Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एस.टी.आय. STI एस.टी.आय. होण्याची कारणे

STI एस.टी.आय. होण्याची कारणे

Print PDF
STI होण्याचे कारण पुढील तीन पैकी एक असू शकते.

१. पॅरासाईट्स: (परजीवी) पॅरासाईट्स हे खूप सूक्ष्म जंतू असतात, ज्यांच्यामुळे कोणतीही व्यक्ती संक्रमित (इन्फेक्टेड) होऊ शकते. ह्या जंतूचे प्रसारण संभोगातूनच होते.

२. बॅक्टेरिया: (जीवाणू) बॅक्टेरिया हा खूप सूक्ष्म, अणू एवढा जंतू असतो. ते त्या त्या व्यक्तीच्या शरिरात शिरतात तेव्हा आतमधे हल्ला करतात. बॅक्टेरियामुळे गोनोरेहा, सिफिलिस, चॅंक्रॉईड ही STI बॅक्टेरियाची उदाहरणे आहेत.

३. व्हायरस: व्हायरसेस म्हणजे एक जटील जंतूचे उदाहरण आहे. एका व्हायरस मुळे त्याचे अनेक व्हायरसेस मधे रुपांतर होऊ शकते. त्यांमुळे नागिण, एच.आय.व्ही, हिपेटायटीस ह्या सारख्या व्याधी होऊ शकतात.

ज्या व्याधी जंतुंमुळे किंवा व्हायरसमुळे होतात त्या पूर्ण बर्‍या होऊ शकत नाहीत. पण काही बाबतीत त्या आटोक्यात राहू शकतात.

पॅरासाईट्स इन्फेक्शन्स (परजीवी विषाणूंमुळे झालेल्या व्याधी) ह्या अ‍ॅंटिबायोटिक्सच्या औषधोपचाराने बर्‍या होऊ शकतात.
STI ची व्याधी ही बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होते. पुढील गोष्टी केल्यास ही व्याधी होऊ शकते:
  • कोणतीही काळजी न घेता केलेले संभोग.
  • संभोग क्रीया करताना कंडोम गळती होणे.
  • तुम्ही ज्या व्यक्ती बरोबर संभोग करत आहात, त्या व्यक्तीस STI असणे.
  • तुमचा पार्टनर आणखी कुणाबरोबर लैंगिक संबंधात असणे.
काही केसेस मधे, ज्यांना एच.आय.व्ही. पॉझिटीव्ह आहे अथवा हिपेटायटीस बी चे इन्फेक्शन आहे, त्यांच्यामधे दूषीत रक्त किंवा दूषीत सिरिंज द्वारे (ज्या इन्जेक्शन, टाटू, बॉडी पिअरसिंग इत्यादी वापरतात, त्या द्वारे) सुद्धा STI चा प्रादुर्भाव होऊ शकतो. गरोदर स्त्रीया STI/HIV सारखी इन्फेक्शन्स त्यांच्या बाळामध्ये सुद्धा (गरोदर पणात, जन्माच्या वेळी किंवा दूध पाजताना) पास करू शकतात.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya