Friday, Jul 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ संस्थांचा पुढाकार अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था

अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था

Print
संस्थापक अध्य: क्षा, डॉ.पूजा यादव, B.A.M.S. (Pune)

बांधीलकी
  अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था
 • देवदासी संस्थेची स्थापना करुन वेश्यांच्या सम्स्यांचे निवारण.
 • त्यांच्या मुलांसाठी शिक्षण व आरोग्य यांसाठी मदत उपलब्ध करुन देणे.
 • वेश्यांचे पुनर्वसन, असाहाय्य मुलींची सुटका करुन त्यांना रोजगार मिळवून देणे.
 • वेश्यांचे वैदिक पध्दतीने विवाह लावण्याकामी पुढाकार.
संस्थेचा उदय:
 • बुधवार पेठेतील लालबत्ती भागातील वेलकम गल्लित सर्वत्र घाणिचे साम्राज्य होते. कचराकुंडी तुडुंब भरुन रस्त्यावर कचरा पडलेला असे.येणारे-जाणारे लोक नाक दाबून या दुर्गंधीतून वाट काढून पुढे जात.आजुबाजुला खवा,माव्याची दुकाने, हॉटेल्स असुन आरोग्याचा लवलेशही नव्हता.वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्याचा पुरता फज्जा उडालेला होता.
 • हे सर्व पहुन त्याच भागात वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉ पूजा यादव यांनी ठरविले की ही कचराकुंडी हटवायची व इथला कचरा उचलायचा.
 • मग सुरु झाले स्वच्छ्ता अभियान! कचरकुंडी हटवन्यासाठी म.न.पा. मध्ये अर्ज दाखल झाला. परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे देवदासी भगिनींचा आरोग्य प्रमुखांकदे मोर्चा आदोंलनाच इशारा यांमुळे सुत्रे हलली व कचराकुंडी हटवली गेली.पण पुन्हा कचरा टाकला जाउ नये म्हणुन त्या ठिकाणी काहितरी उभे राहणे गरजेचे होते. मग मुरुम टाकन्यासाठी स्वत:डॉ पूजा यादव उभ्या राहिल्या.त्यामुळे देवदासी भगिनींनी श्रमदानाने तिथे ओटा तयार केला. मग ठरले कि या ठिकाणी एक मंदिर उभे करुया! देवदासी भगिनींच्या विचारानेच ’दुर्गामातेचे मंदिर बांधण्याचे ठरले. अनेक मदतिचे हात पुढे आले. अशा प्रकारे दुर्गामातेचे मंदिर उभे राहिले. देवीची घट्स्थापना होणार त्याचा एक दिवस अगोदर काहि समाजकंट्कांचा मदतिने देवीचे मंदिर पाड्ण्यासाठी पोलिस आले. परंतु डॉ. पूजा यादव, माजी महापौर माउली शिरवाळकर यांच्या प्रयत्नाने अर्धे मंदिर वाचले व त्याच भग्नावस्थेतल्या जागेत देविच्या मुर्तिची प्रतिष्ठापना झाली.
एक चांगले कार्य होत असलेले पाहुन त्यास समाजविरोधि तत्त्वांचा विरोध पाहून जो भावनांचा उद्रेक झाला त्यातूनच क्रांती झाली.व त्याच रात्री स्थापना झाली.’अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेची’!

संस्था काय करते?
संस्थेच्या कामाचे क्षेत्र आहे पुणे शहरातील मध्यवस्त्तीत असलेला बुधवार पेठेतील लालबत्ती विभाग.जो देहविक्री करणार्‍या स्त्रियांसाठी ओलखला जातो. त्यामुळे मुख्य काम म्हणजे-
 • सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत या स्त्रियांना ज्या काही अडचणी येतात त्या सोडविणे तसेच या भागातील लोकांना सर्वतोपरी मदत करणे. देवदासी प्रथेच्या निर्मूलनाचा प्रयत्न.
 • देवदासी निर्वाह अनुदान मिळवून देणे.
 • फसवून आणलेल्या व अल्पवयीन मुलींची सुटका करुन त्यांना त्यांच्या गावी पाठविणे.
 • देवदासींना पोलिस, गल्ली दादा यांचापासून होणारा त्रास बंद करणे.
 • प्रौढ साक्षरताचा माध्यमातून देवदासींना शिक्षित करणे.
 • देवदासींचा मुलांना जन्मदाखले देणे. त्यांना शाळा व बोर्डिंगमध्ये प्रवेश देणे.
 • मुलांसाठी व वस्तीतल्या महिलांसाठी जीवनसत्वे, डी वर्मिंगसारखे डोस देउन आरोग्य शिबिर भरवणे.
 • नवरात्र, होळी, ईद, गणेशोत्सव, स्वातंत्र्यदिन, जागतिक महिला दिन यांसारख्या सणांचे औचित्य साधून महिला मेळावे व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणे.
 • देवदासींचे विवाह आंतरधर्मिय विशेष कायदा नोंदणी पध्द्तीने लावून देणे.
 • वस्तीतील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रमांचे आयोजन करणे.
 • सर्व स्त्रियांना कंडोमचा वापर, आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छ्ता, समतोल आहार यांविषयी समुपदेशन.
 • या संदर्भात मालकिणी व मुलींचा नियमीत बैठका घेउन सुसंवाद करणे.
 • एच आय व्हि व ऐड्स संदर्भात सर्व मोहल्यात जनजागरण मोहिम राबविणे.
 • रक्ताची नियमित तपासणि करणे.
 • एच आय व्हि बाधित रुग्णांची काळजी घेणे. त्यांना औषधोपचार, समतोल आहार मिळून त्यांना हॉस्पिट्ल. आश्रम संस्थेत दाखल करण्यासाठी प्रयत्न.
 • ऐड्स बाधित स्त्रियांचा मृत्युनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची जवाबदारी स्विकारणे.
 • नेत्रदान, रक्तदान, देहदान यांविषयीचे महत्व पट्वून देउन शिबिराचे आयोजन.
संस्था पुढे काय करणार?
 • वस्तीतील स्त्रियांच्या राहणीमानात बदल घडविणे.
 • व्यसनमुक्तिसाठी प्रयत्न.
 • वस्तीतील स्त्रियांसाठी साक्षरतेचे प्रमाण वाढविणार.
 • वस्तीतील मुलांना शिक्ष्णाची गोडी लागेल असे कार्यक्रम राबविणार.
 • वस्तीतील देवदासींना माणूस म्हणून वागविण्याचे हरतर्हेचे प्रयत्न करणार.
 • लहान मुलांना रात्रीच्या वेळी स्थिर शांत झोप मिळावी म्हणून रात्रीचे पाळणाघर. व त्याद्वारे त्यांच्यावर संस्कार घडविणे.
 • समाजाने तिरस्कृत केलेल्या घटकाची सामजिक व सांस्कृतिक उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणार.
कार्यानुभव
आदिवासी भागात तीन वर्ष वैद्यकीय सेवा.सध्या कोथरुड व बुधवार पेठ येथे वेश्या वस्तीत वैद्यकीय व्यवसाय सुरु आहे.राजमाता जिजाउ महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्टृबाहेर कौटुंबिक समस्यांचे निवारण तसेच स्त्री सशक्तिकरण व सबलीकरण प्रयत्न.

वेश्यांच्या समस्या निवारण करण्याचा उद्देशाने बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत "अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था" स्थापन केली.वेश्यांचा मुलांसाठी शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न. देवदासी निर्मूलन प्रथा, देवदसी निर्वाह अनुदान तसेच रेशन कार्ड सह रोजचा जीवनातील विविध समस्या यशस्वीपणे सोडविल्यात.वेश्यांचे वैदिक पध्दतिने विवाह लावण्याकामी पुढाकार घेतला. आतापर्यंत २५ विवाह संपन्न झालेत.बुधवार पेठ वेश्या तसेच पुण्यातील सर्व शाळा व महविद्यालये परिसर HIV/AIDS जनजागरण अभियान राबवित आहे.

जवाबदारी
संस्थापक अध्यक्षा: अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था, पुणे
अध्यक्षा: बी.ए.एम.एस.ग्रज्युएट असोसिएशन, पुणे जिल्हा
अध्यक्षा: राजमाता जिजाउ महिला प्रतिष्ठान, पुणे
उपाध्यक्षा: धन्वंतरी परिवार
संचालिका: एड्स जनजाग्रण अभियान प्रकल्प
सद्स्या: पोलिस महिला दक्षता/शांतता समिती
सदस्या: अ.भा.नाट्य परिषद, पुणे उपनगर शाखा
सल्लागार: निहार देवदासी मुलांसाठीचे वसतीगृह

पुरस्कार
उत्कृष्ट वैद्यकीय सेवा: पुणे महानगरपालिका
कर्तृत्वान महिला: युवा भारती, पुणे
कर्तबगार महिला: अखिल भारतीय मराठा महासंघ
सेरा अ‍ॅवार्ड: रोटरी मिड टाउन
सामाजिक कार्यकर्ती: हिंन्दु महिला महसंघ
अन्नपुर्णा जोशी: राणी लक्ष्मी मंडळ, (श्री.न.म.जोशी यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ)
सामजिक कार्य: स्वमी विवेकानंद युवा गौरव फाउंडेशन
राष्टसेवा: मणिभाई देसाई फाउंडेशन
आदर्श समाजसेवक (तपस्वी पुरस्कार): नगरवाचन मंदिर, पुणे
सेवा रत्न: माणूस परिवार
आदर्श सेवा: मंथन प्रतिषठान
स्त्री वैद्य: वैद्य खडिवाले प्रतिष्ठान
नवदुर्गा: कुंदन कलेक्शनाअदिशक्ति: बन्सीलाल चॅरिटेबल ट्रस्ट
देवदासी महिला विकास विशेष पुरस्कार: र.मा.माधव प्रतिष्ठापन
देवदासी मुलांसाठी उत्कृष्ट कार्य: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठापन महिला व्यासपीठ

संपर्क
अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था
१०२७, बुधवार पेठ, श्रीनाथ थिएटरजवळ,
जगोबादादा तालीम समोर, पुणे-४११ ००२.
फोन: +९१ २० २४४७२४६८
मोबाईल: +९१ ९४२२३०३९३०
ई-मेल: abds_pune@yahoo.com

अधिक माहितीसाठी संपर्क
सचिव, प्रकाश यादव
मोबाईल: +९१ ९८५०८३८६८३
निर्मिती: आनंद यादव, व्यवस्थापक-ग्रंथ निर्मिती केंद्र,
य.च.म.मुक्त विद्यापीठ, नाशिक

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya