Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

वैद्यकीय भाग

Print PDF
HIV ग्रस्त रुग्णाच्या नैराश्याचे मुल्यमापन करणे हा मुद्दा उपचार करताना लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक असते. रुग्णाच्या मंद हलचाली, एकाग्रतेचा अभाव, विसरभोळेपणा आणि गोंधळून जाण्याची स्थिती यांमुळे अडचणीची परिस्थिती निर्माण होत असल्या तरीही HIV आणि नैराश्य यातील फरक डॉक्टरांनी ओळखणे आवश्यक असते. रुग्णाची मानसिक स्थिती व चित्तवृत्ती पाहून हे चांगल्याप्रकारे साध्य करता येते. HIV ग्रस्त रुग्णांमधे स्वतःला दोष देणे, स्वतःची मूल्य काहीच नसल्याचा आभास होत असणे, नकारात्मक विचार किंवा आत्महत्येचे विचार अशी मानसिक लक्षणे दिसून येत असतात. अशा रुग्णांमधे प्रामुख्याने मानसिक क्षमता खंगत चालल्याचे स्पष्ट दिसत असते. तसेच तो रुग्ण नैराश्याने ग्रासला आहे हे इतरांना प्रखरतेने जाणवत असते.

रुग्णामधे नैराश्याची लक्षणे दिसत असतील तर त्याला जपून उपचार द्यावे लागतात. या नैराश्यामुळेच रुग्णाच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतात. मानसिक स्थिती खालावलेली असल्यामुळे हे विचार अधिक तीव्र स्वरुपाचे असतात. अशा रुग्णांना वारंवार "आता भरपुर झाले; आता मरणाची वेळ जवळ आली आहे" असे वाटत असते. अगदी शेवटच्या अवस्थेत यातनांमुळे असे विचार अधिक वारंवारतेने येतात. काही काळाने विचार करण्याची क्षमताच अस्तित्वात रहात नाही. मग जीवनाचा अंत करणे योग्य की अयोग्य यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा रहातो.

एका निरिक्षणामधे असे दिसून आले आहे की जवळ जवळ ८३.३% रुग्णांमधे मरणाची अपेक्षा अधिक असते. बरेच रुग्ण ज्याप्रमाणे जगणे आपल्या हातात असते त्याचप्रमाणे मरण हेही आपल्याच हातात असते असा समज करुन घेत असतात. ते आपल्या नातेवाईकांबरोबर या विषयी चर्चाही करतात. मानाने मरण स्वीकारणे हे कधीही चांगले असा निष्कर्ष काढतात. तसेच काही प्रकरणात असेही पाहिले गेले

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya