एड्स प्रतिबंधन शैक्षणिक कार्यक्रम

Print
राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन साजरा करणे. यासाठी सिव्हिल सर्जन आणि माहनगरपालिकेमधील मुख्य आरोग्य अधिकारी यांना परिणामकारक योजना आखून देण्यात आल्या. या योजने अंतर्गत समाज व व्यक्ती यातील सुसंवाद, स्वेच्छा रक्तदानाचे महत्त्व रक्तदान करण्याविषयीचा दृष्टिकोन व वागणूक यासाठी अनेक उपक्रम सुचवण्यात आले.
  1. एकंदरीत प्रसिद्धी माध्यमांद्वारे
  2. मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करणे.
  3. निबंध स्पर्धा, चित्र किंवा रांगोळी स्पर्धा
  4. महिला मंडळांचे सहभाग
  5. होमगार्ड व महिला पोलिसांची मदत
  6. मोक्याच्या दिवशी रक्तदान शिबिरे
  7. एन.सी.सी., एन.एस.एस महाविद्यालये आणि स्काऊट यांचा सहभाग.
  8. रक्तदानाच्या चित्रफिती आणि सर्व मोहिमांची नोंद
सर्व सिव्हिल सर्जन्स, रक्तपेढ्या, इंडीयन रेड क्रॉस यांना शिबिरे आयोजित करण्यासाठी मार्गदर्शनपर पत्रे व सूचना देण्यात आली.
ऑक्टोंबर महिन्यांमधे मोठ्याप्रमाणावर स्वेच्छा रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येतात. १०० हून अधिक वेळा रक्तदान करणार्‍या व्यक्तींना पुरस्कृत करण्यात येते. सरकारने अशा ३७ रक्तदात्यांना प्रमाणपत्रे व सुवर्ण पदके देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

२००३ ते २००४ मधील कार्ये
रक्तदानाचे अधिकारी, तंत्रज्ञ यांना इंडियन फार्मास्युटिकल्स मुंबई तर्फे अत्याधुनिक माहिती दिली गेली.
कंट्यिन्यूयिंग एज्यूकेशन प्रोग्राम हा अत्याधुनिक शैक्षणिक कार्यक्रमात रक्तदानाचे अधिकारी व तंत्रज्ञ सहभागी होते. रक्तपेढ्यांमधील अधिकारी व तंत्रज्ञ यांच्यासाठी फुड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन औरंगाबाद तर्फे एक परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेतही सर्व अधिकारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील सर्व मोहिमा यशस्वीरित्या पार पाडण्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत.