Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन [ STI ]

STI म्हणजे मनुष्य आणि प्राण्यांच्या लैंगिक संबंधातून पसरणारे रोग किंवा इन्फेक्शन्स. त्याला व्हेनेरिअल डिसीज म्हणजेच VD असेही म्हणतात. STI ही एक सर्व प्रकारचे लैंगिक संबंध व मौखिक संबंधांद्वारे पसरणारी खूप गंभीर समस्या, आजार आहे. STI हा शब्द STI बाधीत व्यक्तींसाठी तसेच STI ची बाधा होण्याची शक्यता होण्याची शक्यता असणार्‍यांसाठीही वापरला जातो. काही प्रकारचे STI संक्रमण हे IV ड्रगच्या सुयांमधूनही होऊ शकते. IV ड्रगच्या सुया जर आधी एस.टी.आय. बाधीत व्यक्तीने वापरल्या आणि त्या न बदलता दुसर्‍याने वापरल्या तर STI चा प्रसार होऊ शकतो. STI चे कारण हे विविध प्रकारचे विषाणू, बॅक्टेरिया, पॅरासाईट्स, फंगस ह्या प्रकारचे असतात. STI हे खूप वेदनादायी, दु:खदायी, कमजोरी आणणारे विषाणू असतात.

STI चा प्रसार अनेक प्रकारे होऊ शकतो.
  • STI चा प्रसार हा मुख्यत्वे लैंगिक संबंधांद्वारे होतो, कारण STI चा विषाणू हा जास्त करून वीर्य, रक्त आणि द्रवरूपी संक्रमणातूनच होतो.
  • एखाद्या व्यक्तीला जर तोंडात छोटीशी जखम असेल तर STI चा प्रसार हा कधी कधी लाळेतूनही होऊ शकतो.
  • सुईमधील कलुषित रक्त किंवा अस्वच्छ पुनर्वापर केलेली सिरिंज STI चा प्रसार करू शकते.
  • STI बाधीत गरोदर स्त्रीया त्यांची STI व्याधी ही बाळामधे देऊ शकतात. ही व्याधी गरोदरपणात आणि नंतर दुग्धपानातून सुद्धा बाळामधे जाऊ शकते.
  • STI ची व्याधी रोखण्यासाठी कोणतीही लस नाही. काळजी घेण्यासाठी "हिपेटायटीस बी" चा उपयोग होऊ शकतो. जर तुम्हाला एकदा STI बाधा झाली, तर ती परत परत सुद्धा होऊ शकते.
STI वर उपचार होऊ शकतात, परंतु त्याकडे एकदाही दुर्लक्ष करून चालत नाही. त्याची दाहकता परत परत उद्भवू शकते.

तुम्ही जर कंडोमचा वापर योग्य तर्‍हेने केला नाही तर योनी, मौखिक किंवा गुदा अशा कोणत्याही मार्गे आपल्याला STI बाधा होऊ शकते. गुदा द्वारे केलेला संभोग हा खूपच धोकादायक असतो, कारण त्यामधून सहसा रक्तस्त्राव हा होतोच. एकमेकांच्या सुया (सिरिंजेस) वापरणे, त्यातून ड्रग्स घेणे, कान कोरणे, टाटू करणे इत्यादी क्रीयांमर्फत सुद्धा इन्फेक्शनची शक्यता नाकारता येत नाही. काही STI हे गरोदर स्त्री मधून तिच्या गर्भातील बाळामधे जाऊ शकतात. काही वेळा बाधीत व्यक्तीवर STI बाधा झाल्याची चिन्हे सुद्धा दिसत नसतात, आणि तेव्हा पासूनच STI बाधा पसरण्यास सुरवात होते. STI बाधा झाल्याचे, किंवा ही बाधा म्हणजे काय हे माहित नसणार्‍या व्यक्तींमार्फत STI झपाट्याने पसरत असते. STI बाधा होण्यास गरिबी, श्रीमंती ह्या कोणत्याही गोष्टींचा अडसर नसतो. ती कोणालाही होऊ शकते.

अनेकांचा असा गैरसमज असतो की STI चा संसर्ग हा फक्त संभोगाद्वारेच होतो. काही केसेस मधे STI ची लागण ही मौखिक संभोगा मार्गे सुद्धा होते. त्यामध्ये एका व्यक्तीला STI ची बाधा असेल तर ती दुसर्‍या पर्यन्त पसरते. STI चा विषाणू हा जास्त करून वीर्य, रक्त आणि द्रवरूपी संक्रमणातूनच होतो. त्यामुळे एका व्यक्तीला STI बाधा असेल आणि त्याच्या बरोबर मौखिक संभोग करणार्‍या व्यक्तीला तोंडामधे जखम असेल तर STI लगेच पसरतो. नियमित संभोग करणार्‍यांपैकी कुणालाही ही बाधा होऊ शकते. मग ती स्त्री असो अथवा पुरूष, वय, देश, गाव, जाती धर्म, गरीबी, श्रीमंती ह्या कोणत्याही गोष्टी मग मधे येत नाहीत. अमेरिकेत १५ ते ५५ वयोगटातील व्यक्तींमधे ४ पैकी एका व्यक्तीला STI ची लागण होते. आणि किशोर वयीन मुलांमधे आणि तरूण व्यक्तींमधे ह्याची लागण सर्वाधीक दिसून येते. ह्याचे कारण तरुणांमधे कामभावना आणि तेवढी उर्जा जास्त असते, आणि ती उर्जा असल्याने तरूण व्यक्ती लैंगिक क्रीयेमधे धोके सुद्धा पत्करताना दिसतात.

STI बद्दलचा गैरसमज
STI बद्दलचा मोठा गैरसमज म्हणजे तरुणांना वाटते की पहिल्यांदा संभोग क्रीया केल्यावर स्त्री गरोदर राहु शकत नाही, अथवा आपल्याला कोणतेही इन्फेक्शन होऊ शकत नाही.

वस्तुस्थिती
पहिल्या संभोग क्रीये नंतर लगेचच सुद्धा कोणतेही इन्फेक्शन होऊ शकते. संभोगक्रीया पूर्ण झाली नाही असे वाटले तरीही STI बाधा होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संभोगक्रीयेसाठी कंडोम वापरणे अत्यावश्यक असते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya