Saturday, Dec 10th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एचआयव्ही'बाधित कुटुंबाचा मुक्काम रुग्णालयात

एचआयव्ही'बाधित कुटुंबाचा मुक्काम रुग्णालयात

Print
सकाळ वृत्तसेवा
०१ नोव्हेंबर २०१०
पुणे, भारत

आई गंभीर आजारी. वडिलांनाही तोच आजार जडलेला. त्यामुळे दोघेही रुग्णालयात. त्यांच्या आजाराची वाच्यता झाल्याने त्यांच्या दोन मुलांना नातेवाइकांनी दूर लोटले. त्यामुळे दोन्ही मुलांचा मुक्कामही रुग्णालयातच. या स्थितीत "एचआयव्ही'बाधित कुटुंबाची जगण्याची धडपड गेल्या महिनाभरापासून सुरू आहे.

"एचआयव्ही'बाधित असल्याने लोकांच्या त्रासामुळे भाड्याने घेतलेले घरदेखील सोडावे लागले. परिणामी मुलांसह रुग्णालयात राहण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने या कुटुंबाला आर्थिक मदत केल्याने त्यांचे जगणे काहीसे सुकर झाले होते. मात्र, "एचआयव्ही'बाधित असल्याचे लक्षात आल्याने त्या भागातील नागरिकांनी त्रास द्यायला सुरवात केली. त्यामुळे नाइलाजाने घर सोडणे भाग पडले.

दरम्यानच्या काळात "एचआयव्ही'बाधित असलेली पत्नी आजारी पडल्याने दहा दिवस ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. काहीसे बरे वाटू लागल्याने अकोला येथे माहेरी गेलेल्या या माहेरवाशिणीला पाच-सात दिवसांतच माहेरचा निरोप घ्यावा लागला. दोन दिवसांपूर्वी त्यांना पुण्यात परत आणले. प्रवासात प्रचंड त्रास झाला. सध्या पिंपरीतील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असले तरी तब्येत आणखी खालावली आहे. पती-पत्नी आणि दोन मुलांमधील एक मुलगा वगळता उर्वरित तिघे "एचआयव्ही'बाधित आहेत. या कुटुंबाला सध्या गरज आहे ती मानसिक आधाराची आणि आर्थिक मदतीची. मात्र, जवळच्या असणाऱ्या आई-वडील, सासू-सासऱ्यांपासून कुणीही आप्त चौकशी करायलाही तयार नाहीत.

या कुटुंबाला गेल्या तीन वर्षात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने सुमारे पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे. व्यवसाय करण्यासाठीदेखील मदत केली आहे. या कुटुंबाला तसेच अशा प्रकारच्या कुटुंबांना आर्थिक मदत करणाऱ्या इच्छुकांनी 020-24489999 या क्रमांकावर संपर्क साधावा.

त्यांची दिवाळी आईच्या सेवेत
या पती-पत्नीची दोन मुले पुण्यातील एका चांगल्या शाळेत पाचवी आणि चौथीच्या वर्गात शिकत आहेत. या विद्यार्थ्यांचा शाळेचा खर्चदेखील राजकीय कार्यकर्त्याच्या सहकार्याने सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या. सर्व जण दिवाळीच्या सुटीचा आनंद घेत आहेत. मात्र, आईच्या आजारपणामुळे या दोघांचा एक महिना रुग्णालयातच गेला. परिणामी सत्र परीक्षा बुडाली. आता ऐन दिवाळीत ही चिमुरडी रुग्णालयात आईची सेवा करीत आहेत.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya