या विमानितीची काही प्रमुख ठळक वैशिष्ट्ये
- फक्त HIV ग्रस्त अथवा पिडीतांसाठी वैयक्तिक पातळीवर उपलब्ध
- अर्जदाराला कोणत्याही वयाची अट नाही
- इतर वैद्यकीय विमानिती प्रमाणेच या विमानितीचाही कालावधी एका वर्षाचा असतो.
- रु. ३०,०००/-, रु. ४०,०००/- आणि रु. ६०,०००/- पर्यंतची विमा रक्कम मर्यादा.
- ५०% रक्कम रुग्णालयातील खर्चा करीता तर उर्वरित ५०% AIDS च्या पातळीवर पोहचल्यानंतर येणार्या खर्चाकरीता संरक्षित.
- HIV सुश्रूषा विमानितीकरीता HIV चा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा समूहा पात्र असतो.
- नितीधारक हा संबंधीत उपलब्ध करुन देणार्या कंपनीचा उपभोक्ता किंवा सभासद असावा लागतो.
- अशा प्रकारची नितीची शिफारस ही सरकारी कंपन्यांद्वारे, निमसरकारी सामाजिक संस्थांद्वारे अथवा अधिकृत नोंदणी असलेल्या समूहाद्वारे अंमलात आणलेली असावी.
- AIDS ची पातळी ठरवण्यासाठी सर्व सभासदांची CD4 तपासणी करणे बंधनकारक आहे.
- दाखल स्वरुपाची रुग्ण सेवा/रुग्णालय
- रुग्णालयात दाखल करण्याआधी ३० दिवसांचा खर्च
- रुग्णालयात दाखल केल्यानंतरचा ५०००/- रुपयांपर्यंतचा खर्च
- सुरवातीपासूनच निदान झाले असलेल्या सर्व आजारांसाठी/दुखापतींसाठी उपलब्ध.
- नितीचा कालावधी सुरु झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत कोणताही आजार उद्भवल्यासही विमानिती लागू.
- विमानितीच्या अर्जदाराने सर्व अटी व पात्रता पूर्ण केलेल्या असाव्यात
- विमाकंपनीद्वारे छायाचित्रासहित ओळखपत्र दिले जाते.
- छायाचित्रासहित ओळखपत्रात ओळखपत्राचा क्रमांक, निती क्रमांक व वैधता कालावधी समाविष्ट असतो.
- तसेच विमादात्याचा निशुल्क असलेला टोल क्रमांकही दिला जातो.
- या कार्डाद्वारे कोणत्याही अगाऊ रकमेशिवाय रुग्णाला दाखल करता येते. संबंधित
- ३००० रुग्णालये संपूर्ण देशात अस्तित्वात आहेत.
- विमानितीमधे नमुद असलेल्या किंवा त्यांच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही रुग्णालयात रुग्णाला दाखल करावयाचे असल्यास आपण विनारकमेने त्यास दाखल करु शकतो.
- रुग्णालयात उपचार करणार्या डॉक्टरांकडून अधिकृत फॉर्म(माहितीपत्रक) भरुन घ्यावा.
- हा फॉर्म विमाकंपनीकडे अधिकृत मंजुरीसाठी पाठवला जातो.
- परिस्थिती व प्रसंगाचा योग्य आढावा घेऊनच मग विमाकंपनीचा वैद्यकीय अधिकारी या दाव्याला मंजुरी देत असतो.
- अधिकृतरित्या प्रक्रिया पूर्ण केलेली असल्यास रुग्णास कोणतीही रक्कम रुग्णालयात भरावी लागत नाही.
- रुग्णालय आणि विमा कंपनी कोणत्याही मध्यस्तीशिवाय दाव्याची हाताळणी करतात.
- परतफेडीचा दावा मंजुर करुन घेण्यासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर/ अपघातानंतर/ आजारी पडल्याची लक्षणे कळल्यानंतर पुढील २४ तासांच्या आत कॉल सेंटरद्वारे/ २४ तास उपलब्ध असणार्या हेल्पलाईनद्वारे त्याबद्दल कळवणे गरजेचे असते.
- दाव्याची सविस्तर माहिती पुरवणारी कागदपत्रे रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर १५ दिवसांत पोच करावी लागतात.
- सर्व कागदपत्रे मूळ प्रतीच असावी लागतात.
- या कागदपत्रात रुग्णालयातून बाहेर पडताना डॉक्टरांनी दिलेला लेखी सल्ला, रुग्णालयाची सविस्तर बिले, प्रयोगशाळेतील तपासण्यांची कागदपत्रे, पावत्या इत्यादींचा समावेश असतो.
विम्याची रक्कम | वार्षिक हाप्ता |
३०,००० | १५११ |
४०,००० | १९१९ |
६०,००० | २४४५ |
संपर्क
राज्य वीमा समन्वयक
प्रोजेक्ट कनेक्ट
महाराष्ट्रातील एच.आय.व्ही. सहीत जगणार्या लोकांचे नेटवर्क - एन.एम.पी. (N.M.P.+)
दुरध्वनी: +९१ २० २६३३६०८४/८७
ई-मेल: connect@nmpplus.net
