Friday, Dec 09th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्ही पॉझिटिव्हचीही 'सरकारदरबारी दखल'

एचआयव्ही पॉझिटिव्हचीही 'सरकारदरबारी दखल'

Print
नागपूर - एचआयव्ही संक्रमितांना सरकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन पावले पुढे टाकून त्यांच्यासाठी विशेष शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. यात 500 अर्जधारकांपैकी 483 जणांची नोंदणी करण्यात आली. सरकारी स्तरावर त्यांनाही शासकीय योजनांचा फायदा मिळावा, हा यामागचा हेतू आहे. यानिमित्ताने या रुग्णांची सरकारदरबारी दखल घेतली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय व संजीवन बहुउद्देशीय समाज सेवा संस्थेतर्फे हे शिबिर घेण्यात आले. यात एचआयव्ही पॉझिटिव्हला बीपीएल कार्डधारकांना अंत्योदय योजनेचा फायदा मिळावा यासाठी कार्ड तयार करून दिले जाणार आहे. तत्पूर्वी, यासाठी संस्थेने पाचशे जणांचे अर्ज भरून घेतले. यापैकी 483 जणांची "ऑन द स्पॉट' नोंदणीही करण्यात आली. या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केलेल्यांना टोकन देण्यात आले. तर, नव्याने अर्ज करणाऱ्यांसाठी हे विशेष शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात मोठ्या संख्येत अशा रुग्णांची गर्दी झाली. त्यांना केवळ नोंदणी न करता त्यांना योजनांची माहितीही दिल्या गेली. कोणत्या योजनांचा काय फायदा होतो, याचीही माहिती प्रशासनातर्फे देण्यात येणार आहे.

शिबिरावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी, संजय गांधी योजनेचे तहसीलदार यू. एम. तोडसाम, ऍव्हर्ट सोसायटीचे संचालक अण्णा रॉय, कार्यक्रम अधिकारी श्रीमती पल्लवी भालेकर, जिल्हा व्यवस्थापक नितीन भोवाटे, नरेंद्र सनके आदींसह अनेकजण उपस्थित होते. या उपक्रमास रेड क्रॉस सोसायटी, सीआरटीडीपी, बीजेएएसएस, आआयवायडब्ल्यू, मानव विकास, वायएमसीसीए आदी स्वयंसेवी संस्था सहकार्य करीत आहेत.

कोल्हापूर पाठोपाठ नागपूर!
एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांना शासकीय योजनांचा फायदा मिळावा यासाठी सर्वप्रथम कोल्हापूर येथे विशेष शिबिर घेण्यात आले. ऑन द स्पॉट अशांची नोंदणी करून त्यांना कार्ड देण्यात आले. खुद्द श्री. दराडे यांनीच जिल्हाधिकारी असताना हे शिबिर घेतले होते. त्या ठिकाणी देवदासी व तृतीयपंथीयांसाठीही शिबिर घेण्यात आले होते. त्यानंतर शासनाने या बाबीची दखल घेत, जी. आर. काढून तसा बदल केला, हे विशेष. आता कोल्हापूर पाठोपाठ नागपुरातही त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

स्त्रोत: सकाळ

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya