Saturday, Dec 10th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांत पुणे दुसऱ्या क्रमांकावर

एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांत पुणे दुसऱ्या क्रमांकावर

Print
सकाळ वृत्तसेवा
०१ सप्टेंबर २०१०
पुणे, भारत

राज्यातील "एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांमध्ये पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती पुढे आली आहे. पहिला क्रमांक मुंबईचा असून, तेथेच या रोगाच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद झाल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सांगली जिल्ह्याचा मृतांमध्ये दुसरा क्रमांक आहे.

राज्यात 1986 पासून सप्टेंबर 2009 पर्यंत 87 हजार 773 "एचआयव्ही'चे रुग्ण असल्याची नोंद आरोग्य खात्यात आहे. त्यात एकट्या मुंबईमध्ये 41 हजार 213 रुग्ण, तर त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात 15 हजार 414 रुग्ण आढळले आहेत. काही वर्षांपासून "एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांच्या संख्या कमी होत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. "एचआयव्ही'ग्रस्त रुग्णांत 57 हजार 920 पुरुष आणि 29 हजार 853 स्त्रिया आहेत.

राज्यात "एचआयव्ही'मुळे पाच हजार 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार हजार 158 पुरुष असून, एक हजार 692 स्त्रिया आहेत, अशी माहिती खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. सांगलीमध्ये आतापर्यंत चार हजार 203 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याची नोंद आहे. राज्यात "एचआयव्ही'मध्ये या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. या जिल्ह्यातील 826 रुग्णांचा "एचआयव्ही'ने मृत्यू झाला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

सर्वसाधारण व्यक्ती................................................ गरोदर स्त्रिया
वर्ष ............ एचआयव्ही निदान ..... टक्केवारी ........... एचआयव्ही निदान ........... टक्केवारी
2008 ................... 5122 ......... 8.20 ................... 289 ................... 0.53
2009 ................... 6833 ......... 9.15 ................... 327 ................... 0.66
2010 ................... 6957 ......... 8.61 ................... 308 ................... 0.57

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya