Saturday, May 08th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ संस्थांचा पुढाकार प्रोजेक्ट कन्सर्न इंन्टरनॅशनल/इंडीया (पी.सी.आय.)

प्रोजेक्ट कन्सर्न इंन्टरनॅशनल/इंडीया (पी.सी.आय.)

Print
‘ध्येय: जीवनाचे रक्षण करणे आणि निरोगी समाज समूहांची उभारणी करणे’
Project Concern International/India
संस्थे बद्दल थोडेसे : प्रोजेक्ट कंसर्न इंटरनॅशनल ही एक अमेरिकास्थित असलेली व "ना नफा ना तोटा" ह्या तत्वावर चालणारी आंतरराष्ट्रीय विकासासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९६१ साली झाली. या संस्थेद्वारे समाज समुहांचे आरोग्य व महत्त्वाच्या क्षेत्रात विकासाला प्राधान्य दिले जाते. प्रामुख्याने आशिया, आफ्रीका, लॅटिन अमेरिका, युरोप आणि उत्तर अमेरिका येथे या संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. PCI च्या कार्यंक्रमाद्वारे दरवर्षी ३ लाख लोकांशी संपर्क येतो. PCI चे उपक्रम भारतातही चालतात. भारतात या संघटनेची स्थापना १९९७ साली झाली. PCI आपल्या कार्यक्रमाद्वारे जवळ जवळ १३ राज्यातील भागांत HIV/AIDS ग्रस्त व्यक्तींसाठी दक्षता, सुश्रूषा आणि सहाय्य, माता आणि बाळाचे आरोग्य, पोलिओ लसिकरण, पाणी, वातावरण, लघुउद्योग, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि मदत यावर कार्य करते.

प्रोजेक्ट कंसर्न इंटरनॅशनल (PCI) मधे प्रामुख्याने HIV/AIDS सह जगणार्‍या कुटुंबांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यात सकस आहाराची मदत, मानसिक समुपदेशन आणि इतर मुलभूत गरजांना प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्र, तामिळनाडु, आंध्र प्रदेश आणि मणिपुर यांसारख्या अतीसंवेदनशील विभागात PCI चे कार्य जोमाने चालते.

आमचा दृष्टिकोन PCI ची स्त्रोतांची सहज उपलब्धता असलेले जग उभारण्याची योजना आहे जिथे मदत अधिक सहजतेने मिळू शकेल, विषयाचे गांभिर्य ओळखले जाईल. निरोगी, वचनबद्ध आणि चांगल्या अशा समाज समूहाची निर्मिती करणे हेच या उपक्रमांचे मुख्य ध्येय आहे.

HIV/AIDS सह जगणार्‍या व्यक्तीच्या आरोग्यासाठी सकारात्मक कारवाई
या अंतर्गत HIV / AIDS (PLHIV) सह जगणार्‍या व्यक्तींना त्यांची बाजू समजाऊन घेणारा समाजवर्ग निर्माण होतो. तसेच घरगुती उपचार व मदत पुरवली जाते. प्रामुख्याने असे प्रकल्प अधिक संवेदनशील विभाग जसे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मणिपूरप्रमाणे इतर उत्तरेकडील राज्यात राबवले जात आहेत. PCI व राष्ट्रीय AIDS नियंत्रण संस्था (NACO) एकत्रितपणे विकास आणि अद्यावत सविस्तर माहिती मिळवण्याचे (SIS) कार्य करतात. या कार्याद्वारे अधिक संवेदनशीलता असणार्‍या भागात SIS व्यवस्थापनाचे शिक्षण व इतर कौशल्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच या प्रकल्पाद्वारे HIV/AIDS सह जगणार्‍या व्यक्तींना वेळोवेळी आरोग्य सेवा पुरवणे, मानसिक आधार देणे, त्याच्या व जीवनशैलीत सुधार आणणे, HIV/AIDS संदर्भात जनजागृती आणून त्यांना दक्षतेविषयी माहिती व सेवा पुरवणे, HIV/AIDS पिडीतांना सामाजिक आधार देणे, सरकारी व निमसरकारी संस्थांची क्षमता वाढवणे, इतर खाजगी आणि सरकारी संस्थांना HIV/AIDS दक्षतेचे सुश्रूषेचे आणि मदतीचे महत्त्व पटवून देणे व सरकारी निमसरकारी संस्थांचे सक्षमीकरण करणे यावर विशेष लक्ष दिले जाते.

मानासिक आरोग्यात सुदृढता आणणे हा ह्या संस्थेचा महत्वाचा कार्यभाग आहे. योगा, ध्यानसाधना व हास्य उपचार पद्धती यांची प्रात्याक्षिके दाखवून जीवनशैलीत यामुळे कसा बदल होत जातो याचे ज्ञान पुरवले जाते. तसेच या उपचार पद्‍धतीद्वारे ते आजारपण किंवा अशक्तपणा यावर मात करु शकतात हे पटवून दिले जाते.

PCI मधे दिल्या जाणा-या शिकवणीतील अत्यंत महत्त्वाची शिकवण म्हणजे योग निद्रा. योग्य निद्रा या शिकवणीमधे शाररिक स्थिरता आणि जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी स्वयंसूचनांचा समावेश असतो. यात प्रत्येक शिष्य जमिनीवर निपचित पडून, डोळे बंद करून सूचनांची ध्वनिफीत ऐकून स्वतःच्या मनात उत्साह भरतो व यामुळे आपण शाररिक मानसिक दृष्ट्या सुखीसमाधानी असल्याचा आभास होत असल्यामुळे नवचैतन्य निर्माण होत असते.

आरोग्य विषयक शिक्षण आणि जीवन कौशल्य कार्यक्रम, तारुण्यात घ्यायची HIV संदर्भाती दक्षता (HELP). नवतरुणांना HIV/AIDS दक्षतेचे महत्त्व पटवून देणे, त्यांच्यातील घातकता ओढावून घेणार्‍या स्वभावाची तीव्रता कमी करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख कार्य आहे. हेल्प (HELP) म्हणजेच सहाय्यता कार्यक्रम जवळजवळ ३३.८% लोकसंख्येवर लक्ष केंद्रीत करते. यात १५ ते ३४ वयोगटातील म्हणजेच २३० लाख व्यक्तींचा प्रामुख्याने समावेश असतो. २००५ सालापासून PCI ने पुण्यातील तरुण गटाकडे लक्ष केंद्रीत करण्याचे महत्त्व जाणून घेऊन त्यासाठी कार्य सुरु केले. या कार्याअंतर्गत शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणा-या मुलांना, तरुणांना मार्गदर्शन करुन त्याच्या बेजबाबदार स्वभावाची तीव्रता कमी करण्यावर भर दिला जातो. यामुळे सहाजिकच त्यांच्या ज्ञानात भर पडते, त्याच्यात जागृकता येते. HIV/AIDS संदर्भात योग्य मार्गदर्शन तर मिळतेच शिवाय उज्वल भविष्यासाठी कोणत्या दक्षता महत्त्वाच्या ठरतात याचेही त्यांना ज्ञान मिळत असते.

MASBOOT:शिक्षणाद्वारे HIV/AIDS सदर्भातील सेवांचे सक्षमीकरण.
या प्रकल्पा अंतर्गत सरकारी आणि निमसरकारी संस्थांना HIV/AIDS विषयावर शैक्षणिक मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे कार्य केले जाते. तसेच त्यांच्यात

सेवात प्रगतशीलता आणण्यावरही भर दिली जाते. अशा प्रकारच्या सेवा झारखंडमधे प्रामुख्याने अढळतात.
AWARE: AIDS संदर्भातील जागृकतेचे प्रगतशील मार्ग व सुदृढ आरोग्याचे हक्क.
या प्रकल्पाअंतर्गत नवी दिल्लीमधील रेल्वे स्थानक व रस्त्यावर जीवन व्यतीत करणार्‍या मुलांना व तरुणांना मार्गदर्शन करण्यावर भर दिला गेला. ही मुले काही काळापूर्वी घातकता ओढावून घेणार्‍या स्वभावाची बनली होती. HIV/AIDS याबाबतीत कोणतेही ज्ञान नसल्याने बेफिकीर राहत होती. त्याच्यात या प्रकल्पामुळे वर्तनात्मक बदल होऊ लागला आहे. तसेच याप्रकल्पामुळे त्यांना मैत्रीपूर्ण सेवा उपलब्ध झाल्या आहेत.

हेल्थ हाथवे हा प्रकल्प १९९९ साली राजस्थान राज्यातील जयपुर येथे प्रथम नावारुपाला आला. भारतात सर्वात जास्त वाहतुक व संपर्क रस्त्याच्या माध्यमातूनच होत असते. आज ट्रकचालक व त्यांचे सहकारी दररोज जवळपास २ ते ५ लाख किलोमिटरचा प्रवास करत असतात. सहाजिकच त्यांचा संबंध अनेक लोकांशी येत असतो. भावना या प्रत्येक माणसाला असतात. लैगिक भावना उत्पन्न होणे ही नैसर्गिक बाब आहे. असा वेळेस धोका पत्करुन व्यवसायीक स्त्रीयांशी संबंध प्रस्थापित केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा लोकांना HIV/AIDS किंवा STI म्हणजे काय तसेच निरोधचा वापर व त्याचे फायदेतोटे याविषयी काहीच कल्पना नसते. म्हणूनच या प्रकल्पाने अशा लोकांची महत्त्वाची गरज जाणून घेतली व आज हजारो ट्रकचालक कंपन्यांपर्यंत हा प्रकल्प पोहचला आहे. या प्रकल्पाद्वारे लोकांना विषयाचे महत्त्व पटवून दिले जाते. कंडोमच्या वापराचे प्रात्याक्षिके दाखवली जातात जेणे करुन होणारा संभोग हा सुरक्षित असा असेल. HIV/AIDS तसेच STI संबंधी योग्य माहिती पुरवली जाते. या प्रकल्पामुळे बराच प्रमाणात वर्तनात्मक बदल घडण्यास मदत झाली आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्गावर ३० किलोमिटरपासून ते १४५ किलोमिटर भागात पसलेला आहे.

संपर्क:
कंट्री ऑफिस
प्रोजेक्ट कंसर्न इंटरनॅशनल/भारत
बी-७/विस्तार क्र.११०-ए, सफ़दरजंग एंक्लेव,
नवी दिल्ली ११००२९, भारत
दुरध्वनी क्र. ९१-११-४६०५८८८८
फॅक्स: ९१-११-२६१८७५४५
वेब साईट: www.pciindia.org

रिजनल कार्यालय
तामिळनाडु विभाग
प्रोजेक्ट कंसर्न इंटरनॅशनल/भारत,
नवीन क्र. २/५० सी, ४ मुख्य रस्ता, शिवया नगर,
रीद्दीयुर, सालेम ६३६ ००४, तामिळनाडु, भारत
दुरध्वनी क्र: +९१ ४२७ २३३६४०१
महाराष्ट्र राज्यविभाग
प्रोजेक्ट कंसर्न इंटरनॅशनल/भारत,
"यशश्री", ८ पानीनी सोसायटी, संतनगर,
अरण्येश्वर, पुणे ४११ ००९, महाराष्ट्र, भारत
दुरध्वनी क्र: +९१ २० २४२२२७२७, ३१०१७२६७
उत्तर-पूर्व विभाग
कार्यक्रम संयोजक
प्रोजेक्ट कंसर्न इंटरनॅशनल/भारत,
खोंगमन ईस्ट, झोन ५, इंफाळ पूर्व
मणीपुर ७९५ ००१, भारत
 

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya