Friday, Jul 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

शैक्षणिक बाबी

Print PDF
आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या मनाच्या जवळ असणार्‍या व्यक्तीची आजारामुळे झालेली अवस्था पाहून हितचिंतक हतबल होत असतात. नशिबाला दोष देणेही सहाजिकच असते. कधी कधी तर नकळत अशा व्यक्तींकडूनही वर्तनात्मक चुका घडतात. रुग्णाचा विसरभोळेपणा किंवा असहकार यामुळे त्यांच्याविषयी द्वेश निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कधी कधी तर हा रुग्ण हे सर्वकाही मुद्दामूनच करत असल्याचा आरोपही होत असण्याची शक्यता असते. हे असे घडणे सहाजिक असते म्हणूनच दवाखान्यातील कर्मचार्‍यांना सतर्क राहणे अपरिहार्य असते. कुंटुंबातील व्यक्ती, मित्र व हितचिंतक यांना त्यांच्या वर्तनाविषयी मार्गदर्शन करण्याचीही गरज असते. त्यांना रुग्णाची शारिरीक अवस्था, त्यांची क्षमता यांची वेळोवेळी माहिती पुरवणे महत्त्वाचे असते. रुग्णाच्या मंद हालचाली, विसरभोळेपणा आणि गोंधळून जाण्याची स्थिती यांची कल्पना त्यांना द्यावी लागते.

रुग्णाला आजाराची पूर्ण कल्पना देऊन त्याला त्याविषयी शैक्षणिक माहिती पुरवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बर्‍याच रुग्णांना मज्जासंस्थेचे काम काय असते किंवा ते कसे चालते याविषयी काहीच कल्पना नसते. यासाठी उपचार करणार्‍यांना कौटुंबिक गटचर्चा करण्याची आवश्यक्ता भासते. यात मुख्यत्वे HIV विषयी पूर्ण माहिती पुरवली जाते. तसेच नव्याने उत्पन्न होणार्‍या लक्षणांवर नजर ठेवणेही यामुळे साध्य होत असते. मज्जासंस्था आणि मनाची उभारणी यावर प्रकाश टाकल्यानंतर रुग्णाच्या मनातली आजाराची भीती आणि चिंता नाहीशी होऊ लागते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya