Tuesday, Jun 15th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ मानसिक समस्या

मानसिक समस्या

एड्स सोबत येणार्‍या मानसिक समस्या

नैराश्यावर मात कर्‍ण्यासाठी न्युरोसर्जनची मदत घेऊन चालत नाही तर स्वत:ची मदत स्वत:च करावी लागते. नैराश्यामधुन जाणारे लोक नेहमी उपचारांकरता नकार देतात, एच.आय.व्ही बाधित लोक देखिल याला अपवाद नाहीत. ते म्हणतात की मी वेडा नाही , ही माझीच चूक आहे आणि मला यातुन बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नाही.

एच.आय.व्ही सहित जगणार्‍या बर्‍याचश्या पुरुष आणि स्त्रियांमधील नैराश्यामागचे कारण हे टेस्टोटेरोन चे कमी प्रमाण हे आहे. त्यामूळे जे एच.आय.व्ही बाधित आहेत त्यांनी ह्या लेव्हल्स तपासून घ्याव्यात. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधनानुसार एच.आय.व्ही बाधितांपैकी ३/४ पुरूष असे होते की ज्यांच्यामध्ये हे प्रमाण खूप कमी किंवा नॉर्मल लेव्हल पेक्षा थोडे कमी होते आणि हार्मोनल सप्लिमेंटच्यामुळे पडणारा फरक हा ऍन्टीडिप्रेस्न्ट्स घेऊन होणार्‍या फरका सारखाच असतो. या व्यतिरीक्त इतर कारणे, व्हिटॅमिन- बी ची कमतरता हे देखील असू शकते.

बरेच डॉक्टर असा सल्ला देतात की नियमीतपणे समुपदेशन, डॉक्टरांकडे जाणे आणि नियमीतपणे तपासणी करणे हे देखील आवश्यक असते.

विसराळुपणा
 • कॅलेंडर किंवा अपॉईमेंट बुकचा वापर करावा.
 • आठवण रहाण्यासाठी नोट्स लिहुन ठेवणे.
 • औषधांची वेळ चुकु नये म्हणुन आलर्म क्लॉकचा वापर करावा.
 • औषधांचा यादी करावी, कुठले औषधे कधी घ्यावी याची यादी करावी.
बोलण्यात येणारे अडथळे
 • बोलत रहा.. आपले विचार व्यक्त करत रहा.
 • कोणताही संवाद करण्यापुर्वी विचार करा.
 • कोणताही निर्णय घाई घाईने घेऊ नका.
दृष्टीच्या समस्या
 • गाडी चालवणे कठीण जात असेल तर गाडी चालवणे टाळा.
 • जर गाडी चालवत असाल तर सोबत कोणाला तरी ठेवा, आणि सोबत पत्ता ठेवा.
 • नकाशाच्या वापरा ऐवजी तोंडी सांगितलेल्या खाणाखुणांचा वापर करा.
 • रात्रीचे गाडी चालवणे टाळा.
नैराश्य आणि एकाकीपणा
 • मनोरंजनात्मक कार्यक्रम आखा.
 • एक सक्रिय सदस्य बना.
 • आपले जुने छंद जोपासा आणि नवे छंद बनवा.
एकाग्रता साधण्यासाठी येणारे अडथळे
 • मोठी मोठी कामे छोट्या छोट्या विभागात आखुन घ्या.
 • एका वेळी एकाच व्यक्तीची भेट घ्या.
 • एखाद्या कामात एकाग्रता साधण्यासाठी टि.व्ही बंद ठेवा.
 • जास्त ट्राफीक मध्ये गाडी चालवणॆ टाळा.
विविध मार्गे येणारे अडथळे
 • नवीन कामात जबाबदारी घेणे टाळा.
 • अशी कामे टाळा जिथे संभाषण हे जास्त महत्त्वाचे असतात.
 • जेंव्हा तुम्ही ताजेतवाने असाल तेंव्हा तुमच्या कामाच्या योजना आखा, उदा. सकाळची वेळ.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya