Monday, Aug 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एस.टी.आय. एस.टी.आय. (STI) प्रतिबंध

एस.टी.आय. (STI) प्रतिबंध

Print PDF
संयम आणि एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत संबध टाळणे
एस.टी.आय. चे संक्रमण थांबवण्याचा सर्वात विश्वसनीय उपाय हा सुरक्षित संबध (म्हणजे योग्य त्या गोष्टींचा वापर करून मौखिक, योनीमार्गे, अथवा गुदा संभोग) ठेवणे हा आहे, किंवा दिर्घकाळ संसर्गित व्यक्ती सोबत संबध ठेवणे टाळा. STI सहीत जगणार्‍यांसाठी अथवा त्यांच्या सहचरांसाठी काउन्सेलिंग हे अतिशय महत्त्वाचे असते. काउन्सेलिंग मुळे STI विषयीचे समज गैरसमज, घ्यावयाची काळजी अशा अनेक गोष्टींसाठी एस.टी.आय.सहीत जगण्यासाठी खूपच उपयोग होतो.

प्रि-एक्सपोझर लसीकरण
प्रि-एक्सपोझर लसीकरण हे एस.टी.आय. चा संसर्ग थांबवण्याचा सर्वात प्रभावी लसीकरणांपैकी एक आहे. उदाहरणार्थ: HBV इन्फेक्शन हे नेहमीच लैंगिक संबंधांद्वारे प्रसारित होते. हिपेटायटीस बी ही लस प्रि-एक्सपोझर लस न घेतलेल्यांसाठी उपयोगी ठरते. तसेच, हिपेटायटीस ए ही मान्यताप्राप्त लस ही सर्व समलिंगी पुरुषांसाठी (MSM) , आणि ड्रग्सचे व्यसन असणार्‍यांसाठी (दोन्ही व्यसने: इन्जेक्टिंग आणि नॉन इन्जेक्टिंग) सुचवली जाते. तसेच ९ ते २६ वयोगटातील स्त्रीयांसाठी क्वाड्रिव्हॅलंट व्हॅक्सिनेशन योग्य असते.

मेल (पुरुषांचे) कंडोम्स
जर योग्य रितीने वापर केला तर STI व्याधी रोखण्यासाठी मेल कंडोम्स हे अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे HIV आणि STI ह्या दोनही व्याधींवर (Chlamydia, gonorrhea, and trichomoniasis सहीत) आपण अवरोध घालू शकतो. कंडोम्सच्या वापरामुळे नागिण, सिम्प्लेक्स व्हायरस २ (HSV-2) , HPV आणि त्याच्या बरोबरीच्या व्याधी (उदा: जेनिटल वॉर्ट्स, सर्व्हायकल कॅन्सर इत्यादी), ह्या सर्वांपासून बचाव करण्यास उपयुक्त ठरतात. मेल कंडोम्सचा योग्य रोतीने वापर झाल्यास ह्या आजारांना थांबविण्यासाठी ७०% मदत होऊ शकते.

कंडोम योग्य रीतीने न वापरल्यास, त्यावर लिहिलेल्या सूचना न वाचता वापरल्यास कंडोमचा वापर अयशस्वी ठरू शकतो. आणि अशा तर्‍हेने कंडोमचा वापर अयशस्वी ठरल्यास STI ची किंवा HIV ची लागण होण्यास त्याचा हातभार लागू शकतो. कंडोमचा वापर कसा करावा आणि का करावा ह्याचे पेशंटला योग्य असे मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे असते. पुरुषांना कंडोम्स वापरण्यापूर्वी खालील गोष्टी माहित असणे अत्यंत आवश्यक आहे:
  • प्रत्येक वेळी संभोग क्रीया करताना नवा कंडोम वापरावा. (मौखिक, लैंगिक अथवा गुदा संभोग.)
  • कंडोम हाताळताना त्यास नखे, दात, किंवा कोणत्याही धारदार गोष्टी लागू देऊ नका.
  • कंडोमच्या बरोबरीने फक्त वॉटर बेस्ड ल्युब्रिकन्ट वापरावे.
फिमेल (स्त्रीयांचे) कंडोम
HIV/STI व्हायरस, आणि त्यासारखे इतर विषाणू ह्या सर्वांपासून बचाव होण्यासाठी स्त्रीयांचे कंडोम्स हे अतिशय उपयोगी ठरतात, हे अनेक प्रयोगांन्तीसुद्धा सिद्ध झाले आहे. स्त्रीयांचे कंडोम्स योग्य रितीनी वापरले गेल्यास बॅक्टेरियांचा प्रभावीपणे अवरोध केला जातो.

गर्भनिरोधक, सर्जिकल बंध्याकरण आणि गर्भाशय
गर्भवती होण्याची भीती नसणार्‍या लैंगिक सक्रीय स्त्रीयांमधे कधी कधी त्यांना एच.आय.व्ही. किंवा एस.टी.डी. होण्याची भीती नाही असा अतिशय मोठा गैरसमज असण्याची शक्यता असते. परंतु असे गाफील राहिल्यामुळे कोणतीही गंभीर लगण पटकन होऊ शकते.

इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन (EC)
ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ह्या आप्त्कालिन गर्भनिरोधक म्हणून तोंडावाटे घेतलेल्या गोळ्या असतात. कंडोमशिवाय केलेल्या संभोगातून बचाव होण्यासाठी ह्या तोंडावाटे घेतलेल्या गोळ्या असतात. ह्या गोळ्यांमुळे गर्भधारणा होण्याची शक्यता ८९% टळते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya