Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एस.टी.आय. सर्वसामान्य एस.टी.आय. इन्फेक्शन

सर्वसामान्य एस.टी.आय. इन्फेक्शन

Print PDF
जवळपास २० पेक्षा जास्त एस.टी.आय. चे प्रकार आहेत. त्यापैकी काही रोगांची लक्षणे ही डॉक्टरांच्या लक्षात लवकर येतात. बर्‍याच वेळा पेशंटला हा आजार असला तरी रोगाची लक्षणे ही लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही असुरक्षित संबधामध्ये सहभागी असाल तर एस.टी.आय. साठी टेस्ट करणे आवश्यक आहे.

सर्व सामान्य एस.टी.आय. चे प्रकार
  1. गोनोरोहीए- या प्रकारच्या विषाणुमुळे होणार्‍या लागणीमुळे लिंग/योनी मधून डिस्चार्ज होतो. त्यामूळे ५०% महिला आणि १०% पुरुष ज्यांना गोनोरोहीएची लागण झाली आहे, त्यांना काहीच लक्षणे जाणवत नाहीत. या इन्फेक्शन साठी जर योग्य प्रकारचे उपचार नाही मिळाले तर गुंतागुंत वाढू शकते. गोनोरोहीए हा ऍन्टिबायोटीक ओषध उपचारांनी बरा होऊ शकतो. या इन्फेक्शन मुळे मूल होण्यास अडचणी येऊ शकतात.
  2. क्लॅमिडिया- क्लॅमिडिया ट्रकोमॅटीस हा अतिशय शांत प्रकारचा असा संक्रमक रोग आहे. कारण हे इन्फेक्शन झालेल्या लोकांना आपल्याला इन्फेक्शन झाले आहे असे वाटतच नाही. फार कमी लोकांमध्ये याची लक्षणे आढळून येतात. याप्रकारचे इन्फेक्शन हे ऑस्ट्रेलीयामध्ये जास्त प्रमाणात आढळुन येते. हा आजार औषध उपचारांनी बरा होतो. पण योग्य वेळी जर उपचार नाही मिळाले तर समस्या वाढु शकतात. याचे निदान होणे हे तसे कठीण असते कारण ७५% स्त्रिया आणि २५% पुरुष ज्यांना याची लागण झाली आहे त्यांच्यामध्ये याची काहीच लक्षणे आढळुन येत नाहीत
  3. सिफिलिस- सिफिलिस ह्या विषाणुचे इन्फेक्शन हे सहजरित्या होऊ शकते. याचे पहिले लक्षण म्हणजे घश्यामध्ये छाले पडणे ज्यांच्या वेदना देखिल होत नाहीत. सिफिलिस ओषध उपचारांने बरा होतो ,जर याच्या वर योग्य वेळी उपचार घेतले नाहीत तर हे इन्फेक्शन पुर्ण शरिरात पसरते आणि इतर अवयवांना देखिल इजा पोचवते.
  4. ट्रायकोमोनास- ट्रायकोमोनास वॅजिनिला हा एक अत्यंत सुक्ष्म प्रकारचा विषाणू आहे आणि याची यामध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळुन येतात आणि कधी कधी येत नाहीत परंतु याच्यावर उपचार आहेत.
  5. ह्युमन पॅपिलोमाव्ह्यायरस- ह्या विषाणुचे संक्रमण लैगिक भागांवर होते. काही प्रकारच्या विषाणुंमुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका असतो. लवकर निदान झाल्यास तो आटोक्यात येऊ शकतो.
  6. हिपेटायसीस ए आणि बी- हे इन्फेक्शन लैंगिक संबधातुन होते. हे लिव्हरवर परिणाम करुन लिव्हरला नुकसान पोचवते. याच्यावर उपचार आहेत पण त्याचे दुषपरीणाम आहेत. याच्यामुळे लिव्हरच्या कॅन्सर सुध्दा होऊ शकतो.
  7. थ्रश - हे इन्फेक्शन हे यिस्ट Candida albicans या मुळे होते. या मुळे त्वचेवर, तोंडात, पोटात दुष्परीणाम होतात. या इन्फेक्शन मुळे खाज सुटते , जळजळ होणे ही लक्षणे आढळतात. या इन्फेक्शनमुळे व्हाईट डिस्चार्ज होतो आणि संभोगाच्या वेळी वेदना होतात. या इन्फेकशन वर एक गोळी किंवा क्रिम उपयुकत ठरते.
  8. नागिण- ह्याचा प्रसार त्वचेच्या संपर्कातुन होतो. जर तुम्हाला नागिण झाली आहे आणि जर तुम्ही तुमच्या जोडिदाराशी संभोग केला तर त्याला देखिल याची लागण होण्याची शक्यता असते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya