Thursday, Aug 16th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ संस्थांचा पुढाकार टेक्स्ट टु चेंज (टीटीसी)

टेक्स्ट टु चेंज (टीटीसी)

Print
आमच्या विषयी थोडेसे:
Text to Change
टेक्स टु चेंज (टीटीसी) ही "ना नफा ना तोटा" ह्या तत्त्वावर चालणारी, २००६ मधे स्थापन झालेली सेवाभावी संस्था आहे. ही संस्था शरीर शिक्षण, औषधांचा योग्य वापर ह्यासाठी विविध विकसित होणाऱ्या देशांमधे मोबाईल टेलिफोनी द्वारा काम करते.

महत्त्वाची उद्दिष्टे
  • SMS क्विझ च्या माध्यमातून HIV/AIDS प्रशिक्षण
  • SMS आणि टेलिफोन द्वारे औषधोपचारांचे गांभीर्य
  • SMS आणि टेलिफोन द्वारे आरोग्य विम्याचे महत्त्व
हेतू
अफ्रिकेमधील सर्वसामान्य जीवनापासून लांब असलेल्या लोकांसाठी मोबाईल फोन द्वारे HIV/AIDS ह्याविषयी माहिती पुरविणे आणि त्यांच्यामधे त्याविषयी जनजागृती करणे हा आमचा मूळ हेतू आहे.

दृष्टिकोन
"जनजागृती करा, विषाणूंना थांबवा"
टेक्स टु चेंज (टीटीसी) ह्या संस्थेने स्वत:ला जनजागृतीच्या कामासाठी वाहून घेतले आहे. त्याची सुरवात हीच HIV/AIDS पासून झाली आहे. मोबाईल फोनचा नाविन्यपूर्ण वापर करण्याची ही कल्पना आम्ही काढली ती ह्याच उद्देशाने. लोकांपर्यन्त ह्या विषयाची पूर्ण माहिती पोहोचावी, त्यांच्या मधे जागृती निर्माण व्हावी हाच आमचा प्रांजळ दृष्टिकोन आहे.

उद्दिष्टे
टेक्स टु चेंज (टीटीसी) ह्या संस्थेकडून आम्हास पुढील उद्दिष्टे साधायची आहेत.
  1. HIV/AIDS ह्या व्याधी बद्दल लोकांमधे जागृती निर्माण होण्यासाठी तरूण पिढीमध्ये संवाद साधणे.
  2. HIV/AIDS बद्दलचे सामाजिक समज-गैरसमज दूर करणे.
  3. HIV/AIDS च्या चाचण्या करून घेण्यासाठी लोकांना उद्युक्त करणे.
ह्या उपक्रमाद्वारे टीटीसी ह्या संस्थेला HIV/AIDS बद्दल नुसते अफ्रिकेतच नव्हे तर जगभर जनजागृती पसरवायची आहे. २०१५ पर्यन्त HIV/AIDS चा प्रादुर्भाव कमी होईल अशी आम्हाला आशा आहे.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya