जर गर्भवती महिलेची टेस्ट पॉझीटिव्ह आली तर असे काही उपचार उपलब्ध आहेत, ज्यामुळे बाळाला होणारी लागण टळू शकते. सिझेरीयन प्रकारे डिलिव्हरी करण्यामुळे देखिल बाळाला होणारी लागण टळू शकते.
आईकडून मुलाला संक्रमण हे रक्तातुन, जन्माच्या वेळी किंवा स्तनपानातुन देखिल होऊ शकते.
पूर्वी सर्व गर्भवती महिलांची टेस्ट व्हायची नाहे, त्यांच्या संमती शिवाय त्यांची टेस्ट केली जायची नाही. परंतु आता सर्व गर्भवती महिलांसाठी एच.आय.व्ही. टेस्ट करणे सक्तीचे केले आहे.
एच.आय.व्ही ची चाचणी करण्यापुर्वी ह्या टेस्ट बद्दल त्या व्यक्तीला माहिती दिली जाते. समूपदेशन केले जाते. नंतर तिला टेस्ट करायची की नाही हे ठरवावे लागते. टेस्ट नंतर एक आठवड्याच्या कालावधीत निकाल मिळतो. एच.आय.व्ही टेस्टसाठी हातातुन थोडे रक्त घेतले जाते. ही टेस्ट कोणत्याही वेळी केली जाते.
जर टेस्ट पॉझीटिव्ह आली तर बर्याच स्त्रिया बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतात तर बर्याच स्त्रिया गर्भपात करण्याचा निर्णय घेतात.