लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणार्‍या व्यक्ती आणि एच.आय.व्ही.

Print
संभोग आणि लिंग लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणारी व्यक्ती म्हणजे काय?
लिंगबदल वर्तन असणारी व्यक्ती अशी व्यक्ती असते की जो/जी आपले शाररिक रचनेतील लिंगाला अनुसरुन वर्तन न करता विरुद्ध लिंगी वर्तन करते.
असे वर्तन असणारी व्यक्ती, स्वतःला पुरुषलिंगी/ स्त्रीलिंगी किंवा आणखी तिसर्‍या लिंगाची ओळख देणारी असू शकते. ती व्यक्ती त्याच लिंगाच्या वर्तनास अनुसरुन वावरत असते किंवा विचार करत असते.

लिंग परिवर्तनात्मक वर्तनाचे स्पष्टीकरण
असे वर्तन असणार्‍या व्यक्तींमधे अनेक प्रकार आढळतात. काही व्यक्तींना शाररिक रचनेने पुरुष असूनही स्त्रीवेश परीधान करणे आवडते व हीच खरी स्वतःची ओळख असल्याचे ते मानत असतात. काही व्यक्तींच्या शरीर रचनेत जन्मतः पुरुष व स्त्री या दोघांचेही अंग असतात अशा प्रकाराला हर्माफ्रोडायटीस Hermaphrodites असे म्हणतात.

ट्रान्सेक्शूअल
ट्रान्सेक्शूअल व्यक्तींना त्यांच्या शाररिक रचनेत असलेल्या लिंगाबाबत समस्या उद्‍भवतात. त्यांना सतत असा आभास होत असतो की ते चुकीच्या शरीरात जन्माला आले आहेत. असे लोक वारंवार लिंगबदल करण्यासाठी प्रयत्नशील असतात जेणेकरुन त्यांना आपल्या ऐच्छिक शरीरासह जगता येईल.

निर्वाण समुदायातील व्यक्ती एकाअर्थी अशा प्रकाराच्या व्यक्तींचे उदाहरण आहे. या समुदायातील व्यक्तींनी चिकित्सांमार्फत आपला लिंगबदल घडवून आणलेला असतो.

ड्रॅग क्वीन- साटला कोठीस
या प्रकारातले पुरुष इतर पुरुषांशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा त्यांना या कारणास्तव आकर्षित करण्यासाठी स्त्रीवेश परिधान करत असतात.

लिंग परिवर्तनात्मक वर्तनावर जगभरातील आढावा
पाश्चात्य संस्कृती: युनायटेड किंगडम आणि अमेरिका
पाश्चात्य देशातील समाजात पुरुष व स्त्री हे दोनच लिंग मानले जातात. असे असूनही या तिसर्‍या प्रकाराचा मोठ्याप्रमाणावर स्वीकार केला आहे. परंतु सर्वत्र व नियमित स्वीकृती व आदरार्थी दर्जा अद्यापही मिळालेला नाही.

ओमान: झेनिथ
झेनिथ हा मधला वर्ग म्हणजेच ना पुरुष ना स्त्री अशा स्वरुपात ग्राह्य धरला जातो. ईस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार त्यांना पुरुषांचे सर्व हक्क दिले जातात. तरीही झेनिथ ही तिसरा पंथ मानला जातो.

भारत: हिजडा/अली
भारतात हिजडा/अली यांना तृतीय पंथीय मानले जाते. ते पुरुषात अथवा स्त्रीयात गणले जात नाहीत. हे लोक जन्माने व शरीररचनेने पुरुष असतात पण ते भूमिका मात्र स्त्रीयांची बजावतात. हिजड्यांना काही हक्क प्रदान केले गेले आहेत पण ते भारतीय कायद्यातील नाहीत.

आशिया खंड आणि तृतीय पंथ
3rd Gender
तृतीय पंथाची संकल्पना आशियाखंडात सर्वसाधारण मानली जाते. यामधे भारतातील, बांगलादेशातील हिजडे व थायलंडमधील कॅथॉय सामाविष्ट आहेत.

लिंग परिवर्तनात्मक वर्तन करणारे भारतीय
हमसफर ट्रस्टने म्हणले आहे की भारतात हिजड्यांची संख्या ५ ते ६ लाख आहे.

दक्षिण भारत
3rd Gender
या ठिकाणच्या तृतीयपंथी लोकांना अली असे संबोधले जाते.
अली ही दक्षिणेतील परंपरागत चालत आलेली तृतीयपंथी जमात आहे.


उत्तर भारत
उत्तर भारतात तृतीय पंथीय लोकांना हिजडा असे संभोधले जाते. ह्या जमातीतील लोक स्वतःला तिसर्‍या आणि स्वतंत्र लिंगाचे मानतात.
हिजड्यांना भारतात स्वतंत्र स्थान असून लग्न किंवा जन्म अशा आनंदाच्या क्षणी त्यांना मानाचे स्थान मिळते.

हिजडा आणि हिंदु धर्म
Hijras and Hinduism
हिजडा पंथातील लोक बहुचरा मातेला देवस्थानी मानतात. तिची नित्यनेमाने पुजाअर्चा करतात. असे मानले जाते की त्यांच्या उपासनेच्या बदल्यात देव त्यांना लोकांना वरदान देण्याची शक्ती बहाल करतो. म्हणूनच त्यांना मोक्याच्या क्षणी बोलावले जाते.

हिजडा आणि इस्लाम धर्म
हिजडा हा पंथ प्रामुख्याने फक्त हिंदू धर्मियांमधे मानला जातो पण इस्लाम धर्मामधे ही त्यांना स्थान आहे. मुघल साम्राज्यात स्त्रीयांचे संरक्षण करण्यासाठी हिजडे कार्य करत असत. झिया जेफरी आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असताना एक आश्चर्याची गोष्ट त्यांना दिसून आली, जेव्हा हैदराबाद हे संस्थान होते तेव्हा कित्येक मान्यवरांच्या घरात सेवक म्हणून हिजडे कार्यरत होते.

Hijras and Islam
भारतातील तृतीय पंथीयांचे आजच्या जगातील स्थान
खालील तीन मार्गाने तृतीय पंथील लोक आपली उपजीवीका चालवतात.

शुभप्रसंगी आशिर्वाद देऊन मिळणारे मानधन कमवून

भीक मागून
लैंगिक व्यवसाय करुन

तृतीय पंथीय/लिंग परिवर्तनात्मक वर्तन असणारे व्यक्ती यांसाठी भारतातील कायदा.
Transgender community
एका हिजड्याचे मनोगत
विद्या
Vidya
Vidya
मी ३९ वर्षांची आहे आणि हॉटेल मॅनेजमेंट या विषयाचे उच्च महाविद्यालाचे शिक्षण घेतले आहे. मला माझ्या हृदयाच्या मूळापासून स्त्री होण्याची इच्छा होती. म्हणूनच मी १६ वर्षांची असताना एका पहाटे लिंग परिवर्तनासाठी गेले. आता मी अजून सहा ते सात हिजड्यांबरोबर राहते. ते माझे चेले किंवा अनुयायी आहेत व मी त्यांची गुरु आहे. मी सुशिक्षित आहे पण माझ्याबरोबरचे अधिक हिजडे अशिक्षित आहेत. समाजात ९८% हिजडे अशिक्षितच असतात व त्यांना काय करावे हेच कळत नाही.

काजोल
Kajol
Kajol
मी २१ वर्षांची आहे आणि तीन वर्षापूर्वी मी हिजडा बनले. आम्हाला भारतात कोठेही सोईस्कर अशी लिंग बदलाची चिकित्सा करता येत नाही. किंबहूना तशी उपलब्धताच नाही. म्हणूनच मी खतना करुन घेतला आहे. आम्हा हिजड्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतात एकतर भीक मागणे अथवा लैंगिक व्यवसाय करणे. मी लैंगिक व्यवसाय करते आणि मी काही वाईट करते आहे असे मला वाटत नाही. मला नेहमी स्त्रीवेशात राहणे आवडते. मी एका निमसरकारी संस्थेतही काम करते जी हिजड्यांसाठी कार्य करते.

फामिला
Famila
Famila
मी एका संस्थेची स्वयंसेविका आहे. हा समूह हिजड्यांसाठी उत्सव आयोजित करतो. मागिल वर्षी आमच्या उत्सवात पोलिसांनी आमचा खूपच छळ केला. आम्हाला असे वाटते की आम्ही हा उत्सव साजरा करावा.

जरी हिजड्यांची व्युत्पत्ती खूप पूर्वी झालेली असली तरी कायदा मात्र पुरुष आणि स्त्रीयांसाठीच राखीव आहे. आम्हाला शिधावाटपाचे कार्ड, पासपोर्ट किंवा मतदानाचे कार्डही मिळत नाही.

अधिक माहितीसाठी स्त्रोत: www.thewe.cc

तृतीय पंथीय: भेदभाव
सरला
या जगात कोणत्याही प्रकारच्या कमतरतेने जन्माला येणे म्हणजे भेदभाव, विचित्र दृष्टिकोनाला सामोरे जाणे आहे. मी अशांमधेच अशिक्षितरित्या वाढले. शाळेत दाखला दिला गेला नाही कारण मी इतरांपेक्षा वेगळी आहे असे सर्वांचे म्हणणे होते. मला लिहण्याची वाचण्याची आवड होती तरीही मला यापासून वंचित रहावे लागले. मला उपजीवीकेचे कोणतेही साधन नव्हते म्हणून मी निर्जन जागेत, रस्त्याच्या कडेला असलेल्या अज्ञात स्थळी पुरुषांना बोलावून त्यांना लैंगिक समाधान मिळवून देत असे. समाधान झाल्यावर ते जे देतील त्यावरच मी उपजीवीका चालवत होते. आता माझे वय झाले आहे. माझे जीवन अधिक खडतर झाले आहे. आता मी अनधिकृत कामे करुन किंवा भिक मागून जीवन व्यतीत करण्याखेरीज काय करु शकते.
मी मनुष्य नाही का? स्त्री आणि पुरुषांनाच फक्त मनुष्य म्हणून जगण्याचा हक्क आहे का? आपण माणुसकी का विसरत आहोत?


संध्या
वय : ५० वर्षे जन्मस्थळ : कोलकाता
कोलकाता:
मी कोलकाता येथे माझ्या कुटुंबियांसमावेत राहते. माझ्या कुटुंबात माझे दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. मी लहान असताना मला मुलींचे कपडे घालणे, नाच आणि सौंदर्य प्रसाधने वापरायला आवडायचे. जेव्हा मी नाटकातून काम केले तेव्हा मुलीची भूमिका मलाच दिली जात असे.

मी दिल्लीला आल्यानंतर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा मी हिजड्यांच्या टोळीत सामिल झालो. मी माझा नवरा (गिरिया) माझी आई आणि बहिण मिळून एकाच घरात रहायचो. गेली १५ वर्षे मी गिरियासोबतच राहत आहे. मी हिजड्यांच्या समूहातच काम करते. माझा नवरा निर्मिती केंद्रात काम करायचा आणि माझ्या नवर्‍याच्या पगारातील काही रक्कम पोटगी म्हणून त्याच्या बायकोला व मुलांना देत असे.

माझे नवर्‍याला भेटण्याआगोदर माझे दोनवेळा लग्न झालेले आहे. माझी शारिक स्थिती अशी असल्यामुळे माझ्या बायकोची गर्भधारणा झालीच नाही. हिजडा असल्यामुळे लोकांनी माझ्यावर मारलेल्या शेर्‍यांकडे मी दुर्लक्ष करते. मी म्हणते, "त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे मला काही फरक पडत नाही."

माझ्या छोट्या मोठ्या दुखण्यासाठी मी ’सहारा ट्रांसजेंडर प्रोजेक्ट’ येथे जात असे. अंमली पदार्थ व दारु यांचे व्यसन असलेल्या लोकांसाठी सहारा काम करत असल्यामुळे मी दारुड्या आहे हे मी तिथे कबुल केले. माझ्यासाठी एक आरोग्य दक्षता कार्यकर्ता नेमून देण्यात आला आणि सुरक्षित संभोग कसा करावा हे मला समजले. माझ्या वागणूकीमुळे मला संशय आहे की मी एच.आय.व्ही. ग्रस्त आहे पण अद्याप मी तशी तपासणी केलेली नाही. मी तयार असे पर्यंत सहाराचे कार्यकर्ते तपासणीसाठी थांबण्यास तयार होते.

www.saharahouse.org

चेन्नई मधील तृतीत पंथी
Click to view large Image
Kolkata Map
चेन्नई मधे देहविक्री चा धंदा खूप चालतो. चेन्नई शहरातच जवळपास ३०० अली(हिजडे) देहविक्रीचा धंदा करतात व ते यावरच अवलंबून आहेत. स्त्रीयांशी संबंध ठेवणारेच लोक ग्राहक म्हणून यांच्याकडे येतात. गुदामैथून आणि मुखमैथून करुन घेण्यासाठी ते नेहमीच येत असतात. हे सर्व अली त्यांच्या जमातीचे सदस्य आहेत. सगळे अली हे तामिळनाडूमधे आपल्या जागा बदलत असत्तात. ते चेन्नई, बेंगळुर, पुणे आणि मुंबईलाही भेटी देतात.

मुंबईचे तृतीय पंथी
तृतीयपंथीयांमधे HIV चे प्रमाण

मुंबईचा नकाशा
Click to view large Image
Mumbai Map
हमसफर ट्रस्ट पुरुष वेश्यांवर अभ्यास करत आहेत.
हमसफरने आयोजित केलेल्या शिबिरात ७६ लोक उपस्थित होते त्यात २४ पुरुष आणि ५२ हिजडे होते.
५२ हिजड्यांपैकी ४० लोक HIV ग्रस्त होते.
३०% हिजड्यांना लैंगिक रोग होते.

तृतीयपंथी आणि HIV
आरोग्य दक्षतेसाठी प्रवेश नसणे, प्रगती आणि शिक्षण नसणे, वैयक्तिक हक्कांची माहिती नसणे आणि धोकादायक जीवन पद्धती या कारणांमुळे हिजडे समाजाकडून दुर्लक्षित झाले आहेत. यांना HIV चा खूपच धोका आहे.

भारतामधील तृतीयपंथी आणि HIV
HIV Status of the trans gender sex workers
HIV Status of the trans gender sex workers
मुलाचा जन्म आणि लग्न कार्यात परंपरेनुसार हिजडे काम करतातच पण जीवन जगण्यासाठी त्यांना देहविक्री करावीच लागते.
असुरक्षित संभोग केल्यामुळे यांच्यात HIV चा फारच धोका आहे.
कंडोमचा वापर न केल्यास HIV चा संसर्ग होऊ शकतो.
असुरक्षित संभोगामुळे ३३% हिजड्यांना HIV विषाणूंची लागण झाली आहे.

मानवी हक्क हक्कांचे नवे कायदे: हिजडयांसाठी भविष्यातील आशेचा किरण नोकरीचा हक्क लढ्यात सामिल व्हा
तृतीय पंथीयांसाठी कार्यरत असणार्‍या संस्था वेबसाईट आणि स्त्रोत