Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एस.टी.आय. सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STI) ची लक्षणे

सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STI) ची लक्षणे

Print PDF
STI ची बर्‍याचदा काही ठराविक लक्षणे नसतात. त्यमुळे कधी कधी संभोग केल्यावर एखाद्या व्यक्तीच्या मनात आपल्याला STI झाला आहे असा विचार येऊ शकतो. डॉक्टरांकडे जाऊन केलेली तपासणी हा त्यावरील खात्रीशीर पर्याय आहे, ज्यावरून आपल्याला STI ची लागण झाली आहे की नाही ते स्पष्ट होते.

कारण STI ची लागण कोणालाही होऊ शकते. त्यासाठी स्वत:मधे आणि इतरांमधे नेमकी कोणती लक्षणे दिसतात हे महत्त्वाचे असते. योनी मार्गातील शाररिक बदल काळजीपूर्वक तपासा आणि त्यासाठी सावध रहा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे कदाचित लगेच दिसतील किंवा कधी कधी खूपच उशिरा दिसतील. कधी ही लक्षणे दिसायला काही आठवडे जातील तर कधी महिने जातील. कधी कधी आधी दिसणारी लक्षणे दिसेनाशी होतील पण तरीही आतमधे STI ची व्याधी ही असू शकते. STI ची व्याधी ही आपोआप उपचारांशिवाय जाऊ शकत नाही. त्यासाठी उपचार हे अतिशय आवश्यक आहेत.

खालील पैकी काही लक्षणे आपल्याला STI ची व्याधी आहे हे दाखवू शकतात.
  • योनीमार्गातून होणारा असामान्य स्त्राव (ज्याचा खूपच वेगळा वास येऊ शकतो)
  • योनीमार्गास खाली वर आणि आतील बाजूस येणारे - न थांबणारे दुखणे, ज्याचा आपल्याला संभोगाच्यावेळीही त्रास होऊ शकतो.
  • योनीमार्गास होणारी भयानक जळजळ आणि खाज.
  • मासिक पाळी सोडून इतर वेळीही योनीमार्गातून होणारा रक्तस्त्राव.
  • शोरेस, बुम्प्स, ओर ब्लिस्तेर्स नेअर यौर से़ ओर्गन्स, रेच्तुम, ओर मौथ.
  • लघवी होताना योनी दुखणे/जळजळणे.
  • घसा लाल होणे किंवा सुजणे
  • लैंगिक अवयवांच्या बाजूला येणारी सूज.
आपल्याकडे स्त्रीया बर्‍याचदा योनीमार्गाला ह्या पैकी काहीही झाले तरी दुर्लक्ष करतात. डॉक्टरांना किंवा घरातल्यांना सांगायला संकोचतात. त्यावर उपचार घेत नाहीत. अंगावर दुखणे काढतात. परंतु त्याचे पर्यवसन कॅन्सर पासून वंध्यत्वापर्यन्त कशातही होऊ शकते, आणि त्याचे गंभीर परिणाम होतात. STI मुळे pelvic inflammatory disease सुद्धा होऊ शकतो, ज्यामुळे ectopic pregnancy सुद्धा येऊ शकते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya