंटर सुरू करण्यात आले आहे. एचआयव्हीबाधितांना जनजागृती, मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी सेंटरच्या माध्यमातून काम होत आहे.

येथील जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रात सुमारे तीन हजार रुग्ण उपचाराखाली आहेत. केंद्रांतर्गत गेल्या वर्षात 17 हजारांवर गरोदर मातांचे समुपदेशन होऊन त्यांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात अकरा ठिकाणी एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र असून, त्यात गरोदर मातांचेही समुपदेशन व एचआयव्ही चाचणी मोफत करण्यात येते. त्याचबरोबर अन्य रुग्णांचीही मोफत तपासणी होते.

यासंदर्भात संस्थेच्या अध्यक्षा संगीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी सांगितले, की जिल्हा रुग्णालयात ऐच्छिक सल्ला व समुपदेशन करण्यात येते. त्यात संबंधितांना त्यांच्या इच्छेनुसार एचआयव्ही तपासणी करवून घेण्यात येते. या केंद्रात आजाराविषयी सर्व माहिती देवून मोफत तपासणी होते. संबंधितांना चाचणीनंतर रिपोर्ट देण्यात येतो. एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झालेली असल्यास त्याला पुढील उपचारासाठी एआरटी सेंटरकडे पाठविले जाते. याबाबतची सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येते. शासकीय रुग्णालयात एआरटी सेंटर सुरू आहे. तेथून सर्व एचआयव्हीबाधितांची नोंदणी होते. संबंधितांना कार्ड देऊन त्यांना टप्प्याटप्प्याने सीडी फोर तपासणीसाठी केली जाते. अडीचशेपेक्षा कमी सीडीफोर असणाऱ्यांना औषधी दिली जातात.

बहुतांशी महिला, पुरुषांना आधार नसतो. दोघांपैकी एक दगावल्यास रोजगार, उदरनिर्वाहाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर उपस्थित राहतो. त्यामुळे अशा रुग्णांना एआरटी सेंटरमध्ये उपचार जरी मिळत असले, तरी त्याच्या अन्य समस्या सुटत नाहीत. त्यासाठी राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेअंतर्गत शहरात नव्यानेच सुरू झालेल्या ड्रॉप इन सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत. काही तरुण, तरुणींना एचआयव्हीची लागण झाल्यास त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जोडीदाराचे (पती किंवा पत्नी) निधन झाल्यास अन्य कुटुंबीयांकडून काहींना समाजाबाहेर काढण्यात येते. त्यावेळी या सेंटरच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून संबंधितांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येते.

आजाराविषयी सविस्तर कल्पना देऊन कुटुंबीयांच्या मनातील द्वेष भावना दूर करण्यात येते. त्याचबरोबर काही जण नोकरी करत असल्यास तेथील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही माहिती देऊन रुग्णाविषयी आस्था, आपुलकी कशी टिकून राहील, यासाठी प्रयत्न होतात. काहींना रोजगार नसल्यास तो निर्माण करण्याच्या उद्देशानेही सेंटर प्रयत्न करते. एखाद्या रुग्णाची प्रकृती बिघडल्यास त्याला एआरटीच्या माध्यमातून अन्य सेवाभावी संस्थेत सुरू असलेल्या सीसीसी केंद्रातही उपचार दिले जातात. इच्छुकांनी न्यू डॉक्‍टर हाऊस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे असलेल्या कार्यालयात संपर्क साधावा.

मुंबई, पुण्यासह रत्नागिरीत एचआयव्ही बाधितांचे प्रमाण घटले

Print PDF
चिपळूण - राज्यामध्ये एचआयव्हीची सर्वांधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्यांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता; मात्र गेल्या 2004 ते 2006 या तीन वर्षातील एचआयव्हीची राज्यातील जिह्यांच्या स्थितीचा आढावा राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी) घेतला आहे. त्यामध्ये मुंबई, पुण्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील एचआयव्हीचे प्रमाण घटले आहे, तर सांगलीतील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एचआयव्ही नियंत्रणासाठी आरोग्य खात्याला राज्यात यंत्रणा सक्षम करावी लागणार असल्याचे मत या निमित्ताने व्यक्त केले जात आहे.

राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी)च्या अहवालात राज्यातील अन्य दहा जिल्ह्यांमध्ये एचआयव्हीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाल्याचे नमूद केले आहे. राज्यामध्ये एचआयव्हीची सर्वांधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्यांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता; मात्र 2004 ते 2006 या तीन वर्षातील एचआयव्ही बाधितांची राज्यातील जिह्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एचएसआरसी) आरोग्याच्या विविध अंगाने घेतलेल्या पाहणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यांचे तीन वर्षांपूर्वी असलेले 7.7 टक्‍यांहून हे प्रमाणे 6.1 टक्‍यांवर आल्याने राज्याचे हे प्रमाण 1.6 टक्‍यांनी घटले आहे. यामध्ये आणखी बदल करण्यासाठी आरोग्य विभागाला जनजागृती करावी लागणार आहे.

Read more...

एचआयव्ही पॉझिटिव्हचीही 'सरकारदरबारी दखल'

Print PDF
नागपूर - एचआयव्ही संक्रमितांना सरकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन पावले पुढे टाकून त्यांच्यासाठी विशेष शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. यात 500 अर्जधारकांपैकी 483 जणांची नोंदणी करण्यात आली. सरकारी स्तरावर त्यांनाही शासकीय योजनांचा फायदा मिळावा, हा यामागचा हेतू आहे. यानिमित्ताने या रुग्णांची सरकारदरबारी दखल घेतली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय व संजीवन बहुउद्देशीय समाज सेवा संस्थेतर्फे हे शिबिर घेण्यात आले. यात एचआयव्ही पॉझिटिव्हला बीपीएल कार्डधारकांना अंत्योदय योजनेचा फायदा मिळावा यासाठी कार्ड तयार करून दिले जाणार आहे. तत्पूर्वी, यासाठी संस्थेने पाचशे जणांचे अर्ज भरून घेतले. यापैकी 483 जणांची "ऑन द स्पॉट' नोंदणीही करण्यात आली. या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केलेल्यांना टोकन देण्यात आले. तर, नव्याने अर्ज करणाऱ्यांसाठी हे विशेष शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात मोठ्या संख्येत अशा रुग्णांची गर्दी झाली. त्यांना केवळ नोंदणी न करता त्यांना योजनांची माहितीही दिल्या गेली. कोणत्या योजनांचा काय फायदा होतो, याचीही माहिती प्रशासनातर्फे देण्यात येणार आहे.

Read more...

धुळे जिल्हा रुग्णालयात आता एसटीडी क्‍लिनिक

Print PDF
धुळे - गुप्तरोग व एचआयव्हीबाधित तरुणांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हा रुग्णालयात एसटीडी क्‍लिनिक सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत दोनशेपेक्षा अधिक रुग्ण गुप्तरोगाने बाधित असल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय व एड्‌स नियंत्रण सोसायटीतर्फे रुग्णालयामध्ये (ओपीडी क्रमांक 14) असुरक्षित शारीरिक संबंधातून पसरणाऱ्या आजारावर (गुप्तरोग) उपचारासाठी एसटीडी क्‍लिनिक सुरू केले आहे. लैंगिक आजार व एचआयव्हीचा जवळचा संबंध आहे. लैंगिक आजार असणाऱ्या व्यक्तींने एचआयव्हीबाधित व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास एचआयव्हीची बाधा होण्याची शक्‍यता पाच ते दहा पटींनी वाढते. या आजाराची लक्षणे स्त्रिया व पुरुषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात, त्यामुळे पेच वाढतो, यासाठी नैतिकता राखून आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे चांगले असते; परंतु ज्यांना गुप्तरोग झालेला आहे. त्यांनी तपासणी करून उपचार करून घेणे केव्हाही चांगलेच असते. परंतु, अनेकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. आजार लपविल्यास तो वाढण्याची आणि पसरण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे आजार बळावत असल्याचेही दिसून आले आहे. काही आजार वेदनादायक, तर काही वेदनारहित असतात. त्यामुळे त्यांचे गांभीर्य अनेकांना समजत नाही. यापार्श्‍वभूमीवर रुग्णांना स्वतंत्रपणे व चांगले उपचार मिळावेत, आजाराविषयी माहिती मिळावी, यासाठी ही वैद्यकीय उपचार व्यवस्था देण्यात येत आहे. क्‍लिनिकमध्ये त्वचा व गुप्तरोग विभागप्रमुख डॉ. आर. टी. बागले, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. वैशाली गावंडे, डॉ. सुजाता सोनवणे यांच्यासह समुपदेशक प्रवीण सूर्यवंशी काम पाहतात.

Read more...

दहा जिल्ह्य़ांमध्ये वाढले ‘एचआयव्ही’ चे प्रमाण!

Print PDF
दहा जिल्ह्य़ांमध्ये वाढले 'एचआयव्ही' चे प्रमाण!
‘एचआयव्ही’ चे राज्यात सर्वाधिक प्रमाण असणाऱ्यांपैकी पुण्या– मुंबईमधील बाधितांचे तीन वर्षांत प्रमाण घटले असले, तरी सांगलीमधील त्यांची संख्या अधिकच वाढली आहे. या शिवाय राज्यातील अन्य दहा जिल्ह्य़ांमध्ये एचआयव्हीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. एचआयव्ही नियंत्रणासाठी आरोग्य खात्याला राज्यात यंत्रणा आणखी सक्षम करावी लागणार असल्याचे मत या निमित्ताने व्यक्त होत आहे.

राज्यामध्ये एचआयव्हीची सर्वाधिक लागण होणाऱ्या शहरांमध्ये पुण्यासह मुंबई, सांगली जिल्ह्य़ांचा आतापर्यंत क्रमांक लागत होता. मात्र गेल्या २००४ ते २००६ या तीन वर्षांतील एचआयव्हीची राज्यातील जिल्ह्य़ांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधान केंद्राने (एसएचआरसी) आरोग्याच्या विविध अंगाने घेतलेल्या पाहणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली. राज्यांचे तीन वर्षांपूर्वी असलेले ७.७ टक्क्य़ांवरून हे प्रमाण ६.१ टक्क्य़ांवर आल्याने राज्याचे हे प्रमाण सुद्धा १.६ टक्क्य़ांनी घटले असले तरी ते प्रमाण फार समाधानकारक आहे असे नाही.
Read more...

Page 9 of 11

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya