भारत देशाने आणि प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याने HIV/AIDS च्या आव्हानाला उत्तमरित्या तोंड दिले आहे. हा HIV/AIDS चा संसर्ग संपूर्ण पिढीचाच सर्वनाश करु पाहत आहे. शासनाअंतर्गत कार्यरत असलेले तिन समूह- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कक्ष, मुंबई डिस्ट्रीक्ट एड्स नियंत्रण कक्ष (MDACS) आणि एव्हर्ट. हे कक्ष आपल्या ध्येयाकडे यशस्वी रित्या वाटचाल करत आहेत. वर्तनात्मक बदल आणण्याचे व रुग्णांची चांगल्या प्रकारे सुश्रूषा करणे हेच या तिनही समूहांचे ध्येय आहे.
शहरीकरणाचे सर्वात जास्त प्रमाण हे माहाराष्ट्रातच आहे. ४२% महामार्ग या राज्यातूनच जातात. या राज्यात स्थलांतर करणा-या नागरिकांचेही प्रमाण कमालीचे आहे. लैगिक व्यवसायाचे प्रमाणही सर्वात जास्त असे आहे. औद्योगिकरणामुळे कामगारांच्या हातात जास्त पैसे मिळू लागले आहेत. रुग्णालयातही २५% ते ३०% रुग्ण HIV/AIDS चेच आहेत. लैगिक समस्या असलेल्या रुग्णांमधे HIV/AIDS चे प्रमाण १०.४% इतके आहे. आज HIV/AIDS चा संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या २,१६,७४८ इतकी आहे. एकूण रुग्णांची संख्या ८,५१,४२० इतकी आहे. एकंदरीत AIDS ची संख्या ४७,३८६ इतकी आहे आणि २९५८ रुग्ण एड्स्मुळे मरण पावले आहेत.
असे असूनही राज्यानी अनेक ध्येय साध्य केली आहेत.
- ANC च्या HIV ची संख्या १.२५% वरुन ०.८८% वर आली आहे.
- लैगिक समस्या असणार्या रुग्णांमधे HIV/AIDS चा संसर्ग असणा-यांची संख्या १८% व्रुन १०.४% वर आलेली आहे.
- रक्तदान करणार्यांमधे HIV/AIDS चा संसर्ग असणा-यांची संख्या १.३५% वरुन ०.६६ वर आलेली आहे.
दोन नविन माहिती उपलब्ध करुन देणारी मासिके सुरु करण्यात आलेली आहेत.
’निर्धार’ आणि ’यस वुई डेअर टु केअर’ ही दोन पत्रके मेहनत, श्रद्धा आणि सर्व कार्यकर्त्यांचे प्रयत्न यामुळे ही दोन माहिती पत्रके सुरु झाली आहेत.
१ करोड लोकसंख्या असलेला आणि ३.०८ लाख चौरस किलोमिटर क्षेत्रफळाचे हे महाराष्ट्र राज्य आहे. हे राज्य नेहमीच आरोग्य सुश्रूषेबाबतीत आघाडीवर आहे. ग्रामिण आणि शहर यांच्यात उत्तम असा समन्वय आहे. १९८६ मधे मुंबईला HIV/AIDS चा पहिला रुग्ण तपासणीत आढळून आला. HIV/AIDS सुश्रूषा उपक्रमामुळे या संसर्गाचे महत्त्व पटण्यास सुरवात झाली आहे. HIV/AIDS चा संसर्ग हा फक्त ठराविक ठिकाणी झालेला नाही तर समाजातील सर्व थरांत हा संसर्ग पसरला आहे. थोड्या काही शहरांमधे या संसर्गाचे तिनही टप्पे आढळून येतात.
२००५ मधे केलेल्या निरिक्षणानुसार HIV/AIDS चा संसर्ग असणार्या रक्तदात्यांची संख्या ७.६% वरुन (२००२) १०.४% (२००५) पर्यंत पोहचलेली आहे. कमी धोका पत्करणा-या समूहामधे मात्र संख्या कमी झालेली आहे. HIV/AIDS च्या प्रमाणामधे कोणताही बदल घडलेला नाही. भारतीय लोकसंख्येच्या एकंदर टक्केवारीनुसार कोणताही चढ उतार दिसत नाहीत. म्हणून HIV/AIDS नियंत्रण कार्य अधिक बळकट व प्रभावी करणे आवश्यक आहे. यासाठी निमसरकारी संस्था आणि समस्त समाजानी यांची मदत घेणे आवश्यक आहे.
पहिल्या टप्प्यामधे मिळालेल्या अनुभवावरुन दुस-या टप्प्याची बांधणी करण्यात आलेली आहे. आत्ता पर्यंत या टप्प्यात खूप प्रगती झालेली आहे. २००३ मधे असलेल्या HIV/AIDS च्या रुग्णांच्या प्रमाणाइतकेच प्रमाण राखणे हे प्रमुख ध्येय असून पुढील काळात ते प्रमाण कमी करण्यावर अधिक भर दिला गेला आहे. वर नमुद केलेल्या तिन समूहांमुळेच हे उद्दिष्ट्य शक्य होऊ शकले आहे.
अधिक धोका पत्करणार्या समूहावर लक्ष केंद्रित करणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. सुनियोजित योजना आखण्यासाठी कमी धोका पत्करणार्या लोकांमधे सुरक्षित संभोगाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक ठरते. टी.बी. नियंत्रण उपक्रमांवरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. लहान मुलांमधे HIV/AIDS चा संसर्ग टाळणे आवश्यक आहे.
दुसरा टप्पा यशस्वी करण्याची जबाबदारी एड्स नियंत्रण समूहावर आहे.
१९९२ मधे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम प्रथम सुरु झाला. हया कार्यक्रमाचा कालावधी पाच वर्षाचा असून याचे नामकरण राष्ट्रीय एड्स नियंत्रण उपक्रम असे करण्यात आले. हा पूर्णतः शासनानेच राबवलेला उपक्रम आहे. HIV/AIDS ही समाज विघातक समस्या असल्यामुळे प्रत्यक्ष पंतप्रधानांनी यात पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचे मुख्य ध्येय खालील प्रमाणे आहेत.
- HIV/AIDS चा प्रसार रोखणे व प्रमाण कमी करणे.
- HIV/AIDS मुळे ओढावणार्या मृत्यूंच्या प्रमाणात घट करणे
- HIV/AIDS संसर्गामुळे उद्भवणारा सामाजिक खर्चावर नियंत्रण आणणे.