Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एस.टी.आय. STI होणे कसे टाळाल?

STI होणे कसे टाळाल?

Print PDF


सुरक्षित प्रेम
Dont ignore play safeDont ignore play safe
सुरक्षित प्रेम, म्हणजेच संभोगाच्या वेळी घ्यावयाची काळजी ही अतिशय महत्त्वाची असते. तुम्हाला जर सेक्शुअली ट्रान्स्मिटेड इन्फेक्शन म्हणजेच - STI ची काळजी नसेल, म्हणजे तसा तुम्ही बचाव केला असेल, तर तुम्ही शाररिक प्रेमाचा आनंद मोकळेपणाने घेऊ शकाल. तो आनंद घेण्यासाठी तुमचा स्वत:चा आणि तुमच्या सहचराचा बचाव करा, आणि तशी काळजी घ्या. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही शाररिक प्रेम करायचे ठरवाल तेव्हा आठवणीने कंडोम वापरा.
हे तुम्हालाही होऊ शकते
play it safelyPlay it safely
सर्व सामाजिक स्तरांमध्ये सर्व प्रकारच्या लागणींमध्ये STI ची लागण ही जास्तीत जास्त होतेच होते. "दिशा" ह्या Population Services International, India. द्वारे केलेल्या संशोधनानुसार भारतासारख्या प्रगतीच्या मार्गावर असलेल्या देशांत गोनोरेहा, क्लॅमेडिया आणि सिफिल्स ह्या प्रकारची STI ची इन्फेक्शन्स ही जास्तीत जास्त दिसून येतात.

एखादे STI चे इन्फेक्शन सुद्धा दुर्लक्षित करून चालत नाही, कारण हे इन्फेक्शन एकच न रहाता त्याचे अनेकांमधे रुपांतर करत पसरवत रहाते आणि त्यामुळे आजारही फैलावत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. STI मुळे होणारे छोटे आजार आणि वर्तणुकीतील बदल, ही काही वेळा खूप मोठ्या आजाराची सुध्‍दा लक्षणे होऊ शकतात. STI झाल्याची बर्‍याचदा समजूनच येत नाही, त्यामुळे आपल्या सहचराला काही STI ची बाधा आहे, हे समजायला वेळ लागतो. परंतु एक सुजाण नागरिक ह्या नात्याने प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची नियमित तपासणी करून घेणे, त्यावर इलाज करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. त्याच प्रमाणे स्वत:ला काही व्याधी असल्यास आपल्या सहचराला ते प्रामाणिकपणे सांगणे हे ही अतिशय महत्त्वाचे असते.
लोकांना सहसा काय माहित नसते?
अगदी तुमचे खूप प्रेम असलेल्या व्यक्तीला सुद्धा STI ची लागण असू शकते. लाखो लोकांना STI असते. आणि त्यांच्यापासून इतरांना लागण होत असते. फक्त हे सर्व कुणालाच माहित नसते.
- जर तुम्ही काहीही काळजी घेतल्या शिवाय संभोग केले तर काही समजण्याच्या आधीच तुम्हाला STI ची लागण होवू शकते.
- जर तुमच्या सहचराने काहीही काळजीशिवाय संभोग केले, तर त्याला STI ची लागण होऊ शकते, आणि त्याच्याकडून ती लागण तुमच्याकडे येऊ शकते.
- तुम्हाला जर अशी शंका आले, की तुम्हाला STI ची लागण झाली आहे, तर पहिली करायची गोष्ट म्हणजे STI ची टेस्ट करून घेणे आणि ताबडतोब उपचार सुरू करणे.
STI मुळे एखाद्या स्त्रीला वंध्यत्व येऊ शकते का?
STI मुळे स्त्रीला खूप आत आत पर्यन्त इन्फेक्शन होऊ शकते. ते इतके वाढू शकते की त्यामुळे त्या स्त्रीला वंध्यत्व सुद्धा येऊ शकते. अनेक स्त्रीयांना वर्षानुवर्ष, उशिरापर्यन्त समजत सुद्धा नाही की त्यांना STI ची लागण आहे.
शरीर संबंधांपासून दूर रहाणे
STI पासून बचाव करण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे शरिर संबंध न ठेवणे. प्रेम व्यक्त करण्याचे संभोगाशिवाय इतर अनेक मार्ग असतात. मुका घेणे, प्रेमाने बोलणे, शरिरास नुसता स्पर्श करणे आणि छान भावना व्यक्त करणे अशा रितीनी प्रेम केल्यास आपण STI पासून दूर राहू शकतो. योनी मार्ग, गुदा, मुख ह्या पैकी संभोगात कशाचाही वापर न केल्यास आपण STI पासून दूर राहू शकतो.
जर शरीर संबंध ठेवलेच तर कंडोम वापरा
शरीर संबंध ठेवता त्या प्रत्येक वेळी नियमीतपणे जर तुम्ही कंडोमचा वापर केला तर STI पासून खात्रीने दूर राहू शकता. मग ते शरीर संबंध कोणत्याही प्रकारचे असोत.
जर शरीर संबंध ठेवलेच तर STI ची चाचणी करून घ्या
तुम्ही नियमीत शरीर संबंध ठेवत असाल तर STI ची चाचणी वर्षातून एकदा तरी करून घेणे महत्त्वाचे असते. तुम्ही अगदी निरोगी असाल तरीही ही चाचणी करून घ्यावी. पुढील पैकी एक जरी लक्षण दिसले तरीही ताबडतोब डॉक्टरांकडे जावे:
  • लघवीस गेल्यास आग आग होणे
  • लघवीतून अथवा शौचातून वेगळाच विचित्र स्त्राव येणे.
  • स्त्रीयांना मासिक पाळी चालू नसतानाही स्त्राव होणे.
जास्तीत जास्त जणांच्या STI वर व्यवस्थित उपचार होऊ शकतात
जर तुम्हाला STI असेल तर
  • तुमच्या सहचराला सांगा, आणि त्यालाही STI चाचणी करून घ्यायला सांगा.
  • तुमची सर्व औषधे नियमीत घ्या. तुम्हाला बरे वाटू लागले, तरीही उपचार पूर्ण करा.
  • दुसर्‍याचे औषध कधी घेऊ नका, किंवा स्वत:चे औषध सुद्धा दुसर्‍याला देऊ नका.
  • तुम्ही आणि तुमच्या पार्टनरचे उपचार पूर्ण झाल्याशिवाय लैंगिक संबंध ठेऊ नका.
The Right Way to use a Condom
The Male Condom
Keep condoms cool and dry. Never use skin lotions, baby oil, Vaseline or cold cream with condoms. The oil in these products will cause the condom to break. You may use products made with water (like K–Y jelly or glycerin). Put on a new condom before any kind of sex. Hold the condom by the tip and squeeze out the air. Unroll the condom all the way over the hard penis. Have sex. Hold the condom so it can’t come off the penis. Pull out.

The Female Condom
The female condom fits inside a woman’s vagina. It has a soft ring on each end. The outer ring stays on the outside of the vagina and partly covers the labia (lips). The inner ring fits inside the vagina to hold the condom in place. Put the condom in any time before sex. Add water–based lubricant to the inside of the condom. Squeeze the inner ring of the condom. Put the inner ring and pouch into the vagina. With your finger, push the inner ring as far into the vagina as it will go. Guide the penis into the condom. After sex, remove the condom before standing up. Pull out gently.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya