Saturday, May 08th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

वेक-अप पुणे

Print
Wake Up Pune
नोहेंबर २००६ मध्ये वेक-अप पुणेची स्थापना झाली. आणि ह्या संस्थेची स्थापना पुण्यातील विविध सेवाभावी संस्थांच्या पुढाकाराने झाली. या संस्थेचा मुळ उद्दिष्ट पुण्यामध्ये एड्स बद्दल जनजागृती करणे हा आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २००७ च्या अहवालानुसार आत्तापर्यंत पुण्यामध्ये १८०३९ लोकांनी एच.आय.व्ही साठी टेस्ट केली आणि त्यामध्ये १२.२७ लोकांची टेस्ट पॉझिटीव्ह आली. हा आकडा अशा लोकांना वगळुन आहे जे लोक एच.आय.व्ही सहित जीवन जगत आहेत पण त्यांना त्याबद्दल अजून कल्पना नाही.

एच.आय.व्ही ही व्याधी जर जात, धर्म असा काही भेदभाव करत नाही तर एच.आय.व्ही ची लागण झालेल्या लोकांमध्ये भेदभाव करु नये या बद्दल जागरुकता आणणे आवश्यक आहे. निरनिराळ्या क्षेत्रातील लोक यासाठी काम करतात. यामध्ये एन.जी.ओ.(सेवाभावी संस्था), युवासंस्था, सरकारी संघटना, यांचा समावेश आहे.

Mr. Hans Billimoria Wake Up Pune Coordinator Mr. Hans Billimoria
“Wake Up Pune” Coordinator
या अभियानाचे मूळ उद्दिष्ट हे पुणे शहरातील लोकांना एड्स आणि एच.आय.व्ही या बद्दल जागरुक करणे हे अहे, तसेच,
  • पुण्यातील लोकांपर्यंत एच.आय.व्ही ची लागण कशी होते या बद्दल जागरुक करणे.
  • एच.आय.व्ही पासून उद्‍भवणारे धोके
  • एच.आय.व्ही. पासून संरक्षण आणि बचाव
  • एच.आय.व्ही टेस्ट आणि काळजी या बद्दल जागरुकता निर्माण करणे.
वेक-अप पुणेचा मुळ उद्देश हा सर्व लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे.

आणि पुण्यामध्ये एड्स बद्दल एक नवा दृष्टिकोन निर्माण करणे हा आहे. आणि प्राथमिक संदेश आहे - "बि-पॉझिटिव्ह" (सकारात्मक नजरेने पहा) म्हणजे:
  • शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन - स्वत:ला आणि इतरांना एच.आय.व्ही बद्दल शिक्षित करा.
  • जागरुकतेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन - सर्व समुदायांमध्ये जागरुकता निर्माण करा.
  • मदतीसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा - एच.आय.व्ही एड्स सहित जगणार्‍या लोकांना मदतीचा हात द्या.
संपर्क
वेक-अप पुणे
C/O . वंदना आपटे
सत्यम फाऊंडेशन
१९/ए. तारा हाईट्स, वाकडेवाडी
पुणे ४११०५२ महाराष्ट्र, भारत.
ई-मेल:info@wakeuppune.org
फोन नं: +९१ २० ६६२८२३२३ (वंदना आपटे)

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya