Wednesday, Aug 15th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ संस्थांचा पुढाकार पहेल - २००८ - २००९ मधील कामकाजातील प्रगती

पहेल - २००८ - २००९ मधील कामकाजातील प्रगती

Print
Article Index
पहेल
२००८ - २००९ मधील कामकाजातील प्रगती
All Pages

२००८ - २००९ मधील कामकाजातील प्रगती
"पहेल" संस्थेचे २००८-०९ चे अहवाल सादर करण्यास आम्हांस अतिशय आनंद होत आहे. कारण आज संस्था अशा टप्प्यावर पोहोचली आहे, की आम्ही हक्काने स्त्रीयांसाठी आणि लहान मुलांसाठी हक्क रक्षणाचे काम करू शकतो. त्यामुळेच आम्ही स्त्रीया आणि लहान मुले ह्यावर लक्ष केंद्रीत करून त्यांसाठी HIV /AIDS ह्या विषयावर काम करण्यास लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच्याच बरोबरीने संस्थेने कृषीनगर येथील सुकरौली तालुक्यातील कर्जबाजारी आणि गरीब शेतकरी/कामगार, कमजोर आणि निराधार महिला वर्ग ह्यांसाठी सुद्धा काम करने सुरू केले आहे. संस्थेने त्यांना त्यांच्या प्रगती साठी काही उपक्रमांची आखणी करून ते प्रत्यक्षात आणणे सुरू केले आहे. आम्हाला खात्री आहे, की आमच्या कामकाजाबद्दल वाचून आणि आमचे मागील वर्षीचे आर्थीक व्यवहार पाहून आमचे देणगीदार आमच्या संस्थेच्या नावाने नक्कीच मदत/धनादेश पाठवतील. त्या मदतीचा येथील शेतकरी/कामगार, कमजोर आणि निराधार महिला वर्ग ह्यांसाठी आणि HIV /AIDS सहीत जगणार्‍या व्यक्ती ह्या सर्वांना खूपच उपयोग होईल.

आमची भौगोलिक व्याप्ती
कृषीनगर येथील सुकरौली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींमधे आमचे काम चालते.
कामकासाठीचा निवडलेला समाजवर्ग
  • महिला सशक्तीकरण
  • वयात आलेल्या मुली, महिला आणि लहान मुले
  • HIV /AIDS ची लागण झालेली, किंवा शक्यता असलेली माणसे
  • मानवी हक्क
  • लैंगिक समानता
  • पर्यावरण संरक्षण
  • संशोधन केंद्रे उभी करणे आणि त्यात कामकाज सुरू करून ती नवीन ICT च्या मदतीने बळकट करणे.
२००८-०९ मधे काही उपक्रमांना केलेली मदत/ घेतलेला सहभाग
"पहेल"ने ह्या वर्षी पोलिओ निर्मुलन उपक्रमात सहभाग घेतला. पोलिओ कॅम्पेन मधे पहेलच्या कामकाजातील तीन ग्रामपंचायतीमधे कार्यकर्त्यांनी जातीने लक्ष घातले. गावातील काही माणसे पोलिओ केंद्रापर्यन्त पोहोचत नाहीत, तर त्यांच्या घरापर्यन्त जाऊन पोलिओ मुक्तीचे काम पहेलने केले. ह्याचा परिणाम म्हणजे ह्यावर्षी पोलिओचा डोस घेणार्‍यांची संख्या ह्या तीन ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधीक झाली. आणि ह्या ग्रामपंचायतींमध्ये पोलिओबद्दलची जागरुकता खूपच वाढली.

महिलांचे अधिकार
Women Empowerment
महिलांच्या अधिकारांमधे काम करण्यासाठी पहेल ने women awareness committees (WAC) स्थापन केली. ह्या कमिटी तर्फे संस्थांच्या सभासद असलेल्या महिलांसाठी त्यांचे माहिती अधिकार उपल्ब्ध करून दिले जातात. तसेच गावागावात शरिराची निगराणी, आरोग्यासाठी सामुदायीक स्वच्छता तसेच गावाचा विकास होण्यासाठी उपयुक्त असे नवे अनेक उपक्रम असे भरपूर उपक्रम चालवले जातात. कम्युनिटी मधे महिलांना त्यांचा ग्रामपंचायतीतील सहभागाचे महत्त्व सांगितले जाते. महिलांना समुपदेशन केले जाते. सबल महिलांना दुर्बल महिलांना आधार देण्यास, त्यांना गावात सामावून घेण्यास, उद्युक्त केले जाते. गावातील सर्वांना HIV /AIDS बद्दल माहिती, आणि त्याबद्दल जागृतीही केली जाते. सकुरौली मधील १५ तालुक्यांमधे WAC प्रोग्रॅम चालवला जातो. प्रत्येक प्रोग्रॅममधे कमीतकमी १५ ते २० महिला आणि तरूण मुली/मुले सहभागी असतात. येथे त्यांना पौष्टिक अन्न, सात्विक अन्न ह्यबद्दलही शिकवले जाते. WAC प्रोग्रॅममधे नियमित येण्यामुळे तेथील जीवनशैलीमधे प्रगती नक्कीच दिसून येते.

ह्या सर्व गावांमधे स्त्री-पुरूष अधिकार भेद हा खूपच दिसून येतो. त्यामुळे लैंगिक असमानता दूर करणे हे सुद्धा पहेलचे एक महत्त्वाचे काम आहे. तरूण मुले आणि मुली ह्यांच्यात हा भेदभाव तीव्रतेने जणवतो. कधी कधी मुलींचे हक्क हिरावून घेतलेले दिसून येतात, कधी कधी उघड उघड भेद केलेला दिसतो. असे डोळ्यासमोर दिसल्याने लहान मुलांच्या मनात सुद्धा तेच बिंबत जाते. परंतु पहेलने सुरू केलेल्या लिंगभेद कामामुळे त्या समाजात हळू हळू फरक व्हायला लागलेला दिसतो.

संसाधन केंद्र
पहेलने पूर्वी जसे स्वप्न पाहिले होते त्याप्रमाणेच ह्या संस्थेने संसाधन केंद्र सुरू केले आहे. आरोग्य, आर्थिक, अशा अनेक विषयांविषयीची माहेती येथे मिळते. ही माहिती सुशिक्षितांबरोबर अशिक्षित, निराधार माणसांना सुद्धा पुरवली जाते.

तसेच कुटुंब नियोजन, आरोग्य, स्त्रीयांचे आरोग्य, एच.आय.व्ही., अशा अनेक विषयांतील पुस्तकेसुद्धा येथे उपलब्ध आहेत.

हे संसाधन केंद्र चालू करण्यामागील उद्देश म्हणजे नुकतीच केलेली संशोधने सर्वसामान्यांपर्यन्त पोहोचावीत, माहिती तंत्रज्ञानाचा वापर व्हावा व सरवसामान्यांच्या मनातील गैरसमज दूर व्हावेत असा आहे. भारतातील अशा दुर्लक्षित भागात, खेड्यात विशेषत: ज्यांना काहीही मदत मिळत नाही त्यांच्या पर्यन्त पोहोचावे, त्यांच्या पर्यन्त माहिती पोहोचावे, मदत पोहोचावी हा आहे. अनेक किशोर वयीन मुले शाळेपर्यन्त गेलेली नसतात. त्यांना शिक्षण देणे, शिक्षणाचे महत्त्व पटवणे, लिखाण, वाचन शिकवणे, चांगल्या तर्‍हेने विवेकनिष्ठ विचार करायला शिकवणे असे अनेक सद्‍हेतू पहेलचे आहेत. ह्या सर्व हेतूंबरोबरच HIV /AIDS बद्दल माहिती, आणि त्याबद्दल जागृती हा ही एक खूप महत्त्वाचा हेतू आहे.

HIV /AIDS वर्कशॉप
त्यासाठी पहेलने नायपूर ह्या गावामधील प्राथमिक शाळेत HIV /AIDS जनजागृती बद्दलचा वर्कशॉप जागतिक एड्स दीन, १ डिसेंबर रोजी आयोजित केला होता. मुख्याध्यापक श्रीमती विनोद श्रीवास्तव ह्यांच्या हस्ते वर्कशॉपचे उद्‍घाटन झाले. HIV /AIDS बद्दल परिपूर्ण माहिती, ते कसे पसरू शकते इत्यादी सर्व विषय ह्या वर्कशॉप मध्ये हाताळण्यात आले. ह्यासाठी गावातील २६ माणसे उपस्थित होती.

प्रोग्रॅम ऑफिस
तालुका: नायपूर
मुक्काम पोस्ट: पकरी (सुकरौली)
जिल्हा: कुषिनगर
राज्य: उत्तर प्रदेश
इमेल: pahalup@gmail.com

Administrative office
हाऊस नंबर: १३/३१९
इंदिरा नगर
लखनौ: १६. उत्तर प्रदेश
मोबाईल: +९१-९४१५४०८६१४

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya