Friday, Jul 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ मानसिक समस्या AIDS ग्रस्त रुग्णांसाठी सुदृढ वातावरणाची निर्मिती करणे

AIDS ग्रस्त रुग्णांसाठी सुदृढ वातावरणाची निर्मिती करणे

Print PDF
HIV ग्रस्त रुग्णांची मार्गदर्शकांना नेहमीच तक्रार असते की काम करताना ते सतत चिंता आणि नैराश्याने ग्रासलेले असतात. अशा वेळेस मार्गदर्शकांनी त्यांना आजाराची जाणिव करुन देणे गरजेचे असते. तसेच याच कारणाने ते नैराश्याने आणि चिंताने ग्रासतात हे समजावणेदेखील गरजेचे असते. AIDS ग्रस्त रुग्णाला नोकरी सोडणे ही परिस्थिती दु:खदायक आणि धक्कादायक अशी असते. त्यामुळे त्याच्या न्यूनगंडात अधिक भर पडण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी एखादे दुसरे काम शोधून देणे आणि सुरक्षित वातवरण निर्मिती करणे ही जबाबदारी स्व-मदत गट उत्तमरित्या पार पाडू शकतात. म्हणूनच अशा रुग्णांना मदतीसाठी स्व-मदत गटाशी जोडावे.

रचनात्मक जीवनपद्‍धती व कुटुंबातील वातावरण यामुळे अशा रुग्णांना मनमोकळेपणाने रोज काम करणे सोपे जाते. रुग्णाला रुग्णालयात ठेवल्यामुळे तो घोटाळ्यात पडण्याची शक्यता असते कारण वातावरण परिचयाचे नसते. रुग्णाला मोकळेपणाची जाणिव व्हावी म्हणून मार्गदर्शकाला रुग्णाच्या नातेवाईकांनाही प्रेरणा द्यावी लागते. यामध्ये नातेवाईकांनी अगर मित्रांनी रुग्ण मित्राला दिनदर्शिका देणे ओळखीचे छायाचित्र आणून देणे यांसारख्या मैत्रीपूर्ण गोष्टींचा समावेश असतो. यामुळे रुग्णाला रुग्णालयातही आपलेपणा वाटू लागतो.

रुग्णालयात अडचणीच्या काळात संपर्कासाठी आपला दुरध्वनी क्रमांक दिल्याने रुग्णामधे सुरक्षिततेची भावना येऊ लागते. एक HIV ग्रस्त नट एकेकाळी पुस्तकाची पान अन पान लक्षात ठेवत असे. पण या आजारामुळे त्याला आपल्या घरचा दुरध्वनी क्रमांकही आठवत नव्हता.

एखाद्या रुग्णाला काम करण्याची खूप इच्छा असते पण शारिरीक हालचाली आणि व्यक्तीमत्वातील दोषामुळे तो हे काम सुरु करु शकत नाही. अशावेळी कौटुंबिक आधारामुळे तो रुग्ण काम करण्यास प्रवृत्त होतो. या अवस्थेमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना त्याच्या या कमकुवतपणाचा त्रास होत नाहीना याची विशेष काळजी घ्यावी लागते.

या आजारामुळे स्मृतीदोष उत्पन्न झाल्यामुळे अधिक समस्या निर्माण होतात. असे रुग्ण आपले स्वतःचे राहते घरही विसरण्याची शक्यता असते. एकदा एका रुग्ण स्त्रीने आपल्या मुलीला शाळेतच ताटकाळत ठेवले होते कारण तिला आपल्या मुलीची शाळा कुठे आहे हेच आठवत नव्हते, शेवटी एक तासांनंतर त्या मुलीला आणायला कोणीच आले नाही तेंव्हा त्या स्त्रिच्या आईला फोन केला तेंव्हा ती त्या मुलीला शाळेतुन घेऊन आली.

अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रुग्णाचे उपचार कधी व कसे असतील हे ही मार्गदर्शकालाच ठरवावे लागते. उपचार करताना या विषयाचे महत्त्व जाणून संवेदनशीलतेने व कल्पकतेने अधिक पर्याय उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा. उपचाराचा केंद्र बिंदू म्हणजे रुग्णाच्या मित्रांनी, नातेवाईकांनी व हितचिंतकांनी त्याच्या आजाराची संवेदनशीलता ओळखावी व त्यानुसार त्या रुग्णाशी संबंध वृद्धींगत करावे.

काही प्रकरणांमधे रुग्ण उपचार करणार्‍या व्यक्तीपासून किंवा रुग्णालयापासून खूप दुर रहात असतो. अशावेळी त्यांच्या घरी जाऊन उपचार देणे शक्य नसते. पण या घरच्या भेटी देण्यावर भर द्यावा कारण अशा भेटींमुळे रुग्णाला प्रोत्साहन मिळते. तसेच यामुळे मार्गदर्शकाला रुग्णाच्या कौटुंबिक स्थितीचीही माहिती मिळत असते.

न्युरोसायकियाट्रिक उपचारांमुळे एकाग्रता नष्ट होत जाते आणि मार्गदर्शकासह होणार्‍या चर्चेतही अडचणी येऊ शकतात.

पारंपारिक मानसोपचारांच्या उपचारांमधे अनेक गोष्टींचा अभाव असतो. पण त्या उपचारांमुळे रुग्णाला सुरक्षितता आणि मदत मिळत असते. यामधे रुग्णाला औषधे पुरवणे किंवा रुग्णाला कविता किंवा गोष्ट सांगणे हे फायदेशीर ठरु शकतात. संमोहनात्मक उपचारामुळे रुग्णांना मदत होत असते. मार्गदर्शक रुग्णाला काही ध्वनीफिती देतात ज्यामुळे रुग्णाला मुक्ततेचा अभास होतो.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya