- HIV चा संसर्ग कमी करण्यासाठी समाजातील महत्त्वाचे घटक, गट, समूह यांवर लक्ष केंद्रित करणे त्यावर परिक्षण करणे.
- नॅकोच्या विविध सेवा पुरवठ्याचा नवा स्त्रोत म्हणून कार्य करणे. राज्य आणि पालिका यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणुन काम करणे. स्वयंसेवकी कार्य करुन मानवी हक्कांचे रक्षण करणे.
- रचनात्मकरित्या घेतल्या जाण्यार्या वार्षिक पहाण्या, तपासण्यांना सहकार्य करणे. तसेच संशोधनात शक्य ते सहकार्य देणे.
नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम म्हणजेच राष्ट्रीय एड्स नियत्रणात्मक कार्यक्रमांनी साध्य केलेली उद्दिष्ट्ये.
- महाराष्ट्रात एकूण ५५ केंद्रे स्थापन करण्यात आली. त्यात ३० वैद्यकीय महाविद्यालये व २५ रुग्णालयांचा समावेश आहे.
- वरील विद्यालये व रुग्णालयातील पुढार्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
- समुपदेशक आणि प्रयोगशाळेतील तत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली.
- या उपक्रमासाठी संस्थांना अनुदान देण्यात आले.
- संस्थांना नेविरापाईन गोळ्या व सिरप यांचा पुरवठा करण्यात आला.
- पुढील मार्गदर्शनासाठी आढावा घेणार्या चार भेटसत्रांचे आयोजन करण्यात आले.
भविष्यकालिन योजना
यंदाच्या आर्थिक नियोजनाच्या वर्षाअखेरपर्यंत गुजरात आणि पश्चिम बंगाल राज्यात मोठ्याप्रमाणावर भेटी देण्याची योजना आमलात आणणे.
कंडोम वाटप
मोफत पुरवठा आणि लक्ष्यवेधी सामाजिक प्रसार
असुरक्षित व अनेक व्यक्तींबरोबर केलेल्या संभोगक्रियेमुळे HIV संसर्गाचे प्रमाण वाढते. भारतात हे प्रमाण ८०% पर्यंत पोचले आहे. HIV चा संसर्ग कंडोमच्या मोफत वाटपाने काही प्रमाणात नियंत्रणात आणला जाऊ शकतो. कंडोमचा वापर करण्याने HIV/AIDS, STD/STI सारख्या संसर्गावर नियंत्रण मिळवणे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण शाखेने यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या हलचालींमुळे वेश्याव्यवसाय करणार्या स्त्रीयांना आणि त्यांच्या ग्राहकांना कंडोमच्या वापराचे फायदे पटवून देणे शक्य झाले. कंडोमच्या वाटपाचे कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण शाखेमार्फत दोन मार्गाने राबवले जातात.
मोफत वाटप योजनेमार्फत
खर तर अशाप्रकारचे कंडोमचे वाटप हे कौटुंबिक व समाजहिताच्या दृषिकोनातून केले जाते. आता महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण शाखा कंडोम वाटपाचे कार्यक्रम जिल्हास्तरीय स्वास्थ्य कार्यालय, महानगर पालिका व सरकारी रुग्णालयांमार्फत राबवले जातात.
सामाजिक व्यवहार योजना
या योजनेअंतर्गत कंडोमचा वापर आणि जागरुकता यांचा समावेश होता. यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण शाखेने एक व्यवहारिक योजना आमलात आणली. निमसरकारी संस्थांमर्फत (DKT) डिलक्स कंडोमचे वाटप करण्यात आले. ही योजना यशस्वी ठरली म्हणुनच निमसरकारी संस्थांनी असे वाटप जिल्हा व तालुका स्तरावरही राबवले. सद्यस्थितीत मात्र DKT(I) ही संस्था कंडोम वाटप उपक्रमात समाविष्ट नाही.
२००४-२००५ पर्यंत कंडोमची मागणी/गरज
१. मोफत वाटप योजने अंतर्गत : ३,६०,६४,०००
२. सामाजिक व्यवहार योजना : ५०,००,०००
अनुदान
२००२-२००३ मधे नॅकोने ७५ लाख रुपये कंडोम निर्मिती व वाटपासाठी मंजूर केले होते.
त्यापैकी ६४ लाख रुपये ५० लाख कंडोमचे नग खरेदी करण्यासाठी खर्च झाले होते.
कौटुंबिक आरोग्य जागरुकता मोहिम
१५ ते ४९ वयोगटातील व्यक्तींमधे किंवा लोकांमधे लैंगिक रोगांबद्दल जागरुकता निर्माण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहीमेमधे समाजाची मदत घेऊन लवकरात लवकर लैंगिक विकारांचे निदान करुन समाजिक आरोग्य योजनेतर्फे लवकरात लवकर उपचार करणे हे तत्व अवलंबले आहे.
ध्येय आणि योजना
- राज्य विभाग जिल्हा विभाग, महानगर पालिका आणि ग्रामिण भागावर योग्य तो समन्वय साधणे
- प्रत्येक घरा घरांमधे कमीत कमी दोनवेळा भेटी आणि ज्यांना फायदा झाला आहे अशांना कार्ड वाटप.
- सर्वत्र सर्व ठिकाणी शिबिराचे आयोजन
- रेडीओ आणि टिव्ही या माध्यमांचा वापर
- वैद्यकीय आणि निमवैद्यकीय व्यक्तींना प्रशिक्षण
- पुरुष व महिला डॉक्टरांची उपलब्धता
- सर्वत्र व सर्व ठिकाणी कंडोमची उपलब्धता व वाटप
- जिल्हा पातळीवर सतत या योजनेचे निरिक्षण व मार्गदर्शन
HIV चा संसर्ग फैलावल्यानंतर रक्तदानाला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. AIDS चे पहिले प्रकरण भारतामधे १९८६ मधे अढळून आले. सुरक्षित रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारने HIV चा संसर्ग फैलावल्यानंतर लक्ष देण्यास सुरवात केली आहे. १९८९ मधे रक्तपेढ्यांचे आधुनिकिकरण आणि दृढिकरण करण्यात आले आहे. त्यानंतर १९९२ मधे ही मोहिम राष्ट्रीय एड्स नियंत्रणात्मक कार्यक्रम यांनी पूर्णपणे हाताखाली घेतली आहे.
कार्य
लाखोच्या संख्येने लोकांचे प्राण वाचवले गेले. रक्तदान दोनप्रकारे करता येते. स्वेच्छा रक्तदानाने रक्ताचा साठा करुन शुद्ध रक्ताची हमी दिली जाते. स्वेच्छा रक्तदानाबद्दल १ ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दीन म्हणून ओळखला जातो यासाठी सिव्हिल सर्जन्सना १८०० रुपये व नगरपालिकांना १३००० रुपये अनुदान देण्यात आले. सर्व सिव्हिल सर्जन्ससाठी व नगरपालिकांसाठी अंतिम मुदत दिवस ठरवण्यात आला. सरकारी व निमसरकारी संस्थांनी स्वेच्छा रक्तदानाविषयी जागृकता मोहिमांची आखणी केली. १९९९ मधे नॅकोने तीन वेगवेगळे विभाग स्थापन केले ते खालील प्रमाणे.
१. सरकारी वैद्यकीय विद्यालय नागपूर.
२. जनकल्याण रक्तपेढी, पुणे.
३. ससून जनरल हॉस्पिटल, पुणे.
२००१ मधे नॅकोने अजून तीन विभागांची स्थापना केली
- सी.पी.आर. रुग्णालय कोल्हापुर.
- जनकल्याण रक्तपेढी नाशिक.
- सिव्हिल हॉस्पिटल अमरावती.