Friday, Dec 09th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी आंध्रपाठोपाठ महाराष्ट्रात एड्‌सग्रस्तांची वाढती संख्या

आंध्रपाठोपाठ महाराष्ट्रात एड्‌सग्रस्तांची वाढती संख्या

Print
सकाळ वृत्तसेवा
०१ डिसेंबर २०१०
मुंबई, भारत

संपूर्ण जगाला "एड्‌स'चा विळखा करकचून आवळत असून भारतात आंध्र प्रदेशात एड्‌सचे सर्वाधिक रुग्ण असून त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागत आहे. आंध्रमध्ये "एचआयव्ही'ग्रस्तांची संख्या 1.07 टक्के इतकी असून महाराष्ट्रात हेच प्रमाण 0.64 टक्के इतके आहे. जागतिक एड्‌स प्रतिबंधक दिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत "पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन'ने ही माहिती दिली.

भारत येत्या काळातील जागतिक महासत्ता आणि फार्मा व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दादा देश म्हणून पुढे येणार आहे. मात्र, "एचआयव्ही'चा धोका ओळखून पालकांपासून मुलांना लागण होणाऱ्या या रोगावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना देशात होऊ शकलेली नाही, अशी खंत "पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन'चे डॉ. आय. एस. गिल्डा यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संस्थेने केलेल्या पाहणीत भारतात 2009 मध्ये 65 हजार "एचआयव्ही'बाधित मातांकडून 18 हजार नवजात अर्भकांना या रोगाची लागण लागल्याची माहिती या वेळी देण्यात आली. फक्त दहा टक्के गर्भवती महिला "एचआयव्ही' प्रतिबंधात्मक औषधांचा डोस घेत असल्याचे डॉ. गिल्डा यांनी स्पष्ट केले. तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही राज्ये "एड्‌स'बाबत धोक्‍याच्या सीमारेषेवर असून पंजाब, ओरिसा, पश्‍चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यात एड्‌स वाढत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आंध्रमध्ये 3 लाख 1 हजार 116 पुरुष; तर 1 लाख 98 हजार 504 महिला; तर महाराष्ट्रात 2 लाख 56 हजार 679 पुरुष; तर 1 लाख 63 हजार 110 महिलांना "एचआयव्ही'बाधित असल्याचे सांगण्यात आले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya