Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एस.टी.आय. एस टी आय उपचार

एस टी आय उपचार

Print PDF
जंतूंच्या लागणींमुळे होणारे गोनोरेहा, सिफिल्स, किंवा कॅंक्रोईड सारखे बॅक्टेरियल STI ह्यावर ऍन्टिबायोटिक्सने उपचार होऊ शकतात. त्यामुळे बॅक्टेरियल STI असलेल्या व्यक्तीला डॉक्टर सहसा ऍन्टिबायोटिक्सचा उपचार सुरू करतात. त्याचा गोनेरेहा आणि क्लॅमेडिया सारख्या STI साठी नक्कीच उपयोग होतो.

लैंगिक भागाजवळ होणारी नागिण HSV , ह्युमन पॅपिलोमाव्हायरस HPV , आणि ह्युमन इम्युनोडेफिशिएन्सी व्हायरस HIV , हे पूर्णत: बरे होत नाहीत, परंतु दिसणार्‍या लक्षणांच्या मदतीने आटोक्यात नक्कीच राहू शकतात.

फंगल (योनीमार्गावर येणार्‍या बुरशीचे इन्फेक्शन) आणि पॅरासिटिक (ट्रिकोमोनियासिस) STI हे ऍन्टिफंगल आणि ऍन्टिहेल्मिन्थिक एजण्ट्सच्या मदतीने आटोक्यात राहू शकतात.

STI चे उपचार हे त्याच्या इन्फेक्शनवर अवलंबून असतात. ऍमॉक्सिसिलीन(किंवा ऍम्पिसिलिन) आणि त्याच्या बरोबरीने टेट्रासायक्लिन अशी ट्रीटमेन्ट uncomplicated gonococcal infection ह्यासाठी सुचवली जाते. गोनोरेहा किंवा क्लॅमेडिया ह्यासाठी डॉक्टर कदाचित ऍझिथ्रोमायसिन किंवा फ़्लॉक्सिन ह्यासारखी ओरल ऍंन्टिबायोटिक्स सुचवू शकतात.

योनीमार्गाजवळ होणारी नागिण हे तर तुमची पाठ न सोडणारे इन्फेक्शन आहे. त्यावर सतत उपचार घ्यावे लागतात. परंतु जर लक्षणे दिसायला लागल्यावर लगेचच योग्य निदान करून उपचार सुरू केल्यास आजार नियंत्रणात राहू शकतो. त्यासाठी antiviral medication म्हणून acyclovir (Zovirax), famciclovir (Famvir) or valacyclovir (Valtrex) ही औषधे उपयोगी ठरू शकतात. अशी लागण असलेल्या रुग्णाने हा औषधांचा साठा सतत बरोबर ठेवला, तर अचानक आजार बळकावल्यासही लगेच उपचार सुरू करता येतील. STI असणार्‍या ८०% व्यक्तींना ह्याप्रकारची नागिण ही होतेच होते.

सिफिलिअस वर उपचार करण्यासाठी सहसा पेनिसिलिनचा वापर केला जातो. योनीमार्गाजवळ येणारे चट्ट्यांवर उपचार करण्यासाठी ऑईन्मेंट्सचा वापर केला जातो.

गरोदरपणात STI वर केले जाणारे उपचार
अनेक प्रकारच्या STI वर गरोदरपणात उपचार केले जाऊ शकतात. गरोदरपणात STI झाले असल्यास त्यावर त्वरित उपचार करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. कारण काही प्रकारचे STI हे आईच्या रक्तातून, प्लॅसेंटामधून बाळामधे जाऊ शकतात.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya