Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

सहेली प्रकल्प

Print
सहेली हा प्रकल्प वेश्याव्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रीयांसाठी एकाअर्थी HIV/AIDS करीता दक्षता व नियंत्रण आणणारी शैक्षणिक रचना आहे. या प्रकल्पाच्या कार्या अंतर्गत मुंबईतील ५५०० तर पुण्यातील ३५०० वेश्याव्यवसायातील स्त्रीयांना मार्गदर्शन व सहाय्य केले जाते.

उद्दिष्ट्ये
 1. HIV/AIDS आणि STD बाबत वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीयांना शिक्षण देणे.
 2. अशा व्यवसायिक स्त्रीयांमधे कंडोमचा वापर नित्यनेमाने व्हावा यावर लक्ष केंद्रीत करणे. त्यासाठी कंडोमचा मोफत वाटप करणे.
 3. वेश्याव्यवसायातील स्त्रीयांना सुरक्षित संभोगाचे महत्त्व पटवून देणे.
 4. अशा व्यवसायिक स्त्रीयांचे सबलीकरण करुन देणे.
 5. शाररिक आरोग्य सुश्रूषा सेवा पुरवणे. मोफत व गुप्त असलेल्या तपासण्या राबवणे.
सहेली या प्रकल्पा अंतर्गत वेश्याव्यवसाय करणा-या स्त्रीयांना मानसिक आधार, सुश्रूषा सेवांची प्रगतशीलता आणण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला जातो. यात तीन स्तरांवर काम केले जाते.

प्रत्येक २५ व्यवसायिक मुलींमागे एक सहेली म्हणजेच एक मैत्रिण कार्यरत असते. ताई म्हणजेच कार्यकर्त्यातील एक स्त्री मोठ्या बहिणीची भूमिका बजावते. तर बाई म्हणजेच मातृत्वाचा आभास देणारी आई म्हणून एक स्त्री कार्यरत असते. त्यांना प्रकल्पाअंतर्गत मानधनही दिले जाते.
सहेली: दिवसातील एका तासाच्या महिनाभरातील परिश्रमाच्या मोबदल्यात १५० रुपये
ताई: ७०० रु. अर्धवेळ कामासाठी तर १५०० रु. पूर्णवेळ काम करणार्‍यांसाठी
बाई: यामधे कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण होत नाही. किंबहुना या कामासाठी कोणीही अशाप्रकारचे आर्थिक सहाय्य स्वीकारत नाही.

कार्यक्षेत्र
या प्रकल्पाद्वारे समाजसेवकांना रुग्णांशी कशाप्रकारे संबंध वृद्धिंगत करावे. त्यांचा व्यवहार रुग्णांशी कसा असावा हेही शिकवले जाते. STD व HIV पासून संरक्षण म्हणून दक्षता पटवून देण्यासाठी वैयक्तिक मुलाखती घेतल्या जातात. तसेच निरोध वाटपही केले जाते.

कार्यकर्त्यांवर वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीयांना STI व HIV/AIDS संदर्भात माहिती देणे, सुरक्षित संभोग, आजारी महिलांना दवाखान्यात नेणे इत्यादी जबाबदार्‍या दिल्या जातात. जेव्हा हे कार्य सुरु करण्यात आले तेव्हा त्यांच्यावर बरीच टिका करण्यात आली होती. पण आम्हाला आमच्या कार्यावर पूर्ण विश्वास होता. आम्हाला खात्री होती की कधी ना कधीतरी आम्ही वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीयांना या आजाराचे गांभिर्य पटवून देऊ.

या कार्याबरोबरच प्रत्येक स्त्रीला एक ओळखपत्रही दिले जाते. या ओळखपत्रामुळे त्या महिलेचा स्वाभिमान जागृत होतो. समाजात एक प्रतिष्ठाही मिळते. कालांतराने यासर्व गोष्टींचे फळ मिळाले. या स्त्रीयांना STI व HIV आजाराचे महत्त्व पटले व त्या इतर स्त्रीयांनाही त्याचे महत्त्व पटवून द्यायला लागल्या.

या प्रकल्पा अंतर्गत समाजसेवकांना प्रशिक्षण तर दिले जातेच पण त्याच बरोबर ’सहेली’ या भारतीय आरोग्य संघटनेतर्फे पथनाट्याद्वारे सर्वसामान्य माणसालाही या आजाराचे महत्त्व पटवून दिले जाते. तसेच ठिकठिकाणी व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. दुरदर्शनवर मुलाखतीही दिल्या जातात. हे कार्य संपूर्ण भारतात अखंड अविरत सुरु आहे. हा प्रकल्प समाजातील सुशिक्षित वर्गापासून ते अशिक्षित समुदाय यासर्वांना ज्ञान देत असतो.

सहेलीचा उपक्रम आजवर जेथे जेथे राबवण्यात आला तेथील रहाणीमान, जीवनशैली पूर्णत्वाने सकारात्मक रित्या बदलून गेली आहे. वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीयांनाही याचा अभिमान वाटतो. व्यवसायातील स्त्रीयांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळते. त्यांनी पूर्वी पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात साकार होतात. त्यांचा आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दूष्टिकोन सकारात्मक होत जातो. त्यांच्यात आता अमुलाग्र सुधारणा येऊ लागली आहे. असुरक्षित संभोगामुळे उद्भवणारे विकार व त्यावर उपचारासाठे होणारा खर्च ही आता कमी होऊ लागला आहे.

मुल्यमापन भारतीय आरोग्य संघटना, मुंबई भारतीय आरोग्य संघटना, पुणे इतर केंद्रे
सुरवात जुन १९९१ १९९१ ऑगस्ट १९९२
समाजसेवक २१० ८५ १०४
शिक्षण घेतलेले कार्यकर्ते ६० ३०
पसरलेले कार्यक्षेत्र १२
वेश्याव्यवसाय करणा-या स्त्रीया ५५०० ३५०० १६००
कंडोमचा वापर/दर महिना ५,००,००० ३,५०,००० १,००,०००

मिरज सांगली सारख्या ठिकाणची जबाबदारी संग्राम या संस्थेने घेतलेली आहे. कोल्हापुर व लातुरचे कार्य १९९५ मध्ये बंद झाले. समाजसुधारणेसाठी भारतीय आरोग्य संघटनेने रक्षाबंधन, भाऊबिज सारखे कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमांना गेली १६ वर्षे चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या कार्यक्रमांमुळे आनंद व मानसिक आधार तर मिळतोच पण आपापसात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होतात.

लैंगिक विकारांसाठी फिरता दवाखाना
निरिक्षण, मुल्यमापन व आकडेवारीवरुन लक्षात आले की वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीयांना नियमित तपासणी व आरोग्याची सुश्रूषा घेण्याची आवश्यक्ता आहे. यासाठी अशापरिसरात दवाखाना असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पण जमिनीच्या किमती अफाट असल्याने प्रत्यक्षात ते शक्य होत नाही. यासाठी एक उपाय म्हणून फिरता दवाखाना सुरु करण्यात आला. यामुळे सर्वसामान्य तपासणीपासून वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीयां व त्यांच्या राहत्याजागे पर्यंत पोहचण्याची सोय झाली. याचाच आणखी एक फायदा म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले.

या फिरता दवाखाना या संकल्पनेत डॉक्टर, समाजसेवक, आरोग्याबद्दल माहिती देणारे यांचाही समावेश आहेच. आरोग्य तपासणीसाठी टेबल, १० लोकांना बसता येईल अशी व्यवस्था व औषधे सुरक्षित ठेवता येतील अशी व्यवस्था या फिरत्या दवाखान्यात असते. हा उपक्रम सर्वप्रथम १९९० मधे सुरु करण्यात आला. सध्या हा उपक्रम मुंबई व पुणे विभाग प्रामुख्याने सुरु आहे. या फिरत्या दवाखान्यामार्फत पुढील कामे केली जातात.

समाज सेवकांना STD व HIV/AIDS बद्दल माहिती पुरवली जाते. कंडोम वाटप, वेश्याव्यवसायातील स्त्रीया व त्यांच्या लहान मुलांच्या आरोग्य तपासण्या केल्या जातात. काम करणारे समाजसेवक, सहेली आणि अतिशय आजारी महिलांना दवाखान्यात पोहचण्यासाठी वाहतुकीचे साधन म्हणून या फिरत्या दवाखान्याचा उपयोग होतो.

परीणाम:
गेल्या ७ वर्षात सहेलीने आपली सुरवातीची उद्दिष्ट्ये कधीच साध्य केली आहेत. फोर्ड फाउंडेशन, हावर्ड इंस्टीट्यूट सारख्या स्वतंत्र संस्थांनी सहेलीच्या कामाचा आढावा घेतला. लैंगिक रोग ७५% कमी झाले असून वेश्यांकडे जाणार्‍या लोकांची संख्या ५६% नी कमी झाली आहे. गर्भपाताचे प्रमाण कमालीचे कमी झाले. निरोध वापरणार्‍यांची संख्या कमालीची वाढलेली असून ती वाढतेच आहे. STI व HIV संसर्गाचे प्रमाणही हळूहळू आटोक्यात येऊ लागले आहे. एकेकाळी सहेलीने ज्यांना ज्यांना शिक्षण दिले त्या आज चांगल्या कार्यकर्त्या झाल्या आहेत. आज त्या इतर महिलांसाठी आदर्श व्यक्तीमत्व म्हणून कार्यरत आहेत. खालील तक्त्यात १९९१ हे सुरवातेचे वर्ष मानून वेश्यांची संख्या, त्यांच्या ग्राहकांची संख्या, कंडोम वापरणार्‍यांची संख्या व STI व HIV चे प्रमाण यांची १९९७ च्या संख्ये बरोबर तुलना केली गेली आहे.

साल वेश्यांची सख्या एच.आय.व्ही. चा संसर्ग असणारे ग्राहक ग्राहक/दिवस एकंदर ग्राहक संख्या कंडोमचा वापर एच.आय.व्ही. लागण/दिवस
१९९१ १,००,००० ३२,००० ५,००,००० २५००० ३०४
१९९७ ६०,००० ४२,००० १,८०,००० १,२६,००० १०२
१९९७ सहेली ५,००० २,१०० १५,००० १४,२५०

महिलांकडून HIV चा संसर्ग होण्याचे प्रमाण ०.२३% आहे.
 1. प्रशिक्षित सहेली एकावर्षात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या जवळजवळ ५५०० लोकांना शिक्षण देते. म्हणजेच थोडक्यात सहेली दिवसाला २५ महिलांना मदत करत असते. एका वेश्येकडे दररोज सरासरीने तिन तरी ग्राहक जात असतात म्हणजेच वर्षाला सरासरीने एका वेश्येकडे ११०० ग्राहक जात असतात. सहेली मार्फत त्यातल्या बर्‍याच प्रमाणात लोकांना ज्ञान देण्याचे कार्य पूर्ण होते.
 2. १९९२ पासून पुढे वेशा व्यवसाय करणार्‍याच्या संखेत ३०% घट झाली आहे.
 3. वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीयांकडे जाणार्‍यांची (प्रत्येक दिवसामागे) संख्या ५ वरुन ३ वर आली आहे.
 4. त्याचा परीणाम म्हणजे एकूण जाणार्‍या ग्राहकांची संख्या ५,००,०० वरुन २,१०,००० वर आली आहे म्हणजेच ५६% ग्राहक दर कमी झालेला आहे.
 5. कंडोम वापरणार्‍यांच्या संख्येत वाढ झालेली असून ५% वरून ती संख्या ७०% वर आलेली आहे.
 6. १९९२ मधे वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीयांकडून संसर्ग होण्याचे प्रमाण रोज ५०० होते ते प्रमाण आता १०० वर आले आहे.
 7. लैंगिक विकार उद्भवणार्‍यांची संख्या ७२% वरुन ३२% वर आली आहे.
 8. रक्तदान करणार्‍या सुदृढ लोकांना HIV चा संसर्ग होण्याचे प्रमान स्थिर आहे. गर्भवती महिलांना होणारा HIV संसर्गही स्थिर आहे. (१.६% ते १.७%)
 9. एक वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलेवर साधारण १०० रु वार्षिक खर्च येतो. एकंदर वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीया ५,६५,००० आहेत.
वापरानंतर कंडोम फेकून देण्यासाठी एक पेटी देण्यात आली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता कारण त्याचा गैरवापर करण्यात आला होता. त्यापेटीचा वापर पाणी साठवण्यासाठी करण्यात येत असे. प्रत्येक वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीची तपासणी झालीच पाहिजे असा कायदा करण्यात आला आहे. ही तपासणी HIV/AIDS साठी केली जाते व त्यानंतर त्यांच्या शरीरावर तपासणीची ओळखदेणारी कायमस्वरुपी निशाण रहाते. हे निशाण विशेष अशा शायीने केले जाते. जर अशांना HIV चा संसर्ग झाला असेल तर सहेली वेळेवरच उपचारासाठी त्यांना घेऊन जाते व संभाव्य धोका टळू शकतो. वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रीयांची संघटनाही उभारण्यात आली होती पण काही कारणास्तव ती टिकू शकली नाही.

दिर्घकालीन योजना
"इंटर एड्स फ्रान्स" १९९३-९४ पासून सहेलीला सहकार्य करत आहे. त्यानंतर मात्र सहेली स्वतंत्ररित्या काम करत आहे. १९९५-९६ मधे एड्स सेल महाराष्ट्र यांनी सहेलीला औषधांसाठी सहकार्य प्रदान केले. खर्च वाचवण्यासाठी भारतीय आरोग्य संघटनेनी कार्यकर्ते कमी केले. वेश्या महिलांना प्रशिक्षण दिल्यामुळे हे अभियान चालू ठेवण्यासाठे खूपच मदत झाली. खासकरुन स्वमदत संस्थांद्वारे मदत मिळत गेली.

अनुकरण
सहेली भारतात व परदेशात एक आदर्श संघटना म्हणून ओळखली जाते. बर्‍याच निमसरकारी संस्था व सरकारनेही सहेलीची जशीच्या तशी किंवा थोडाफार बदल करुन आणखी काही उपक्रम राबवले. "एखाद्या व्यक्तीला खूष करण्यासाठी अनुकरण केले असेल तर आम्ही सुद्धा खूष आहोत. आम्ही आमचे कौशल्य व अनुभव ज्याठिकाणी गरजेचे आहे त्याठिकाणी दिले आहेत. जर असेच अनुकरण इतर ठिकाणी सुरु केले तर भारत देशातील संभाव्य मोठा धोका टळू शकेल". असे मत सहेलीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
 1. १९९३ मधे भारतेय आरोग्य संघटनेने सहेलीचे अनुकरन केले. मिरज, सांगली, सातारा, कोल्हापुर, लातुर, अहमदनगर व श्रीरमपुर येथे १९९५ मधे सहेलीचे अनुकरण केले गेले. १९९६ मधे कोटावर जोधपुर येथे सहेलीचेच अनुकरण केले गेले.
 2. १९९२ मधे पॉप्युलेशन सर्व्हीसेस इंटरनॅशनलनी भारतीय आरोग्य संघटनेच्या दोन कारयकर्त्यांच्या मदतीने वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांसाठी अभियान सुरु केले.
 3. WHO व IHO ह्या जागतिक आरोग्य संघटनांनी वेश्या व्यवसाय संघटनेचे निरिक्षण व अभ्यास केला व "सोनागच्ची" अभियान सुरु केली.
 4. इंटर एड्सनी डॉ. विजय ठाकूर, प्रकल्प संचालक सहेली यांची मदत घेऊन अशाच प्रकारचे उपक्रम १९९२-९३ मधे ओरीसा, महाराष्ट्र, कर्नाटक, आध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू येथे सुरु केले.
 5. मिना शेशू (सहेली प्रकल्प व्यवस्थापक) यांनी १९९३ मधे संग्रामची स्थापना करुन कर्नाटक व महाराष्ट्र येथे कार्य सुरु केले.
तात्पर्य
अत्तापर्यंत वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांच्या हालाखीच्या स्थितीकडे दुर्लक्ष केले गेले पण आता मात्र दुर्लक्ष करुन चालणार नाही कारण HIV/AIDS चा धोका वाढत चालला आहे. AIDS बद्दल झालेल्या जागरुकतेमुळे नितीमत्ता सुधारली त्याशिवाय वेश्यांचा गैरफायदा घेणा-यांवर वचक बसला. भारतीय आरोग्य संघटनेची स्थापना सकारात्मक द्रूष्टिकोन आणि आशा यांच्या जोरावर सुरु झालेली आहे. सहेली मधे ९५% अशिक्षित कार्यकर्ते आहेत. पण HIV च्या संसर्गावर काळजी व उपचार करणारी ती एक सामर्थ्यवान संघटना बनणार आहे. HIV संसर्गाचे प्रमाण देशात वाढत आहे. पण मुंबई मधे मात्र हे प्रमाण गेली दोन वर्षे स्थिर आहे. कारण वेश्यांमधील HIV च्या संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आले आहे.

विस्तार
HIV संसर्गाचा प्रवास वेश्यांपासून अर्भकापर्यंत पोहचला आहे. गरीबी, अशिक्षितता, श्रीमंती व गरीबीचा दुरावा आणि अगणित भ्रष्टाचार असलेल्या या देशामधे काही कार्यकर्ते झाडासाठी प्राण्यांसाठी व मानवी हक्कांसाठी काम करत आहेत. पण गर्भामधील बाळाकडे दुर्लक्ष होत आहे.

भारतीय आरोग्य संघटनेनी अर्भकांसाठी ’एड्सविना जीवन’ या घोषवाक्याचा पाठपुरावा केला आहे. दरवर्षी २७ लाख अर्भके जन्माला येतात आणि ०.५% मातांना एड्सचा संसर्ग आहे. सुमारे १४००० मुले अनाथ म्हणून जन्माला येतात आणि जवळ जवळ ४५००० मुलांना जन्मतःच HIV चा संसर्ग झालेला असतो. न जन्मलेली मुल जगाला विचारत आहेत ’मी जन्माला येईन त्यावेळी मला काय हक्क मिळणार आहेत. मी HIV शिवाय जन्माला येईन का? मी अनाथ असेन का?’

सखी सहेली (भारतीय आरोग्य संघटना)
वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांना स्वतःचे विचार प्रदर्शित करण्यासाठी १९९२ मधे मराठी व हिंदी भाषांमधे एक त्रैमासिक सुरु करण्यात आले. त्याचे नाव सखी सहेली असे आहे. संपादक मंडळ या त्रैमासिकाला माहिती पुरवते. जास्तित जास्त माहिती वेश्या महिलांकडूनच येते. यात सर्वकाही त्यांच्या जीवनावर आधारित असते. या त्रैमासिकात त्यांच्या आशा आकांशा, भिती, बातम्या विचार, कविता, विनोद, घोषवाक्य व कार्यक्रम यांचा समावेश असतो.

जरी वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीयांमधे अशिक्षिततेचे प्रमाण जास्त असले तरी शिक्षित महिला आपल्या मैत्रीणींना मासिक वाचून दाखवतात त्यामुळे त्यांना नैतिक बळ येते. त्यांच्यात सृजनशीलता निर्माण होते आणि त्यांची स्वतःची ओळख निर्माण होते. हे त्रैमासिक इतरांसाठी साहित्य बनते. सर्वसामान्य जनतेलाही या बद्दल माहिती मिळत असते. एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात या विषयावर एक स्तंभ आवर्जून ठेवला आहे. एका महिन्यात ०.८ लाख कंडोमचे वाटप भारतीय आरोग्य संघटनेकडून होते. या कंडोमना पैसे द्यावे लागत नाहीत. या कंडोमचे वाटप डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस आणि केंद्र सरकार मार्फत होते. १९९२-९३ मधे कंडोमचा तुटवडा होता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कंडोम दुकानात मिळत नव्हते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya