Saturday, Dec 03rd

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी एड्‌स जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखणार

एड्‌स जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखणार

Print
सकाळ वृत्तसेवा
२६ मे २०११
मुंबई, भारत

राज्यात एड्‌स रोगाविषयी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांचे नियोजन करणे, तसेच आमदारांनी आपल्या मतदारसंघात याबाबत कशाप्रकारे काम करावे यासाठी त्यांच्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे राज्य एड्‌स फोरमच्या बैठकीत आज ठरविण्यात आले.

विधानभवनात विधिमंडळ सदस्यांचा समावेश असलेल्या राज्यस्तरीय चर्चापीठाच्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीत फोरमचे मुख्य आश्रयदाते विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, फोरमचे अध्यक्ष मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, निमंत्रक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे तसेच फोरमचे सदस्य उपस्थित होते.
लग्नापूर्वी वधू-वराची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत जनजागृती करणे आवश्‍यक असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय फोरमचा कार्यक्रम तयार करावा, अशी सूचना वळसे-पाटील यांनी केली.

राज्यस्तरीय एड्‌स फोरमचे काम प्रभावीपणे होण्यासाठी फोरमचे कार्यालय विधिमंडळ परिसरात असावे, तसेच प्रत्येक लहान बालकापासून रक्ततपासणी करून घेण्याबाबत जागृती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत शेट्टी यांनी या वेळी व्यक्त केले.

या बैठकीत फोरमचे सदस्य आमदार गिरीष बापट, डॉ. राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, बाळा नांदगावकर, खुशाल बोपचे, अभिजित अडसूळ, विनोद तावडे, डॉ. दीपक सावंत, डॉ. नीलम गोऱ्हे, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, आरोग्य सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र राज्य एड्‌स कंट्रोल सोसायटीचे प्रकल्प संचालक रमेश देवकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya