Friday, Jul 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एस.टी.आय. एस टी आय चे निदान

एस टी आय चे निदान

Print PDF
जर तुम्हाला तपासताना तुमच्या डॉक्टरांना शंका आली, तर ते "तुम्हाला किंवा तुमच्या जोडिदाराला STI ची बाधा आहे का." असे नक्की विचारतील.

त्यानंतर डॉक्टर तुम्हाला तपासतील. विशेषत: स्त्रीयांचा योनी मार्ग आणि त्याच्या आजूबाजूला, गुदा मार्ग, पुरुषांच्या लिंगाचा अग्रभाग इत्यादी. तसेच डॉक्टर मल-मूत्र तपासणी, स्त्रीयांच्या मासिकपाळीची तपासणी करतील. हे सर्व चाचणीसाठी लॅबोरटरीला पाठविण्यात येईल. क्वचीत एखादे डॉक्टर तुमच्या सूज आलेल्या भागातून सुई टोचून तिथली सुद्धा थोडी तपासणी करू शकतात.

तुमच्या प्राथमिक शाररिक तपासणी वरून डॉक्टर पुढील तपासणी करायची गरज आहे की नाही हे ठरवू शकतात. उदाहरणार्थ: योनीमार्गावर होणारी वेदना म्हणजे तुम्हाला योनीमार्गावर झालेली नागिण असू शकते. किंवा वेदनारहीत अल्सर म्हणजे सिफिलिस असू शकतो. अशा तर्‍हेने इन्फेक्शनवर तुम्ही लवकरात लवकर उपचार सुरु करणे गरजेचे असते. अगदी लॅबोरटरीतील निकाल येण्याआधी सुद्धा डॉक्टर तुम्हाला बेसिक उपचार सुरू करू शकतात.

रुग्णावर दिसणार्‍या विविध लक्षणांनुसार त्याला वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. जर तुम्हाला योनीमार्गावर झालेली नागिण किंवा अल्सर असेल त्याप्रमाणे लॅब मधे चाचणी करावी लागेल आणि लॅब मधे तुम्हाला HIV antibodies आहेत का, ह्याचीही चाचणी करण्यात येईल. शरिरात gonorrhea and chlamydia infections हे जंतु आहेत की नाही हे पहाण्यासाठी डॉक्टर स्त्री/पुरुषांच्या मुत्रपिंडामार्गे येणारा द्राव तपासणीसाठी पाठवतात. ह्या सर्व चाचण्यांनंतर जर रुग्णामधे STI ची बाधा आहे असे निदान झाले तर डॉक्टर्स रुग्णाला HIV antibodies टेस्ट सुद्धा नक्कीच करून घ्यायला सांगतील.

नियमित संभोग करणार्‍या व्यक्तींना, त्यातही जे वेगवेगळ्या व्यक्तींशी संभोग करतात अशांना डॉक्टर्स नियमीत STI ची चाचणी करून घ्यायला सांगतात. STI ची चाचणी वेगवेगळ्या तर्‍हेने होऊ शकते. डॉक्टर कदाचित रुग्णाला आधी अनेक तोंडी प्रश्न विचारतील, आणि त्यातून निघणार्‍या तात्पर्यातून पुढील शाररिक चाचण्या करून घेण्यास सांगतील. किंवा कधी एखादे डॉक्टर प्रथम शाररिक तपासण्या करून त्यावरून पुढील चाचण्या करावयास सांगतील. तरीही रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे जाईल तेव्हा त्याने आपनहोऊन आपल्या सर्व व्याधी आणि होऊन गेलेल्या व्याधी डॉक्टरांना सांगणे इष्ट ठरेल.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya